पोस्ट्स

2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

! वर्ष २०११ चे स्वागत असो !

इमेज
                         परत एकदा येणारे नवे वर्ष हसून स्वागत करणारे,हात पसरून जवळ बोलावणारे आणि जुन्या वर्षाचा सर्वांना विसर पडलेला,तो क्षण,तो दिवस,जवळ,जवळ येणारा,त्या दिवसाची संध्याकाळ हवी हवीशी वाटणारी ३१ डिसेंबरची संध्याकाळ,नाताळचे दिवे आणि मग नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत, दर वर्षी ठरलेला हा सोहळा!                      किती सारे जुन्या वर्षाने आपल्याला दिले.काय आपल्याकडून घेतले?काही अवघड प्रसंग,अचानक झालेले लाभ,आनंदाचे अनेक क्षण,तसेच काहींना भेटलेले आघाताचे दुर्दैवी क्षण,काही तरी हरवल्याची जाण, कुठेतरी काही नसल्याची जाणवत राहणारी खोच, धनलाभ, वास्तु सुख,नवीन नोकरी, एक न दोन अनेक आनंदाच्या बातम्या! हे मागील वर्ष जाताना पूर्णपणे कधीच जात नसते, आपल्याला देऊन जाते फक्त येणारे नवीन वर्ष! पुन्हा एकदा चालून आलेली नवी संधी,परत एकदा एक नवी सुरवात,नवे संकल्प, जुन्या अनुभवांनी दिल...

बयो...एक अप्रतीम चित्रपट!

इमेज
                                    तळकोकणातल्या एका गावातली ही प्रेमकथा,दिग्दर्शकाने इतकी जिवंत केली आहे कि अक्षरशः पूर्ण चित्रपटात आपण ती कथा जगतो.कुठेच कंटाळवाणा होत नाही हा चित्रपट,कारण अतिशय सुंदर मांडणी केली आहे.प्रसंग पण छान गुंफले आहेत.शिवाय मध्ये मध्ये शास्त्रीय संगीताची जोड आणि कोकणचा निसर्ग! दिग्दर्शक,श्री गजेंद्र अहिरे ह्यांनी प्रेक्षकांना बरच काही दिले आहे ह्या 'master piece ' मधून;असे वाटले.          सर्व कलाकारांनी अप्रतीम भूमिका केल्या आहेत..सौ.देशमुख' ह्या लेखिकेच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहेत.नवऱ्याच्या दूतावासातल्या नोकरीमुळे लंडनला आलेली रावी देशमुख,खूप एकटे वाटत असते तिला घरी.परत मायदेशी जावेसे वाटत असते,भारतात असताना नोकरी करणारी रावी इकडे घरी पूर्ण वेळ रिकामी असल्याने कंटाळते,'लिहिणे' हा तिचा छंद,२ पुस्तके तिची प्रकाशित झालेली असतात.श्री...

वाचू आनंदे !

           प्रश्न आणि उत्तरे ह्या सगळ्याचा खेळ आहे शेवटी जीवन म्हणजे....आणि एका प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण करत राहतो आपण.एकदम सगळे सगळे बदलून टाकण्याची खुमखुमी असते न आपल्यात! मनासारखे झालेच पाहिजे आणि नाही झाले तर मग खूप वाईट वाटते.नव्या उमेदीने परत एकदा प्रयत्न करणे कमी जमते  कारण असा पण विचार करतो कि इतकी मेहेनत पाण्यात गेली आणि मग नकारात्मक वृत्ती सकारात्मकतेला मागे टाकू लागते...अश्या वेळी खरच लागतो एक मदतीचा हात, आता हा हात नेहमीच मिळेल असे नाही पण आपले रोजचे व्यवहार,त्यातले येणारे नावडते अनुभव,ह्या सर्वातून आपण एकटेच मार्ग काढत असतो कि! मग कधी अचानक आलेल्या मोठ्या प्रश्नाला पण आपणच सामोरे का जाऊ नये? उत्तर शोध म्हणजे सापडेल! पण कसे शोध, तर मनातून सर्वप्रथम सगळे नकारात्मक विचार काढावेत.तरच योग्य तऱ्हेने उत्तर जवळ येऊ शकेल.                       मध्ये एका लेखिकेचा एक लेख वाचनात आला होता.इतके छान लिहिले होते ...

!!! शुभ दीपावली !!!

इमेज
              दिवाळी...........दिव्यांची,आकाश कंदीलांची,रांगोळीची,अभ्यंगस्नानाची,फराळाची,फटाक्यांची,बहार!          वर्षातून एकदा येणारी हि दिवाळी सगळ्यांना आनंद देते.अनेक शुभेच्छा,भेटकार्डासोबत आणि मिठाई सोबत मैत्री घेऊन येते. हास्य विनोद,गप्पा रंगतात.नातेवाईक,आप्त,सर्वांच्या मेळाव्यात,एकत्र आनंदात सहभागी होऊन आपण आपले रोजचे जग थोडे बाजूला ठेवतो.दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणाचे महत्व जाणवते.लहानांना दिवाळीची गोष्ट सांगून पुढे दिवाळी अशीच येत राहावी आणि साजरी होत राहावी असा मोठ्यांचा प्रयत्न असतो.सर्वांना हा सण खूप आवडतो.नवीन कपडे,नवीन खरेदी आणि त्यासाठी लोकांची बाजारात झालेली गर्दी, उडालेली झुंबड,किती किती उत्साह ओसंडत असतो सर्वत्र!                        धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी),लक्ष्मीपूजन,पाडवा किवा बलिप्रतिपदा आणि भाऊबीज....तुळशी विवाह  हे दीपावलीचे दिवस .श्री ...

" नेमेची येतो बघ ' पाववाला ' ! "

          "नेमेची येतो बघ 'पाववाला'!" ह्या वाक्यातला बदल, तुमच्या लक्षात आलाच असेल! पण हे अगदी खरे आहे हं! एक वेळ 'पावसाळा' मागे पुढे सुरु होईल पण 'पाववाला' मात्र अगदी नियमित येणारी व्यक्ती आहे.                                               शहरातून ठराविक भागात बेकरीतले काही पदार्थ सायकलवरून विकणारा हा 'पाववाला' आणि त्याची ती ठराविक हाळी ऐकली कि सवयीने सकाळी सकाळी लोक पैसे तयार ठेवतात. मऊ आणि कडक पाव, खारी आणि बटर शिवाय आणखीनही  बरेच गोड पदार्थ देखील हे आणून देऊ शकतात. नियमितपणा चुकलेला नाही ह्याला. पावसाळ्यात मुसळधार पावसात देखील हजेरी लावणारच.सायकल कोपऱ्यावर लावून अगदी गुढघाभर साठलेल्या पाण्यातून  चालत येणारा पाववाला पण पहिला आहे मी.ठरलेली घरे, ठरलेले पैसे ह्यासाठी इतकी धडपड! कधी एक शब्द जास्त बोललेला आठ...

शरद ऋतूचे देखणे दर्शन.....

इमेज
शरद ऋतू ,पानांचे वेगवेगळे रंग, आणि हवेतला गारवा , अश्या वेळी खूप सारी छायाचित्र  काढाविशी वाटली तर नवल नाही! रंगबिरंगी पानांना आणि निसर्गाला असेच कॅमेर्यात टिपून ठेवलेले काही क्षण ...Fall 2010

सांजगारवा....

'तिच्या' निजेला चंद्र हासरा रजनी गुणगुणते 'त्याचे' स्वर 'तिच्या' पापणी मध्येच दिसते ते 'त्यांचे' घर ते 'त्यांचे' घर.... लाल रुपेरी कौलारू परि, आणि नेटके सुरेख अंगण. अंगणी आहे तुळस आगळी प्राजक्ताचे सडे लांबवर... दरवाज्यावर तोरण हलते, रंग भिंतीचे, 'त्याचे' मीपण. सुगंध उदबत्तीचा येता विसरून जाते 'ती' 'तिजला' पण... खिडकीपाशी,पडदे निळसर, सर्व असावे मनाजोगते 'त्याचे' हास्य अन 'तिचे' लाजणे अल्लड,अवखळ आणि निर्मळ.... यावा नेहमी 'सांजगारवा' हरवून जावी सारी कलकल फक्त उरावे 'दोघांमधले' क्षणिक अंतर क्षणिक अंतर.... -श्रिया (मोनिका रेगे)-

'दूरदर्शन शाप कि वरदान?'

          लहानपणी  शाळेत असताना निबंधाचे विषय मिळायचे आणि एक त्यातला आठवतो ''दूरदर्शन एक शाप कि वरदान?'त्यावेळी लहान होते आणि अर्थात दूरदर्शनचे आकर्षण नवीन असल्यामुळे खूप वाटायचे अश्यावेळी त्या निबंधात मी काय लिहिले असेल ह्याचा तुम्हीं अंदाज लावू शकालच! त्यावेळचे काही लक्षात राहिलेले कार्यक्रम म्हणजे छायागीत,गजरा, चिमणराव आणि नंतर जेव्हां हिंदी कार्यक्रमांना सुरवात झाली तेव्हां चे 'नुक्कड','ये जो हैं झीन्दगी' हे काही कार्यक्रम आठवतात.तेव्हां दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम आणि मग रात्री ठराविक वेळ दिल्ली दूरदर्शन चे कार्यक्रम असत.             सद्यस्थिती पाहता,दूरदर्शन वरील वाहिन्या,आणि त्यावरील वेगवेगळ्या मालिका हा एक मोठा चर्चेचा विषय आहे,TV सेट आज घराघरात दिसतात एक वेळ 'तुळशी वृंदावन' दिसणार नाही पण TV मात्र आहेतच.. सर्वांचेच विश्व ह्या TV भोवती थोड्या बहुत प्रमाणत फिरते.. मोठ्यांना नोकरी व्यवसाय सांभाळून,जो वेळ मिळेल त्या वेळात आवडत्या मालिका बघणे हा एक रोजचा कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम चुकतच का...

जाणता राजा...

इमेज
आपल्या प्रत्येकात एक 'शिव छत्रपती' आहेत....सध्या कुठे हरवले आहेत ते ? महाराष्ट्राचे सोने करणारा,खरया अर्थाने महाराष्ट्राला जागे करणारा,चैतन्य देणारा आणि स्वातंत्र्य देणारा असा आपला राजा.....आज ह्या राजाची भारताला गरज आहे. सच्चाई,सचोटी,न्याय,खलांचे निर्दालन,शौर्यं, धिटाई,सर्व गुणांच्या एकत्रीकरणासाठी त्या जिजाऊला किती मेहेनत घ्यावी लागली असेल! आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली ती एक आदर्श माता,महाराजान मधला कणखरपणा, आणि स्वातंत्र्याबद्दलची ओढ,निर्माण करणे हे जणू तिचा जिवित उद्देश्य होते. आज आजूबाजूला आपल्या देशात अन्यायपूर्ण अश्या अनेक गोष्टी घडताहेत.वर्तमानपत्रातली पाने हि अश्या बरयाच बातम्यांनी भरलेली असतात ज्या वाचून मन अस्वस्थ होते.... सगळीकडे 'भ्रष्टाचाराचे राज्य'...हा आपला शत्रू इतक्या सहजपणे देशात घुसून आतल्या आत देश पोखरतो आहे...."सगळी सिस्टिमच जर बिघडली असेल तर मग मी एकट्याने बदलून काय होईल?" असा मुलभूत प्रश्न सगळे एकमेकांना विचारतात जेव्हां असे विषय चर्चेत येतात. सर्वांसाठी केलेले असे स्वतःचे असे राज्य जे स्वराज्य ते प्रत्येकासाठी आहे;...

आमची गच्ची!

गच्ची.....................घराला असली कि उंचावरून बरच काही अनुभवता येते. लहानपणी गच्चीवर खेळायला जायचो,धमाल यायची! सुटीत गच्चीचा वापर खेळण्यासाठी....आणि परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी करत असे मी. गच्चीवरून रात्री चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश बघताना,चटईवर उताणे झोपून गप्पा मारत आम्हीं बहिणी आणि आईबाबांबरोबर ती आकाशगंगा दुर्बिणीतून पाहताना,थंड वाऱ्याच्या झुळ्कीला अंगावर झेलत मस्त पडून राहायचो, डोळे भरून चांदण्या पाहताना थोड्या वेळासाठी शांतपणे एकही शब्द न बोलता ते आकाश अनुभवायचो, मध्येच येणारा रातकिड्यांचा आवाज, एखाद्या पक्ष्याचा आवाज आणि शेजाऱ्यांच्या घरातून येणाऱ्या TV चे आवाज सोडले तर अगदी मध्येच गाड्यांचे व रस्त्यावरच्या तुरळक लोकांचे बोलण्याचे आवाज येत असत.हि गच्चीसहल कधी कधी उकडलेल्या किंवा भाजलेल्या शेंगांची मेजवानी पण घेऊन यायची.कधी कधी तेव्हा बाबा गाणे म्हणत त्यांचा सूर इतका छान लागायचा कि ती संध्याकाळ खरच गच्चीत संगीतमय होऊन डोलू लागायची. शेजाऱ्यांच्या गच्चीचे होणारे दर्शन, वाळत घातलेले कपडे, काहींच्या गच्चीत तर पापड आणि मिरच्या पण वाळत अ...

एक निवांत क्षण!

आजकालच्या धावपळीच्या जगात, एक निवांत क्षण मिळणे कठीण! स्वतःशी कधी एकांतात बसून गप्पा मारलेल्या स्मरतात का? सकाळपासून रात्री पर्यंतचे घड्याळाच्या काट्यावर धावणारे आपले पाय, आपले विचार, कधी विश्रांती असते का ह्यांना? 'कालनिर्णयाचा' नवा अंक विकत घ्यायला जाताना अचानक जाणवते;कि अरेच्या!, नवीन वर्ष परत इतक्या पटकन आलेच..... एकमेकांना नवीन वर्षाभिनंदन करताना परत सर्वांच्या मनात नवे संकल्प उभे राहतात, हे करणार, ते करणारच्या मनोमनी घोषणा पण होतात, पण परत एकदा येतो 'सोमवार' आणि सुरवात होते त्याच त्या कामांना, आणि केलेले संकल्प कितपत आपण पुरे करू शकतो नवीन वर्षात? काही दिवसांपूर्वी मुंबईत असताना मैत्रिणीकडे गेले होते. ती एका टोलेजंग इमारतीत राहते. खाली मुलांना खेळायला पार्क, सुंदर व्यवस्था ,सर्व काही मनासारखे,असे तीच सांगत होती ....तिला तिची एक मुलगी,चांगली नोकरी, मनासारखा संसार....पण चेहरा चिंताक्रांत वाटला. म्हंटले,' काय ग कसले प्रश्न पडले आहेत का?काळजीत वाटतेस'....म्हणाली "आहेच ग, दिवस कसा संपतो कळत नाही, आधी नोकरी करत न्हवते तेव्ह...

सुधारणा विशेष --- समाजाला खरच हे कायदे उपयोगी कि दिखाऊ!

इमेज
SUPREME COURT OF INDIA सकाळी उठले तेव्हां खूप साऱ्या विचारांची गर्दी झाली होती मनात, परवा एका मैत्रिणीशी बोलता बोलता जाणवले कि मातृभूमी बदलत चालली आहे.माझी मैत्रीण सुद्धा इकडे परदेशातच आहे. आम्हीं देशाबाहेर पडलो त्या दिवशी मातृभूमीचे ते दर्शन मनात चित्रित झाले, ते कायम राहिले.नंतर इतक्यांदा गेले देशात पण पाउल पहिल्यांदा बाहेर टाकले तेव्हाचा भारत लक्षात राहिला आहे.किती बदल!आणि का.....योग्य अयोग्य,अनेक प्रकारचा,सगळे जगच जिथे बदलते आहे,तिथे हे आलेच! सुधारणा !म्हणून; इकडच्या काही गोष्टी ज्या खरच बरोबर आहेत त्या अनुसरणे बरोबर ठरले असते पण ते न करता ज्या गोष्टी आपल्याला नुसते modern,HI -FI, काहीतरी वेगळे करतो आहोत हि जाणीव देते तितकेच फक्त घेतो आहोत असे वाटले. 'एकत्र कुटुंब पद्धती',मग 'हम दो और हमारे दो' आणि आता सिर्फ 'हम दो ' ह्या जमान्यापर्यंत तर आलो खरे,ह्याही पुढे जाऊन मी ऐकले आहे कि,पाश्चिमात्य देशांतून घडत गेलेली कल्पना 'लिवि...

!!!! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं !!!!

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत! हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून, गात रहा; आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा. झुळझुळणार्‍या झर्‍याला मनापासून ताल द्या; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. कवी – मंगेश पाडगांवकर

माझी मी

इमेज
कधी कधी असा विचार करते कि 'मी कशी आहे?'प्रत्येक व्यक्तीला मी वेगळी वाटते....सर्वांना जाणवणारे असे काही स्वभाव गुणधर्म आहेत ....पण खरी मी कशी आहे हे कोणाला माहित?आहे,पण फक्त मला. कारण ते असे शब्दात सांगता येते का,किती सारया गोष्टी असतात स्वतःला माहित,वाटते पण त्या सांगता येत नाहीत,का येत नाहीत तर वाटून गेले ते सगळे मनातले उघड नसते.किती सारे अनुभव गाठीशी असतात....आणि ते जिवंत अनुभव खूप काही शिकवून जातात.काय महत्वाचे असते जगण्यासाठी,रोजच्या आपल्या उठण्या बसण्यात लहान मोठ्या अनेक गोष्टी घडत असतात. आपल्यासाठी एखादी खूप महत्वाची वाटणारी गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची असेलच असे नाही.सगळे मनासारखेच होते असे नाही आणि ह्यात पण एक गम्मत आहे.मग आपण विचार करतो,आपल्या मेंदूला खाद्य मिळते.असं नक्की का झाले असेल,माझे काही चुकले असेल का,कि हा पण एक अनुभव असं समजून राहावे,शांत राहावे,जे घडून गेले ते घडून गेले,त्यावर विचार करून काहीच मिळत नाही. तसेच आनंदाचे क्षण येतात आणि मग स्वतःचा विसर पडतो,एखाद्या वेळी अचानक स्नो पडू लागला कि जसे वाटते एकदम गार आणि नवीन,जिवंत झाल...

! पाऊस असा हा रुणझुणता !

इमेज
आज सकाळी नेहमीसारखी उठले , बाहेर सूर्यनारायणाने दडी मारलेली दिसली , आणि ' नभ मेघांनी आक्रमिले ' चा अनुभव आला . काळोख दाटून आलेला आणि पावसाची सर नुकतीच येऊन गेलेली ... परत येण्याची चिन्ह होती . हा इकडचा , कॅनडा चा पाऊस पाहिला कि खरच गम्मत वाटते . कधीतरी अगदी एखाद दुसरी सर आली तरीही , इथल्या लोकांची तारांबळ उडते . रेन बूट्स , छत्र्या , रेन कोटस घेण्यासाठी shopping centers,mall मध्ये थोडीशी गर्दी दिसते इतकंच त्या पावसाचे कौतुक ! छत्री उघडे उघडे पर्यंत म्हणता म्हणता पाऊस गायब होतो , आणि मग घरी येई पर्यंत पाऊस नाही .. कधी कधी अचानक येऊन भिजवून जातो खरा पण जाणवत पण नाही इतके कारण , घरी येईपर्यंत तुमचे कपडे बरयापैकी सुकलेले असतात , पण इकडच्या लोकांना एकाद दिवस जर थोडा जास्त पाऊस पडला तर कोण कौतुक वाटते त्याचे !' rainy day ' म्हणून त्या दिवसाचे नामकरण केले जाते . मग घरात बसून कंटाळा येतो अश्या दिवशी म्हणून shopping centers मध्य...