सुधारणा विशेष --- समाजाला खरच हे कायदे उपयोगी कि दिखाऊ!
सकाळी उठले तेव्हां खूप साऱ्या विचारांची गर्दी झाली होती मनात, परवा एका मैत्रिणीशी बोलता बोलता जाणवले कि मातृभूमी बदलत चालली आहे.माझी मैत्रीण सुद्धा इकडे परदेशातच आहे. आम्हीं देशाबाहेर पडलो त्या दिवशी मातृभूमीचे ते दर्शन मनात चित्रित झाले, ते कायम राहिले.नंतर इतक्यांदा गेले देशात पण पाउल पहिल्यांदा बाहेर टाकले तेव्हाचा भारत लक्षात राहिला आहे.किती बदल!आणि का.....योग्य अयोग्य,अनेक प्रकारचा,सगळे जगच जिथे बदलते आहे,तिथे हे आलेच!
सुधारणा!म्हणून; इकडच्या काही गोष्टी ज्या खरच बरोबर आहेत त्या अनुसरणे बरोबर ठरले असते पण ते न करता ज्या गोष्टी आपल्याला नुसते modern,HI -FI, काहीतरी वेगळे करतो आहोत हि जाणीव देते तितकेच फक्त घेतो आहोत असे वाटले. 'एकत्र कुटुंब पद्धती',मग 'हम दो और हमारे दो' आणि आता सिर्फ 'हम दो ' ह्या जमान्यापर्यंत तर आलो खरे,ह्याही पुढे जाऊन मी ऐकले आहे कि,पाश्चिमात्य देशांतून घडत गेलेली कल्पना 'लिविंग टुगेदर',आता त्याला भारतात परवानगी देण्यात आली आहे कायद्याने....कायद्याला माफ करा आणि कृपया डोळे उघडे ठेवा,विचारांची दालने बंद करू नका हे सांगण्याची वेळ आली आहे का?हा कायदा भारतात पास होण्यापूर्वी अश्या तऱ्हेचे 'लिविंग टुगेदर' अनुसरले गेले असावे. माझी मैत्रीण तिने ह्या गोष्टीला अर्थात साफ नाकारले हे कसे चूक आहे ते सांगत होती ती.
असे का घडते आहे, सांगणे कठीण नाही पण नेहमीच जे नाकारले जाते आहे जे वेगळे वाटते आहे ते करून बघण्याकडे समाजाचा नाही म्हंटले तरी कल असतो.आणि आता तर ते कसे बरोबर हे पटवून पण देण्या इतकी म्हण्याला स्वतःचे स्वतः ठरवण्या इतकी सुधारणा भारतात घडते आहे .
आदर्श,चांगले लोकांसमोर ठेवणे न करता नुसती मनोरंजनाच्या नावाखाली चाललेली दंगामस्ती,उत्श्रुन्खलपणा, विनोद,अश्याने भरलेले आजचे चित्रपट,आता काही उत्तम चित्रपट पण आहेत पण खूप कमी.Originality का जपत नाहीत कळत नाही मला. नकला करायच्या, आणि मग कौतुक करून घ्यायचे त्याचे. चुकीच्या गोष्टींचा प्रसार ह्याप्रभावी माध्यमातून का केला जातो?किती साऱ्या गोष्टी व्यवस्थित करता येऊ शकतील पण कोणीच प्रयत्न नाहीये कारण सगळेच आपापल्या जगात व्यस्त आहेत! एका मोठ्या जगात प्रत्येकाचे आपले लहानसे विश्व.पूर्वी सगळे काही मिळत नसले तरी आपण भारतात originality जपून होतो. संस्कारांची originality, ......... 'अनुसरण कायदा 'आला न! खरेतर हा कायदा लोकांनी आणला. कपडे बदलले, सुरवातीला," नुसते कपडेच बदलले न! फार काय केले आम्हीं?"असे काही जण म्हणू लागले,"त्याने काय होईल काहीच नाही! आमचे विचार बघा आम्हीं योग्यतेच ठरवतो कुठे काही चूक नाही", कोट टोपी धोतर जाऊन 'shirt pant' आली खरी पण ती मग आता प्रताप दाखवून गेली.
आवड म्हणून अनुसरणे आणि कायम स्वरूपी म्हणून अनुसरणे ह्यात फरक आहे नक्कीच!
कळत नाही नक्की काय वाटून घ्यावे ह्या अश्या नवीन कायद्यांचे .....'समलिंगी विवाहांना परवानगी',अजून एक कायदा ,त्याही वर जाऊन अश्या जोडप्यांना दत्तक मुल घेता येईल असाही कायदा ....कोण जाणे ह्याचे फायदे काय आहेत समाजाला...पण कायदे मात्र अगदी जोरदार येताहेत. लोकजागृती म्हणतात ती हीच का? सगळेच अजब आहे! जुनाट विचार म्हणून ज्यांनी ह्याला विरोध केला त्यांची अवहेलना केली जाते आणि ज्यांनी ह्याला उचलून धरले त्यांच्या मनात पण किंतु असेल कदाचित पण परत तेच कि आम्हीं modern आणि सर्वांचा विचार करणार ह्या भूमिकेतून बदलते चष्मे लावत बदलत्या काळाला matching चष्मे लावावेच लागतात असे समजत पुढे जायचे का?
तुम्हाला काय वाटते?
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

तुमचा लेख वाचल्यावर माझ्याही मनात विचारांची गर्दी झाली म्हणून हा प्रतिसादाचा खटाटोप करत आहे.
उत्तर द्याहटवामी भारतातच मुंबई मध्ये राहतो आणि सर्व बदल डोळ्यादेखत घडत असल्यामुळे माझी मते थोडी वेगळी आहेत.
१] मुळात 'हम दो हमारे दो' हि घोषणा आणि योजना भारताची लोकसंख्यावाढ लक्षात घेऊन केलेली होती आणि त्यावेळी काय अजूनही गरजेची आहेच.
'लग्नाशिवाय एकत्र राहणे' हि गोष्ट सध्यातरी 'सोपा मार्ग' किंवा 'वेगळेपणा' ह्या पलीकडे जाऊन गरजेची झालेली नाही. त्यामुळे एकाच माळेत गुंफल्यासारखे त्यांच्याविषयी बोलणे बरोबर नाही.
लोकसंख्या कमी करणे हि गरज आहे आणि लग्न न करणे हि विचारसरणी आहे जी व्यक्तिपरत्वे बदलू शकते.
पण माणसामाणसातील तुटलेपण आणि जुळवून घेणे हा प्रकार कमी झाल्याची असंख्य कारणे आहेत आणि त्याचमुळे अशा पद्धतीच्या 'एकत्र राहण्याला' काहीतरी 'स्थेर्य' देणे हे कायद्याचे काम आहे असा सार्वत्रिक समाज आहे. यात सुद्धा मेख अशी आहे कि जोडपे विभक्त झाले तर परंपरागत विवाहाप्रमाणे पुरुषाला त्या स्त्रीला पोटगी द्यावी लागते तिचा दुसरा विवाह किंवा जोडीदार मिळेपर्यंत (त्याचे लग्न किंवा दुसरा जोडीदार असेल तरीही). हा नियम त्या स्त्रीला लागू नाही. पण मुळात हि पद्धत अनुसरणारे बहुतांश स्त्री पुरुष आर्थिकदुष्ट्या एकमेकावर अवलंबून नसतात. त्यामुळे हा कायदा 'सुधारणावादी' असल्याचे केवळ ढोंग आहे.
मुंबई आणि आसपासतरी बहुसंख्य तरुण मध्यमवर्गीय मुले आणि मुली लग्न हि गोष्ट अजूनही महत्वाची मानतात आणि हे मान्य करण्यामधेही त्यांना कमीपणा वाटत नाही. 'लग्नाशिवाय एकत्र राहणे' या गोष्टीला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे लग्नसंस्था कमकुवत होईल किंवा मोडीत निघेल या समजुतीला हे चपखल प्रत्युत्तर आहे.
२] 'अनुसरण कायदा' म्हणजे काय ते जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल. पण कपड्यांच्या बाबतीत म्हणाल तर नववार सोडून माझी काकू जेव्हा नोकरी करायला गोल सहावार साडी नेसून जायला लागली आणि काकांनी कल्ले ठेवले आणि शेंडी उडवली तेव्हा हि धर्म बुडाला म्हणून माझ्या पणजीने शंख केलेला होताच. एवढेच काय तर तुम्ही हि समुद्र पर्यटन करून बाहेर गेलात म्हंजे धर्मबाह्य झालात असेच तेव्हा म्हणाले असते. कपडे आणि चालीरीती ह्या गोष्टी कालानुरूप बदलतातच. पण अजूनही हिंदू नववर्ष, रमझान, सणवार आणि धार्मिक सोहळे ह्या वेळी तरुण पिढी आवर्जून परंपरागत कपडे घालते. गुढी पाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा रांगोळ्या, लेझीम यांच्या साथीने आणि मंदिरात जाऊनच साजरी होते. माझ्या वर्गातील मुळीच काय पण मुलेही मोदक पुरणपोळी करणे आणि ठिपक्यांची रांगोळी घालणे ह्या गोष्टी शिकत आहेत आणि तसे करण्यात त्यांना आनंद हि वाटतो.
मालिका किंवा जाहिराती काय पण सिनेमा सुद्धा असंख्य बटबटीत आणि दिखाऊ गोष्टींबरोबर ह्या गोष्टीसुद्धा दाखवतो आणि त्यामधून काय उचलावे हे आमच्या पिढीला बरयापैकी कळते. वाचक आणि दर्शक सुजाण झाल्याचे 'ब्र', 'नातिचरामी' किंवा 'निशाणी डावा अंगठा' यासारख्या पुस्तकांच्या आणि 'माकडाच्या हाती शाम्पैन', 'अवघा रंग एकाची झाला' हि नाटके व 'श्वास', 'जोगवा', 'विहीर' आणि 'गंध' सारख्या चित्रपटांच्या यशामुळे दिसून येते.
३] 'समलिंगी विवाह आणि दत्तक कायदा' हा खरे तर तसा बराच मोठा मुद्दा आहे पण स्पष्ट आणि थोडक्यात सांगायचे तर 'समलैगिकता' हि मानसिक वा शाररीक विकृती नाही असे सध्यातरी सर्वमान्य आहे. शिवाय 'लैगिकता' हि प्रत्येक व्यक्तीची खाजगी बाब आहे हे सत्य आहे. तरीही आपण जिथे राहतो तिथे आपल्या आवडीच्या पर्यायासोबत राहता यावे (अर्थात कुणालाही शाररीक आर्थिक किंवा जीविताची इजा न करता) असे सगळ्यांना वाटते आणि हि गोष्ट अल्पसंख्य समुदायांबाबतीत होत नसल्यामुळे त्यांना कायद्याची मदत घ्यावी लागते.
हे सुद्धा महिला आरक्षण आणि जातीविषयक कायद्यांनी सिद्ध केलेले आहे. व्यक्तीला 'व्यक्ती' म्हणून मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न करणे हि चुकीची गोष्ट आहे असे मला वाटत नाही.
त्याचमुळे ह्या सर्व गोष्टी एका अर्थी लोकांना विचार करायला लावून जनजागृती करत आहेतच. वयानुसार दृष्टी कमकुवत झाली कि चष्मा बदलावा लागतोच अशा वेळी चौकट तीच किंवा तशाच पद्धतीची ठेवलीत तरीही काचा बदलाव्या लागतातच. खरे कि नाही. तुम्हाला काही चुकीचे वाटले तर क्षमस्व आणि लेखाबद्दल धन्यवाद
सुशांत
सुशांत आपली टिप्पणी वाचली,अतिशय विचारपूर्वक,मुद्देसूद लिहिली आहे.....आपले विचार पण पटले....टिपण्णीबद्दल धन्यवाद!
उत्तर द्याहटवा