! वर्ष २०११ चे स्वागत असो !
परत एकदा येणारे नवे वर्ष हसून स्वागत करणारे,हात पसरून जवळ बोलावणारे आणि जुन्या वर्षाचा सर्वांना विसर पडलेला,तो क्षण,तो दिवस,जवळ,जवळ येणारा,त्या दिवसाची संध्याकाळ हवी हवीशी वाटणारी ३१ डिसेंबरची संध्याकाळ,नाताळचे दिवे आणि मग नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत, दर वर्षी ठरलेला हा सोहळा!
किती सारे जुन्या वर्षाने आपल्याला दिले.काय आपल्याकडून घेतले?काही अवघड प्रसंग,अचानक झालेले लाभ,आनंदाचे अनेक क्षण,तसेच काहींना भेटलेले आघाताचे दुर्दैवी क्षण,काही तरी हरवल्याची जाण, कुठेतरी काही नसल्याची जाणवत राहणारी खोच, धनलाभ, वास्तु सुख,नवीन नोकरी, एक न दोन अनेक आनंदाच्या बातम्या! हे मागील वर्ष जाताना पूर्णपणे कधीच जात नसते, आपल्याला देऊन जाते फक्त येणारे नवीन वर्ष! पुन्हा एकदा चालून आलेली नवी संधी,परत एकदा एक नवी सुरवात,नवे संकल्प, जुन्या अनुभवांनी दिलेले शहाणपण घेऊन जाते नव्या वर्षातल्या नव्या अनुभवांकडे. हि वाट कधीही न संपणारी असते.
वर्ष कसे गेले कळलेच नाही न! पटापट महिने जातात, आणि मग जाणवते कि अरेच्या! आले कि नवे वर्ष! तोच आनंद सोहळा, तेच 'Happy New Year ' चे गेट टुगेदर', त्यातला जल्लोष, उमेद, आनंदाचे तुषार उडवणारे हास्य, नवीन वर्षाच्या धुंद आगमनासाठी केलेली आतिषबाजी, हे सुखाचे क्षण किती लहान वाटतात न ! उंच शिखरावर अलगद उतरत जाणाऱ्या ढगांसारखे हे 'नूतन वर्ष' आपल्या ओंजळीत येते रात्री १२ वाजता ,३१ तारखेला,आणि आता अनेक नवीन कल्पना,नवीन कामे, हातात घेण्यासाठी येते १ तारीख.
नव्या वर्षाचे नवे संकल्प! ह्या वर्षी कोण काय संकल्प करते आहे,कोणाच्या आयुष्यात काय नवे येणार आहे, ह्यासाठी आपसुखच मन तयारी करू लागते.भिरभिरणाऱ्या मनाला आशेचे नवे पंख घेऊन येते नवीन वर्ष! मी सुद्धा काही छान गोष्टी ठरवल्या आहेतच, तुम्हां सर्वानसारख्याच! आणि प्रयत्नपूर्वक हे नवे संकल्प पूर्ण करण्याचा विचार आहेच!
"आपणा सर्वांना हे नवे 'वर्ष २०११', सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य घेऊन येवो हि प्रभू चरणी प्रार्थना!""तसेच सर्व नवीन उपक्रमांसाठी आपणा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा!!!"
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
उत्तर द्याहटवाआपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाधन्यवाद योगेश,तुम्हाला पण नूतन वर्षाभिनंदन!
उत्तर द्याहटवानवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....
उत्तर द्याहटवाअपर्णा,तुला पण नवीन वर्षासाठी भरभरून शुभेच्छा !!!!अशीच छान छान लिहित राहा.....
उत्तर द्याहटवा