जाणता राजा...


आपल्या प्रत्येकात एक 'शिव छत्रपती' आहेत....सध्या कुठे हरवले आहेत ते ?
महाराष्ट्राचे सोने करणारा,खरया अर्थाने महाराष्ट्राला जागे करणारा,चैतन्य देणारा आणि स्वातंत्र्य देणारा असा आपला राजा.....आज ह्या राजाची भारताला गरज आहे.
सच्चाई,सचोटी,न्याय,खलांचे निर्दालन,शौर्यं, धिटाई,सर्व गुणांच्या एकत्रीकरणासाठी त्या जिजाऊला किती मेहेनत घ्यावी लागली असेल! आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली ती एक आदर्श माता,महाराजान मधला कणखरपणा, आणि स्वातंत्र्याबद्दलची ओढ,निर्माण करणे हे जणू तिचा जिवित उद्देश्य होते.

आज आजूबाजूला आपल्या देशात अन्यायपूर्ण अश्या अनेक गोष्टी घडताहेत.वर्तमानपत्रातली पाने हि अश्या बरयाच बातम्यांनी भरलेली असतात ज्या वाचून मन अस्वस्थ होते....
सगळीकडे 'भ्रष्टाचाराचे राज्य'...हा आपला शत्रू इतक्या सहजपणे देशात घुसून आतल्या आत देश पोखरतो आहे...."सगळी सिस्टिमच जर बिघडली असेल तर मग मी एकट्याने बदलून काय होईल?" असा मुलभूत प्रश्न सगळे एकमेकांना विचारतात जेव्हां असे विषय चर्चेत येतात. सर्वांसाठी केलेले असे स्वतःचे असे राज्य जे स्वराज्य ते प्रत्येकासाठी आहे; मग, का आपण इतके सुधारूनही आपला देश काही बाबतीत कुप्रसिद्ध आहे?

महाराजांवर एक श्री. देसाई कृत मालिका पाहण्यात आली, मुळातच मला महाराजांचे चरित्र सुरवातीपासून खूप प्रेरक वाटत आले आहे.तो इतिहास मला जगाच्या इतिहासापेक्षा जास्त सच्चा वाटला....ते वय जेव्हां मी महाराजांच्या आयुष्यावर शाळेत माहिती मिळवली तेव्हां लहान होते,पण तरीही बरच काही लक्षात आले आणि राहिले.
नंतर अनेक किल्ले फिरून पहिले तरीही समाधान झाले नाही, आज पण परत एकदा महाराजांवर जेव्हां वाचते तेव्हां तितकेच कुतूहल असते.कशी असेल हि व्यक्ती प्रत्यक्षात? मनाने आणि शरीराने प्रबळ ,सर्वांना एकत्र आणण्याचे अचाट सामर्थ्य बाळगणारी,शत्रूला सळो कि पळो करून सोडणारी, 'गो ब्राह्मण प्रतिपालक' अशी हि व्यक्ती....."छत्रपती शिवाजी महाराज!"
त्यांच्या सामर्थ्याला बुद्धिमत्तेची जोड होती आणि दूरदृष्टी होती.

वाटते आज,आपण इतके पुढे जातो आहोत, विज्ञानाच्या ह्या जगात सगळ्याला वैज्ञानिक दृष्टीकोन देत प्रगती करत आहोत, पण मुलभूत प्रश्न आणि स्वातंत्र्यानंतरही देशाबद्दल,, जे प्रेम महाराजांच्या काळात होते ते आज कुठे दिसत नाही.
प्रश्न सुटत नाहीत कि सोडवायला वेळ नाही कि सोडवायची इच्छा नाही? सगळे आपापले बघताहेत.... आज महाराजांच्या काळातले वातावरण नाही पण तेव्हां जो खरेपणा होता, आणि देशप्रेम होते.....ते आज हवे आहे ....
आपल्या देशाच्या राजकीय नेत्यांनी जर मिळून प्रयत्न केले (जे फार कठीण आहे) तरी काही प्रश्न तरी नक्कीच सुटू शकतील....
महाराजांना नुसते स्मरून काहीच होणार नाही, जोवर त्यांच्यातला एक तरी गुण आपण प्रत्येकाने अंगिकारला नाही तोवर त्या 'हर हर महादेवाचे' स्मरण खरया अर्थाने केले जाणार नाही.....

-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

  1. "आज पण परत एकदा महाराजांवर जेव्हां वाचते तेव्हां तितकेच कुतूहल असते.कशी असेल हि व्यक्ती प्रत्यक्षात? मनाने आणि शरीराने प्रबळ ,सर्वांना एकत्र आणण्याचे अचाट सामर्थ्य बाळगणारी,शत्रूला सळो कि पळो करून सोडणारी, 'गो ब्राह्मण प्रतिपालक' अशी हि व्यक्ती....."छत्रपती शिवाजी महाराज!"
    अगदी अगदी सेम ...
    छान झालीये पोस्ट

    उत्तर द्याहटवा
  2. तुमच्या टिप्पणी बद्दल धन्यवाद सागर......
    मनापासून मनातले लिहिण्याचा प्रयत्न करत असते.महाराजांबद्दल लिहावे ते थोडंच आहे!

    उत्तर द्याहटवा
  3. Agadi kharay tumach mhanan . Pratyekane aapalya antaratle Shiwaji Maharaj jagwayla Pahije. Tilak jagwale pahije, Netaji jagwale pahije Bhagat singh jagwale Pahije pan aapan kay kartoy, Dance India Dance.

    उत्तर द्याहटवा
  4. महाराजांचा दगड बनविण्याचे प्रयत्न जारी आहेत.

    उत्तर द्याहटवा
  5. महाराजांचे कर्तुत्व असे आहे कि जे पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राला आणि देशाला मार्गदर्शक ठरले आहे आणि ठरेल फक्त त्यांचे महाराष्ट्रदेशावरचे प्रेम आणि जनतेवरची भक्ती जर भारतातील शासनाने प्रयत्नपूर्वक पत्करली तर महाराजांचा दगड कधीच होऊ शकत नाही.....कारण ते एक साक्षात जिवंत अमूर्त असे सत्य आहे जे आपल्या संह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेले आहे....

    उत्तर द्याहटवा
  6. खरंय श्रिया..... चबुतरे बांधणं हेच आजकाल आपलं काम झालंय़...त्यावरील पुतळे कधी-काळी जिवंत होते हेच विसरून गेलोय आपण... मग त्यांची तत्वं,त्यांच गुण कधी अंगिकारणार....

    थेट लिहिलंस... आवडलं..!!

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद चैताली,तुला माझं post आवडले हे पाहून आनंद वाटला.मनातले महाराज जेव्हां अन्याय पाहतो तेव्हां जागे होतात खरे पण प्रत्येकाला आपल्या सामर्थ्यावर विश्वास हवा आणि तो जेव्हां निर्माण होईल तेव्हां खर्या अर्थाने काही घडू शकेल.....असा विश्वास आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ