'दूरदर्शन शाप कि वरदान?'

          लहानपणी  शाळेत असताना निबंधाचे विषय मिळायचे आणि एक त्यातला आठवतो ''दूरदर्शन एक शाप कि वरदान?'त्यावेळी लहान होते आणि अर्थात दूरदर्शनचे आकर्षण नवीन असल्यामुळे खूप वाटायचे अश्यावेळी त्या निबंधात मी काय लिहिले असेल ह्याचा तुम्हीं अंदाज लावू शकालच! त्यावेळचे काही लक्षात राहिलेले कार्यक्रम म्हणजे छायागीत,गजरा, चिमणराव आणि नंतर जेव्हां हिंदी कार्यक्रमांना सुरवात झाली तेव्हां चे 'नुक्कड','ये जो हैं झीन्दगी' हे काही कार्यक्रम आठवतात.तेव्हां दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम आणि मग रात्री ठराविक वेळ दिल्ली दूरदर्शन चे कार्यक्रम असत.
 
          सद्यस्थिती पाहता,दूरदर्शन वरील वाहिन्या,आणि त्यावरील वेगवेगळ्या मालिका हा एक मोठा चर्चेचा विषय आहे,TV सेट आज घराघरात दिसतात एक वेळ 'तुळशी वृंदावन' दिसणार नाही पण TV मात्र आहेतच..
सर्वांचेच विश्व ह्या TV भोवती थोड्या बहुत प्रमाणत फिरते.. मोठ्यांना नोकरी व्यवसाय सांभाळून,जो वेळ मिळेल त्या वेळात आवडत्या मालिका बघणे हा एक रोजचा कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम चुकतच कामा नये हा असा एक नियम असतो.....बऱ्याचश्या घरांमध्ये मुले देखील कार्टून network च्या अधीन झालेली दिसतात.आजी आजोबा पण आता करणार काय दुसरे,म्हणून मालिका पाहताना दिसतात.


          ह्या वाहिन्या किती बरे असाव्या?खूप आहेत, हे tv फ्लायर निरख्ल्यावर कळले.मी भारतात गेले असताना एक मैत्रिणीकडे सहज विचारले तर कळले कि झी TV  हे भारतातील काना कोपरयात गेलेले आहे कारण वेगवेगळ्या प्रांतीय भाषांमध्ये प्रसारित केले जाते,ऐकून खरच छान वाटले! अनेक उत्तम मालिका पण आहेतच प्रश्नच नाही!
 
         कित्येक कार्यक्रम असे आहेत जे नियमित पाहावेत, आणि मनोरंजन करावे पण एक आणखीन वाटले TV हा शेवटी आपण लावण्यावर आहे, त्याची कळ दाबली तरच तो चालू होणार, आणि remote हातात घेऊन बसले कि मग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले विचार TV सोबत फिरणार.


        आजची गृहिणी नोकरी करू लागली आहे अनेक वर्ष घर आणि नोकरी अगदी उत्तम तर्हेने सांभाळून दाखवते आहे.यंदा भारतात आलेला एक अनुभव सांगते आहे.एक माझी मैत्रीण नोकरी करणारी अगदी छान जॉब ,मनासारखा, आणि वेळ पण अतिशय उत्तम कुठेच तिला जास्त वेळ थांबावे लागत नाही,ठरलेल्या वेळी घरी यायचे आणि मग घरातले पाहायचे,२ मुले त्यांचा homework ,घरातली कामे आवरून मग TV अगदी न चुकता साधारण १ ते १. ५तास,विरंगुळा म्हणून ती TV बघते,अगदी रोज. मला आठवले,आम्हीं दोघी शाळेत एकत्र असताना चिकार खेळायचो,शाळा सुटल्यावर खेळ कमी, पण मनातून मात्र आजही जुन्या आठवणी गेल्या नाहीयेत, तिला विचारले ,"काय ग तुझी मुले खेळतात कि नाही? वाढत्या वयात काय physical activity आहे त्यांना? तर म्हणे अगं सगळा दिवस शाळेत,आणि खेळ थोडा अभ्यास जास्त,त्यात क्लास्सेस,आणि मग सांग मला कि घरी आल्यावर शाळेचा अभ्यास करणार कि खेळणार?बरे त्यांना पण थोडा change नको का? म्हणून मग म्हणते पहा TV हरकत नाही"कॉम्पुटर games ,TV ह्यात त्यांना आनंद मिळतो मन शांत होते. बरे वाटते ग त्यांना.",मला मनात विचार आला,खरच;किती म्हणून बदलले आहे न जग! 

                TV  बाबा बघतात कारण त्यांना news पहायची असते, आई आजी मालिका पाहतात, आजोबा पण सर्वांमध्ये मिळून मिसळून असतात, आणि मुले ती तर कार्टून network पाठी.भारतात फक्त भारतीय वाहिन्या नाहीत तर जगभरातले कार्यक्रम दिसतात.हे कार्यक्रम तुम्हीं तुमच्या प्रांतीय भाषेत पण सहज पाहू शकता हे बघून खूप आनंद वाटला.आता काही कार्यक्रम जे चांगले ज्या लोकांना इंग्लिश येत नसेल त्यांना हिंदीत अगर मराठीत जर हे पाहता आले तर काय वाईट आहे! History channel , Discovery,Animal planet ,आणि अशी आणि पण काही चान्नेल्स आहेत जी मातृभाषेत दिसतात हे मात्र चांगले आहे. पण चांगल्या सोबत वाईट पण येते तसे काहीसे ह्या TV चे झाले आहे हे नक्की!

          आता आधीच रोजच्या जीवनात प्रत्येकाला अनेक प्रश्न आणि ताण तणाव असतात, हे
पूर्णपणे कमी होत असतील TV पाहून,  तर उत्तम! ,पण TV वरील मालिका ज्या मी पहिल्या भारतात  असताना त्या तरी पाहून मला उलट त्यावर प्रश्नच पडले होते. त्या कथा पण अश्या गुंफतात कि पुढील वेळी पण ती मालिका पहिलीच गेली पाहिजे,मनात ह्या मालिकांचे विचार आहेत हे जेव्हां २ मैत्रिणी आपापसात बोलतात तेव्हां जाणवते कारण मग आवडत्या मालिकांवर गप्पा होतात.त्या दोघी स्वतःसाठी काय करताहेत? त्यांच्या आयुष्यात TV चे प्रभुत्व किती आहे? आपले छंद , आवडीनिवडी जपणे, मुलांना चांगल्या गोष्टी वाचून दाखवणे, फिरायला घेऊन जाणे, काहीतरी नवीन शिकवणे, शिकणे, घरात पतीसोबत शांतपणे गप्पा मारणे, मनमोकळ्या विचारांची देवाणघेवाण, ह्या सर्व गोष्टींसाठी वेळ असतो का? फलाहार हा आरोग्यासाठी चित्रहारापेक्षा महत्वाचा आहे असे मला वाटते! लहानपणी आई जेवण झाले कि फळे कापून ठेवायची सर्वांनी मिळून मस्त गप्पा मारत फळे खायची...आता हा फलाहार TV पुढे चालतो त्यात फळे किती आवडीने खाल्ली जातात आणि कधी TV बघता बघता फळ संपते कळतच नाही....कित्येकांकडे जेवण पण TV कार्यक्रम बघत चालते.
            

             TV जेव्हां न्हवते तेव्हां लोकांच्या मनोरंजनाची साधने काय असतील असे वाटले होते, तो काळ पण वेगळा होता, पण तेव्हाचे संध्याकाळचे प्रत्येक घरातले वातावरण किती वेगळे असेल न! एकमेकांसाठी प्रत्येकाकडे  वेळ असेल,मुलांच्या आयुष्यातला संध्याकाळचा वेळ खेळ,पाठांतर,वाचन ह्यात जात असावा, आजी आजोबांसोबत गोष्टी ऐकत जात असावा वेळ.TV चा पगडा न्हवता.
 

            
             मनोरंजनाचे साधन म्हणून TV कडे पाहावे. TV हि गरज नको व्हायला! सर्वांची मते अशीच असतात पण मग किती कमी लोक अमलात आणताहेत!आणखीन एक अनुभव, गम्मत वाटली होती,एका दुसरया मैत्रिणीकडे गेले होते,भारतात आले कि तिची भेट नेहमी होतेच.बाईसाहेब इतक्या TV च्या मालिकांमध्ये गर्क कि मला वाटले मी TV पाहण्यासाठीच तिच्या घरी गेले आहे कि काय! असो...

               

                वरदान म्हणाल तर आहे नक्कीच, कारण प्रसार माध्यम म्हणून,जगभरात काय चालले आहे त्या सर्व गोष्टी घरी बसून दिसतात, घराघरात आज सगळे जग पोहोचले आहे TV मूळे. हे आपल्याला लाभलेले वरदान शाप ठरू नये ह्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवा,TV हे व्यसन ठरू नये.मनोरंजनाचे,ज्ञानवर्धनाचे साधन ठरावे असे वाटले.आपले विश्व आपला वेळ हा खूप मौलिक आहे हा सत्कारणी लावणे महत्वाचे असते नाहीका! आई वडिलांनी जर सुरवात केली तर मग नक्कीच पुढची पिढी पण जागरूक होईल ह्यात शंका नाही!
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )


टिप्पण्या

  1. तुम्ही लिहिलत T.V. च्या नाद असलेल्यांबद्दल. तुमचा हा ब्लॉग वाचनारे आम्ही इंटरनेट चे नादिक. माणसाला कुठला ना कुठला नाद, छंद असलाच पाहीजे. फक्त जणी निंद्य ते सर्व सोडून द्यावे आणि जणी वंद्य ते सर्व भावे करावे हे लक्षात आल म्हणजे झाल. नेट वर बसण्यासाठी मिळालेल्या वेळेत जर तुम्ही इतक छान लिहीत आहात तर हा झाला सदुपयोग.. विचार पटले आपल्याला. शेवटी तुमच्या लेखाचा उद्देश हाच की "अती सर्वत्र वर्ज्य"

    उत्तर द्याहटवा
  2. dhanyavad .मी आज पहील्यांदाच या साइट ला विज़िट दिली आहे. छान वाटल म्हणून मग माझाही एक ब्लॉग आजच तयार करून टाकला. आता मी अजुन या प्रकरणात तसा पहिलितच आहे अजुन. पण शेवटी माणूस वाचूनच शिकतो ना लिहायला. बघा जमलायका ते.
    http://dineshd9765.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा
  3. हो नक्कीच,कुठेतरी सुरवात करावी,आणि मराठीत लिहिणे उत्तम....तुमच्या ब्लॉग साठी शुभेच्छा !!!

    उत्तर द्याहटवा
  4. खरंय TV गरज नको व्हायला
    पण काही गोष्टी गरजेच्या असतात ...जसे कि थेट प्रक्षेपाणातल्या बातम्या . आणि मला अजूनही आवडतात त्या दूरदर्शन वरच्या संध्याकाळच्या ७ च्या बातम्या ...ज्यामध्ये सर्वकाही कळत असे. घरातले सार्वजन त्या आवर्जून बघायचो आणि अजूनही बघतो...मनोरंजन म्हणून नाही अर्थात :)

    उत्तर द्याहटवा
  5. अशा निबंधासाठी शेवटी एक Disclaimer द्यायला लागायचा- '..... शाप की वरदान हे ठरवणं आपल्याच हातात आहे', अजुनही तो नियम लागू होतो

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ