आज श्री दत्त जयंती. बालपणी आम्ही चौल भोवाळे येथील दत्ताच्या जत्रेला जात असू. बालपणीच्या विश्वात जत्रेला जाणे म्हणजे एक आनंदाचे देणे असायचे.मोठ्यांच्या सोबत कधी बैलगाडीतून,कधी रिक्षा,काही प्रवास पायी,आणि मग देवळापर्यंत पायऱ्या.अर्थात आमचे लहानगे जग त्या जत्रेतील वेगवेगळी आकर्षणे,विविध खेळ,डोंबारी,माकडाचे खेळ,भिंगर्या,फुगे,पिपाण्या, उसा चा रस,लाकडी खेळणी,काचेच्या बांगड्यांची दुकाने त्यांचा पेट्रोमॅक्सच्या पिवळ्या प्रकाशात होणारा चमचमाट डोळ्यात भरून राहायचा! जादूचे प्रयोग तेही असायचे.'मौत का कुआँ' ह्यात,आम्ही सर्व जण एक खोल लाकडी विहिरीसारख्या गोल आणि खोल जागेभोवती बाकडी, मंडप टाकून बसलेलो असायचो आणि एक किंवा दोन मोटरसायकल स्वार त्या लाकडी विहिरीत त्यांच्या गाड्या न आपटता, न पाडता गोल गोल फिरवायचे.ते पाहताना अचाट कौतुक वाटायचे त्यांचे!आम्हा लहान मुलांना,"बच्चे कंपनी ताली बजाव "असा आदेश आला की तिथे जोरदार टाळ्या वाजायच्या. खारे शेंगदाणे,चणे फुटाणे,चना चोर गरम,भज्यांचे विविध प्रकार ह्यांचा घमघमाट हवेतल्या गुलाबी थंडीत पसरलेला असायचा! चहा कॉफीची लहान टपरी असायची.आम्ही जे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा