एक निवांत क्षण!

आजकालच्या धावपळीच्या जगात, एक निवांत क्षण मिळणे कठीण! स्वतःशी कधी एकांतात बसून गप्पा मारलेल्या स्मरतात का? सकाळपासून रात्री पर्यंतचे घड्याळाच्या काट्यावर धावणारे आपले पाय, आपले विचार, कधी विश्रांती असते का ह्यांना? 'कालनिर्णयाचा' नवा अंक विकत घ्यायला जाताना अचानक जाणवते;कि अरेच्या!, नवीन वर्ष परत इतक्या पटकन आलेच..... एकमेकांना नवीन वर्षाभिनंदन करताना परत सर्वांच्या मनात नवे संकल्प उभे राहतात, हे करणार, ते करणारच्या मनोमनी घोषणा पण होतात, पण परत एकदा येतो 'सोमवार' आणि सुरवात होते त्याच त्या कामांना, आणि केलेले संकल्प कितपत आपण पुरे करू शकतो नवीन वर्षात?

काही दिवसांपूर्वी मुंबईत असताना मैत्रिणीकडे गेले होते. ती एका टोलेजंग इमारतीत राहते. खाली मुलांना खेळायला पार्क, सुंदर व्यवस्था ,सर्व काही मनासारखे,असे तीच सांगत होती ....तिला तिची एक मुलगी,चांगली नोकरी, मनासारखा संसार....पण चेहरा चिंताक्रांत वाटला. म्हंटले,' काय ग कसले प्रश्न पडले आहेत का?काळजीत वाटतेस'....म्हणाली "आहेच ग, दिवस कसा संपतो कळत नाही, आधी नोकरी करत न्हवते तेव्हां वेळच वेळ होता ,कंटाळा यायचा, स्वतःला देऊन वेळ उरायचा, मग वाटू लागले काहीतरी करावे,आपल्या शिक्षणाचा वापर करावा,मनासारखा जॉब मिळाला,तो करू लागले, लेकीचा अभ्यास,चांगली शाळा,मग होमेवोर्क आणि क्लास्सेस ना आणणे सोडणे, धावपळ,सगळा दिवस नोकरी, घरातले काम आणि मुलगी ह्यात कसा जातो कळतच नाही" ...." जुने दिवस आठवतात, प्रगती करता करता स्वतःला असा, "माझा", असा वेळ उरलाच नाही ग!""मुलगी पण बघ, अभ्यास, शाळा, क्लास्सेस आणि मग कंटाळते; तर tv बघत बसते....खेळणे, मोकळे, मैदानी खेळ हे ह्या आजकालच्या मुलांना माहीतच नाहीत.....आई बाबा tv बघतात, मुले पण बघत बसतात. कार्यक्रम त्यांच्या योग्य पण नसतात....सगळ्यांना आपला विचार असतो.आई म्हणते, मला माझे कार्यक्रम हवेत, बाबांना त्यांचे, मग मुले पण कार्टून बघत बसतात.....नियम असा राहत नाही, आणि मग अर्थात सगळेच असा करतात तर ती एक fashion होऊन बसली आहे आणि मग बाहेर जाऊन खेळणे हे तर खूप कमी दिसते आहे"

मैत्रिणीशी त्या दिवशी बोलून तिच्या मनातले कळले. हा प्रश्न फक्त तिचाच नसावा तर आजकाल सगळ्याच नोकरदार वर्गाचा हा प्रश्न असणार.स्वतःला स्वतःसाठी आपण कितीसा वेळ देतो आज? खरच हा वेळ गरजेचा आहे का ?आणि कितीसा द्यावा? होय, हा वेळ गरजेचा आहे कारण हे 'टॉनिक' आहे म्हणाना! प्रत्येकाला जसे Vitamins लागतात तसेच हा स्वतःचा स्वतःसाठी काढलेला वेळ खूप महत्वाचा आहे. आईवडिलांना स्वतःसाठी वेळ देताना स्वतःचे छंद जोपासताना पाहून मुले देखील नक्कीच स्वतःला वेळ देतील...

काय करावे ह्या मोकळ्या वेळेत? अगदी तुम्हाला जे आवडेल, जे जमेल ते.....माणसाला कित्येक छंद असतात,कविता वाचन,लेखन, संगीत,चित्रकला,व्यायाम, ,नवीन पदार्थ बनवणे,सहलीला जाणे, treking ,पोहणे, मस्त गप्पा मारत कट्ट्यावर बसलेल्या मैत्रिणींचा ग्रुप .......हे काही छंद झाले, असे बरेच काही आहे जे दैनंदिन जीवनात बदल घडवून आणू शकते. चाकोरीबद्ध आयुष्यात सगळे जग महत्वाचे असते. नोकरीच्या ठिकाणी, घरात,आणि समाजात आपल्या संपर्कात येणाऱ्यांचा आपण विचार करतोच, आणि केलाच पाहिजे, पण स्वतःचा विचार पण करून पहा.....आणि बघा एक दिवस जरी थोडा वेळ काढता आला स्वतःसाठी आठवड्यातून;तरी पुष्कळ समाधान गाठीला बांधता येईल!! ......आणि मग चेहऱ्यावर हे 'समाधानाचे अंकुर' रुजवून तुम्हीं जेव्हां बाहेर वावरल तेव्हां त्या स्मिताचे पडसाद सर्वत्र उमटतील....आपले एक हास्य बराच बदल घडवून आणू शकते आपल्या आयुष्यात, आणि आपल्या सहकार्यांच्या आयुष्यातही!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ