सांजगारवा....

'तिच्या' निजेला चंद्र हासरा
रजनी गुणगुणते 'त्याचे' स्वर
'तिच्या' पापणी मध्येच दिसते
ते 'त्यांचे' घर ते 'त्यांचे' घर....

लाल रुपेरी कौलारू परि,

आणि नेटके सुरेख अंगण.
अंगणी आहे तुळस आगळी
प्राजक्ताचे सडे लांबवर...

दरवाज्यावर तोरण हलते,
रंग भिंतीचे, 'त्याचे' मीपण.
सुगंध उदबत्तीचा येता
विसरून जाते 'ती' 'तिजला' पण...

खिडकीपाशी,पडदे निळसर,

सर्व असावे
मनाजोगते
'त्याचे' हास्य अन 'तिचे' लाजणे
अल्लड,अवखळ आणि निर्मळ....

यावा नेहमी 'सांजगारवा'

हरवून जावी सारी कलकल
फक्त उरावे 'दोघांमधले'
क्षणिक अंतर क्षणिक अंतर....

-श्रिया (मोनिका रेगे)-

टिप्पण्या

  1. यावा नेहमी 'सांजगारवा'
    हरवून जावी सारी कलकल
    फक्त उरावे 'दोघांमधले'
    क्षणिक अंतर क्षणिक अंतर....


    खूप गोड कविता आहे गं....

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद चैताली!,तुझी दाद माझ्या कवितेला मिळाली खूप आनंद वाटला!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ