वाचू आनंदे !
प्रश्न आणि उत्तरे ह्या सगळ्याचा खेळ आहे शेवटी जीवन म्हणजे....आणि एका प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण करत राहतो आपण.एकदम सगळे सगळे बदलून टाकण्याची खुमखुमी असते न आपल्यात! मनासारखे झालेच पाहिजे आणि नाही झाले तर मग खूप वाईट वाटते.नव्या उमेदीने परत एकदा प्रयत्न करणे कमी जमते कारण असा पण विचार करतो कि इतकी मेहेनत पाण्यात गेली आणि मग नकारात्मक वृत्ती सकारात्मकतेला मागे टाकू लागते...अश्या वेळी खरच लागतो एक मदतीचा हात, आता हा हात नेहमीच मिळेल असे नाही पण आपले रोजचे व्यवहार,त्यातले येणारे नावडते अनुभव,ह्या सर्वातून आपण एकटेच मार्ग काढत असतो कि! मग कधी अचानक आलेल्या मोठ्या प्रश्नाला पण आपणच सामोरे का जाऊ नये? उत्तर शोध म्हणजे सापडेल! पण कसे शोध, तर मनातून सर्वप्रथम सगळे नकारात्मक विचार काढावेत.तरच योग्य तऱ्हेने उत्तर जवळ येऊ शकेल.
-श्रिया (मोनिका रेगे )
मध्ये एका लेखिकेचा एक लेख वाचनात आला होता.इतके छान लिहिले होते तिने वाटले कि प्रत्येकाने जर तसे वागण्याचा प्रयत्न केला किंवा काही त्यातले अंगिकारले तरी पुरे, लेखाचे नाव होते 'चला सुखी होऊया!'आपले आयुष्य सुखी होऊ शकेल,आपल्या एकट्याच्या आनंदाला महत्व देणे योग्य का? तर आपल्या आनंदातून जर आपल्या विश्वातले सर्व जण आनंदित होत असतील तर मग आपल्या आनंदाला महत्व दिलेच पाहिजे नाहीका?
मनाला शांत ठेवण्याचे काही उपाय म्हणजे नियमित व्यायाम,खेळ,अगदी किमान अर्धा तास जरी दिवस भरातला व्यायाम जमला तरी उत्तम! त्याच प्रमाणे मोकळ्या हवेत रोज फिरायला जाणे, रात्रीची निवांत झोप आणि दिवस भरातला थोडासा वेळ काढून योगसाधना करणे, प्रार्थना करणे ..
आपला आहार हा देखील तितकाच महत्वाचा आहे. मनाला तजेला मिळेल अश्या वातावरणात सर्वांनी घेतलेले सहभोजन, ह्यात कच्च्या भाज्या पालेभाज्या फळ भाज्या शिवाय योग्य प्रथिने जातील असा आहार घेणे, भरपूर पाणी पिणे हे देखील तितकेच महत्वाचे.सकाळी जी न्ह्यारी होते ती भरपूर आणि योग्य असावी,दुपारचे जेवण मध्यम प्रकारचे तर रात्री दोन घास कमीच खावेत.
वर्षाच्या सुरवातीला काही नियम करून घेऊ काही चांगल्या सवयींमध्ये वाचन आणि आपण कोणती चांगली पुस्तके वाचली ह्याची नोंद करत जाऊ. नवीन वर्षाचे नवीन संकल्प करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या स्वभावात काही बदल करता येतो का पाहू, ज्या आपल्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, बदलल्या तर काहीतरी चांगले घडेल असे असेल तर का बदल करू नयेत? आपल्यात चैतन्य,स्फूर्ती, आणण्याचा प्रयत्न करू.
लोकनिंदा टाळून,तोच आपला वेळ हा आपण आपले वर्तमान कसे उज्ज्वल करू ह्यासाठी प्रयत्न करून सत्कारणी लावायचा का? हे जीवन खूप छोटे आहे त्यात सतत गंभीरपणा न आणता हसा आणि हसवा असे राहिलो तर उत्तम! हसण्याने आयुष्य वाढते म्हणतात! आजकाल धावपळीच्या आयुष्यात काही छंद जोपासून पाहावे.आपली तुलना आपल्या शेजाऱ्याशी कधीच करू नये, म्हणायला कोणाशीच करू नये कारण दुसऱ्याच्या जागी जाऊन त्याच्या बरोबर काय घडते आहे;हि खरी परिस्थिती आपल्याला काय ठाऊक? मत्सर,राग,द्वेष,ह्यापासून लांबच राहू.
आपल्या सोबत जे आपले लोक आहेत त्यांच्या चुका, क्षमाशीलता दाखवून जर माफ करता आल्या तर ह्याहून मोठे काय असेल! आणि किती पण कठीण प्रसंग आला तरीही त्याला धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करू. जे आपल्या हातात नाही,जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही,त्या बद्दल न हळहळता जे आपल्याकडून जमेल ते,करून आपले आयुष्य सुकर आणि आनंदी करणे महत्वाचे आहे नाहीका?
आपल्यामुळे जर चार लोक आनंदी होऊ शकत असतील तर आपल्या सकारात्मक शक्तीचा योग्य उपयोग करून आपण हा सुखाचा मार्ग इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवावा.बदलत्या काळाची गरज आहे कि आपले जीवन आपणच सुखी करू शकतो, आपले तणाव, आपणच कमी करू शकतो कारण हा 'मदतीचा हात' आणखीन कोणाचा नाही तर आपलाच आहे, हे लक्षात घेऊ.
हे जे सगळे वर मी लिहिले त्यात काही विचार माझ्या दाताच्या डॉक्टरचे पण आहेत बरका! डॉक्टर खूप मस्त गप्पा मारतात,आणि उद्बोधक पण बरंच सांगतात, अर्थात आपल्याला त्यांच्या कडे गेलेलं असताना बोलता काही येत नाही फक्त ऐकावे लागते इतकंच, पण माझी ह्या रविवारची दाताच्या कामाची appointement सत्कारणी लागली अस म्हणावे लागेल कारण, दाताचे काम तर झालेच पण शिवाय अनेक उत्तम विचार पण कळले, आणि मन प्रसन्न झाले!
एक कविता सुचली होती मला ती इकडे देते आहे....वरील post साठी खास !
आपणच आपल्याला सांभाळायचा असते,
पडलो तर उठून उभे राहायचे असते,
'नेहमीच सगळे मनासारखे कसे घडेल?'
नेहमीच सगळे मनासारखे कसे घडेल! हे पक्के मनाशी बांधायचे असते,
आपणच आपल्याला सावरायचे असते.
प्रत्येक पावलाला आपल्या साथ मिळालीच पाहिजे असे नाही..
प्रत्येक हाकेला आपल्या 'ओ' मिळेलच असेही नाही...
म्हणून चालणे थांबवता येत नाही,हाकारणे पण बंद करता येत नाही.
धीर सोडून जगता येत नाही, कारण पळपुटेपणा करता येत नाही.
आहे त्यात मानावे समाधान, प्रयत्न करावा नेहमीच पण
नामुष्कीला देऊ नये स्थान.
मन घट्ट करून निर्णय घेणे सोपे नसते पण
जगात राहणे निर्धाराने हवे असते...
प्रत्येकाचा आनंद महत्वाचा ठरतो...
आणि आपल्या आनंदातच तो सामावलेला असतो..
बाप्पाने देह दिला तसे मनही दिले
दोहोंना निरोगी ठेवूया
चला कामाला लागुया
शर्थीने प्रयत्नाने आनंदी राहूया!
पडलो तर उठून उभे राहायचे असते,
'नेहमीच सगळे मनासारखे कसे घडेल?'
नेहमीच सगळे मनासारखे कसे घडेल! हे पक्के मनाशी बांधायचे असते,
आपणच आपल्याला सावरायचे असते.
प्रत्येक पावलाला आपल्या साथ मिळालीच पाहिजे असे नाही..
प्रत्येक हाकेला आपल्या 'ओ' मिळेलच असेही नाही...
म्हणून चालणे थांबवता येत नाही,हाकारणे पण बंद करता येत नाही.
धीर सोडून जगता येत नाही, कारण पळपुटेपणा करता येत नाही.
आहे त्यात मानावे समाधान, प्रयत्न करावा नेहमीच पण
नामुष्कीला देऊ नये स्थान.
मन घट्ट करून निर्णय घेणे सोपे नसते पण
जगात राहणे निर्धाराने हवे असते...
प्रत्येकाचा आनंद महत्वाचा ठरतो...
आणि आपल्या आनंदातच तो सामावलेला असतो..
बाप्पाने देह दिला तसे मनही दिले
दोहोंना निरोगी ठेवूया
चला कामाला लागुया
शर्थीने प्रयत्नाने आनंदी राहूया!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा