हे बंध रेशमाचे....
हे बंध रेशमाचे .... मैत्री एक नाते ... प्रत्येकाला एक तरी मित्र वा मैत्रीण असते , असावी ... अशी सखी , जी तुमच्या सर्व गुणदोषांसकट तुम्हाला समजून घेते . तुमच्या मनातले पण तिला कळते ,अगदी कधी कधी न मागता पण अनेक गोष्टी ती देते ..... अस कोणीतरी इतका मनापासून आपल्यासाठी काही करत असते . आपण पण प्रयत्न करत असतो तिला आपल्याला काय वाटते ते दिसावे , कळावे ह्याचा , रोजच्या व्यवहारात , वेळ काढून अगदी ठरवून कधी एखादा फोन येतो तिचा किती आनंद होतो मनाला! असं वाटते कि खरच पलीकडे त्या फोन वर माझी सखी आहे जिला जाणून घ्यायचे आहे कि मी कशी आहे आणि मलाही कि ती कशी आहे ..... किती सारया गोष्टी अगदी लहान लहान , आणि प्रश्न जे खूप मोठे वाटतात तिच्याशी वाटून घेताना सोपे वाटायला लागतात . तिचे हसणे , खेळकर बोलणे आणि मुख्य म्हणजे मला समजून घेणे .... मैत्रीण ह्या नात्याला पुरे...