पोस्ट्स

2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Google Buzz ला राम राम.

इमेज
               Google Buzz ला राम राम.....आज पासून बझ्झ दिसत नाहीये.  बरेच काही  असे ह्या 'buzz बाबाने' दिले जालावरले,लिहिलेले वाचलेले काही लक्षात राहिलेले,असे हे बझ्झबाबा.गुगल बाबांनी ह्यांना एक संधी दिली लोकांपर्यंत गुगलप्रेमी जनतेपर्यंत येऊ दिले.मग बझ्झबाबा प्रसिद्ध झाले आणि मार्गी लागले.अनेक चाहत्यांनी त्यांना उचलून धरले.त्यांचे नाव सर्वत्र ऐकू येऊ लागले.जालावर अनेक बझ्झप्रेमी निर्माण झाले आणि नुस्ता  बझ्झ बझाट  झाला...इकडे गप्पा,लहानसहान वाद,एक एका शब्दाचा वाक्याचा,एखाद्या गाण्याचा,छान कथा किंवा कवितेचा बझ्झ पडायचा....सकाळी आपापल्या कामावर गेलेल्या मंडळींनी कामाला खरी सुरवात  करण्याआधी ह्या 'बझ्झला' सुरवात केलेली असायची.....चहाची वेळ आणि बझ्झ ची वेळ एक होऊ लागली अनेकांची.अनेक संवाद सुरु होत आणि संपत बझ्झ वर....जालाच्या किमयेत बझ्झ नवीन माध्यम.एक प्रकारचे संवाद माध्यम आणि ह्याने अनेकांना माहितीपूर्ण असे काही मिळवून दिले.          पण आपल्या गुगलबाबांना मात्र पुढे पुढे जायची खोड आणि न...

'कोलावेरी दी'

इमेज
                         ही 'कोलावेरी दी' नक्की काय भानगड आहे असा पहिला प्रश्न मला पडला होता.....मग ते गाणे जसे आपल्या प्रत्येकाकडे अलगद Facebook ने आणून ठेवले तसेच माझ्याकडे पण आलेच....ते गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हां खूप वेगळे वाटले होते,त्याची रिदम आवडली...ताल आवडला.हे गाणे म्हणजे नुसते शब्द,आणि ते अर्थ लावत लावत एकात एक  नुसते गुंतलेले,ह्यात नीटसे lyrics म्हणतात तसले काही नाहीच.गाण्याच्या सुरवातीलाच गायक म्हणून आपल्याला ऐकणाऱ्यांना हे सांगून सावध करतो कि हे फ्लॉप सोंग आहे,,'एका प्रेमात असफल झालेल्या व्यक्तीचे गाणे'.'कोलावेरी दि' म्हणजे 'प्रचंड चीड','घातकी राग'मग ह्यामधील तमिळ शब्दासाठी शोधाशोध झाली थोडी,पण जालाच्या कृपेने ते पण सहज मिळाले.अगदी कोणी पण हे गाणे सहज पाठ करून म्हणू शकते.लगेच काल परवा सोनू निगम च्या मुलाने हेच गाणे आपल्या बालिश आवाजात गाऊन दाखवलेले (शेवटच्या कडव्यातले शब्द बदलून--- अगदी लहानग्या वयासाठी योग्य करून )परत एकदा You Tube च्या कृपेने पाहायला मिळाले,जे सर्वांनी उचलून धरले....   ...

नवे घर....

इमेज
        नवीन जागा,नवीन घर,सगळे आजूबाजूचे वातावरण बदलणार हे नक्की,पण आधीच्या घराचा सहवास अगदी भिंतन भिंत आणि कोपरान कोपरा ओळखीचा झालेला.पहिले पाऊल टाकले ते ह्याच घरात इकडे आल्यावर,,त्यामुळे आता इतक्या दिवसांची,म्हणायला वर्षांची सवय मोडून पुढे जायचे,'सवय मोडून' हा शब्द अगदी जाणवतो आहे...मनाला काहीतरी वेगळेपण,मोठा बदल होणार आहे ह्याची जाणीव होते आहे..हे न,सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत होते,नाहीका?प्रत्येकाच्या बाबतीत,मात्र वेगवेगळ्या गोष्टींची सवय झालेली मोडायची,वेगवेगळे अनुभव.        आपली घरातली स्वयंपाक खोली.विशेष ओळखीची माझी अशी,आता तिच्यातल्या सगळ्या लहान गोष्टी,भांडी रिकामे करून नीट एका ठिकाणी करायचे,त्या खोलीला पण त्या भांड्यांची,माझी सवय झाली असेल असे कुठेतरी वाटले.स्वयंपाकघर,तिकडे अगदी उत्तम पाककृती पासून अगदी साफ वाट लागलेल्या पाककृती पर्यंत अनेक अनुभव.नवीन आणलेल्या भांड्यांचा सेट,ते लावलेले  स्वयंपाकघर. घरातली प्रत्येक खोली छान लावलेली,सगळे समान आता परत बांधायचे..घरातली पुस्तके एकत्र करून ठेवणे,जुने सामान काही त्यातले देऊन टाकणे...

Festival of Lights....

इमेज
                                                         सर्व वाचकांना दिवाळीच्या   शुभेच्छा  !!          दिवाळीची गोष्ट सर्व दिवाळीच्या दिवसांचे महत्व आणि दिवाळी एक प्रमुख सणांपैकी म्हणून वाटणारे अप्रूप! दर दिवाळीची मजा वेगळीच! सुटीचा आनंद,आणि दिवाळीच्या तयारीतला उत्साह.घराघरातले वातावरण आणि दुकाने रस्ते सगळीचकडे 'आली दिवाळी' तयारीला लागा अशी नांदी असते.भारतात असताना दिवाळीचा एक वेगळाच अनुभव होता संपूर्ण दिवाळी म्हणता येईल अशी आठवणीत राहिली नेहमीसाठी!          लहानपणापासून प्रत्येक दिवाळी सर्वांसोबत साजरी केली. सगळे जवळचे एकत्र जमत आणि हा सण उत्साहात साजरा होत असे. घराला  रंग देण्यापासून ते दिव्यांनी घर झगमगून जाईपर्यंत,आकाश कंदिलाची शोभा,पणत्यांची गच्चीतली रोषणाई,फटाक्यांचे आवाज,आकाशात अचानक दिसणारा प्रकाश आणि डोळे भरून दिव्यांना पाहता पाहता मनात देखील अनेक रंग...

द्वंद्व

इमेज
                       जिवंतपणी कधी कधी माणूस स्वप्न पहातो.असे सत्य,जे स्वप्नासारखे भासणार पुढे जाऊन,ह्याची त्याला कल्पना पण नसते.कोणाचे तरी अस्तित्व एका क्षणापासून खूप महत्वाचे होते.कोणाची तरी चाहूल पण हृदयाची धडधड वाढवून जाते. आठवणीने डोळे पाणावतात आणि स्वर ओलावतात....अचानक हवेत सुगंध पसरतो आणि तो क्षण हलकाफुलका वाटू लागतो.पिसासारखा आणि देखणा.हे असे एक न दोन अनेक क्षण, जेव्हां जवळ असतात आणि ते क्षण देणारे कोणी निघून जाणार असते कधी न भेटण्यासाठी कधी न बोलण्यासाठी,काय वाटून घ्यावे हे ठरवण्या आधीच ते वाटू लागलेले असते.विचार झोपू देत नाहीत,डोके सुन्न होते आणि मोकळा श्वास घेता येईनासा होतो.डोळ्यात प्रश्न आणि मनात शब्द गर्दी करतात.सगळे तेच गोलगोल फिरत राहते.एक दिवस एक चक्रीवादळ येते.उलथून टाकते सगळे,केलेले विचार,एकत्र ठरवलेले कार्यक्रम.एकाच वाऱ्याच्या तुफान जोराने असा तडाखा बसतो कि परत चुकून कधी असा विचार येणार नाही मनात असे मनच समजावते मनाला.अश्रू पिऊन बसलेले डोळे सुके आणि निष्क्रिय बनतात.काही ओलावलेले क्षण कापत राहतात ...

पाऊस सख्या रे!

इमेज
डोंगर माथ्यावर जसा,रेंगाळतो पाऊस  तसा तुझा माझा होऊन, उरतो पाऊस  आपल्या हास्यातून  उधाणतो  पाऊस  अन अश्रूतून  गहिवरतो  पाऊस.... रे !आपल्या पावसाला  उनाडूदे  थोडे. त्याला ढगातच अडकू दे थोडे, त्याचे येणे अचानक होऊदे  अन जाणे पण सावरूया थोडे.... माझ्यातला पाऊस,तुझ्याहून वेगळा  हलकाफुलका कवितेतला आगळा  तुझ्या माझ्यातल्या  एकरूपतेतला  हरखून जाणारा लाजरा पाऊस... तुझ्यातला पाऊस धीट,जशी चमकणारी वीज  तुझ्यातला पाऊस गडगडत,अलगद विसावणारा  अल्लड,बालिश पण  संततधार  थोडा हट्टी,पण चिंब आनंद देणारा .... 'तुझे असणे',असा फक्त माझा पाऊस... 'निरंतर बरसणे' नको विसरून जाऊस वाटले कधी जावे निघून तर,एकदाच हो, माझ्या  'आठवणीत राहील इतके कोसळणारा पाऊस'....           -श्रिया (मोनिका रेगे ) -- 

" ती "

इमेज
तिच्या डोळ्यातला पाऊस होऊन बरसत राहावे,कधी हर्षाचा कधी खेदाचा.. कधी तिच्या ओठातले बोल होऊन  सांडत राहावे तिचे काव्य तर  कधी भावना बनून ... कधी तिचा हळुवार स्पर्श  व्हावे, अलगद मोरपिसासारखे फुलारून यावे,बहरून यावे... तिच्या केसांची बट बनून लहरावे,तिने सावरता  पटकन नाठाळ होऊन  अजून विस्कटून जावे.... कधी तिची वस्त्र बनून  तिलाच अलगद बिलगावे.... तिच्या नकळत तिच्या सौंदर्याचा  भाग बनून उरावे..... तिच्या आरक्त पावलांची  कधी व्हावी रक्तिमा  तिच्या भाळीची चंद्रकोर  खुलताना कधी पाहावे ... तिचा गजरा बनून कधी  राहावे तिच्या केसात  आभूषण बनून लखाखून टाकावी तिची कांती... मग तिच्या रागात, तिच्या  क्लेशात, उद्विग्नतेत उरावे तिचा आत्मविश्वास बनावे कधी   पाहावे तिला परत सावरताना ... अहं बाजूला ठेवून तिला  ओळखावे, कधी समजावे. तिच्यासाठी तिच्या शब्दांसाठी आनंदासाठी जगत राहावे...           ...

वाढदिवसाची भेट!

इमेज
  एक असामान्य प्रतिभेचे प्रतीक असे हे 'भेट कार्ड'                   प्रत्येकाचा वाढदिवस एक 'खास दिवस',आयुष्यात अनुभवांनी भरलेले असे अजून एक वर्ष कमी झाले;कि पुढे जाण्यासाठी एक वर्ष,आणखीन   पुढे गेले , मोठ्यांचे शुभाशीर्वाद लाभले!..ह्यातील हवे ते म्हणू शकतो आपण.घरातल्या घरात पूर्वी हा दिवस साजरा होत असे.आज सुद्धा कित्येकांच्या घरात असाच हा घरातल्या घरात साजरा होतो....आई ओवाळते,घरातले सगळे आशीर्वाद देतात गोडाचे जेवण होते..आणि हा आनंदाचा दिवस सर्वांच्या मनात उरतो.ह्या दिवशी काहींच्याकडे  वेस्टर्न कल्चर कडून घेतलेले गाणे"Happy Birthday to you !!" सगळे गात वाढदिवस असलेल्याच्या भोवती जमतात,केक कापून मग शुभेच्छा देऊन केक खाण्यासाठी आणि चेहेऱ्याला लावण्यासाठी वापरण्यात येतो....मग घरातली पार्टी किवा हॉटेल मध्ये देण्यात येणारी मोठी 'बर्थडे पार्टी'....हे हल्ली बऱ्याच ठिकाणी दिसून येते.                 माझ्या लहानपणी माझ्या काही सवंगड्यांना ह्या दिवशी घरी बोलावून सर्वांना छान छान खायला आण...

'श्रीयुत गंगाधर टिपरे' एक आगळी वेगळी मालिका!

इमेज
टिपरे कुटुंबीय फक्त शलाका दिसत नाहीये          आपले'आबा'आपल्याला आपलेसे करून घेणारे आबा. आबा म्हणजे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'....टिपरे कुटुंबियांमध्ये अग्रणी आणि सर्वांच्या मनात घर करून राहिलेले असे.दूरदर्शनवरील लक्षात राहिलेल्या काही मालिकांमध्ये 'श्रीयुत गंगाधर टिपरे'ही श्री केदार शिंदे दिग्दर्शित...एक मालिका विशेषकरून लक्षात राहिली     मला.'झी मराठी'वर दाखवण्यात येणाऱ्या ह्या मालिकेतले आबांचे व्यक्तिमत्वच तसे आहे! ह्या भूमिकेत श्री.दिलीप प्रभावळकर ह्यांनी अप्रतीम कामगिरी केली आहे.       ही मालिका श्री प्रभावळकर लिखित"अनुदिनी"ह्या पुस्तकावर आहे...हे पुस्तक उत्कर्ष  प्रकाशनाने  १९९८ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केले होते.श्री.प्रभावळकर लिखित ह्या आबांच्या व्यक्तिमत्वाचे खरच कौतुक करावेसे वाटते,हे असे धोतर घातलेले आजोबा,शिस्तीचे पण तरीही प्रेमळ,स्वतःच्या मुलाला सुनेला सांभाळून घेणारे,वेळी योग्य मार्गदर्शन करणारे,नातवंडांचे लाडके आबा....            ही दरवेळी काहीतरी नव...

संजीवनी

        एक अशीच संध्याकाळ.ढग दाटून आलेले.गार वारा सुटलेला,खिडकी हलत होती.अलगद येणाऱ्या वाऱ्यामुळे पडद्याची होणारी हालचाल.वाऱ्याचा झोत आला कि पडदा आतल्या दिशेने खोलीत लहरत होता.नाजूकसा पडदा,नावाला पडदा,त्याच्या आवडीचा रंग असलेला.पाऊस पडेलसं वाटत होते पण अचानक ढग कमी झाल्यासारखे,वाऱ्याचा वेग वाढल्यासारखा.खिडकी तशी जुनी पण अजूनही मजबूत.जुन्या लाकडाची तावदाने,काचा बसलेली,चौकोनी काचा.खिडकीवर कुठूनसे आलेले एक कबुतर हलकेच बसले येऊन.त्याचे पंख त्याने पिसारयासारखे फुलवून अलगद मिटले इकडे तिकडे पाहत आपल्या लुकलुक लाल डोळ्यांची हालचाल करत मानेवरची पिसे हलवत ते पण विसावले होते येऊन त्या खिडकीवर थोडा वेळ.                  खिडकी जवळची खुर्ची त्याची नेहमीची जागा.त्याचे गिटार वाजवताना ती खेचून खिडकीजवळ घेऊन बसायचा.कधी खुर्ची समोरच्या टेबलावर अर्धवट बसून पण संगीतसाधना चालायची...मूड वर असायचे त्याच्या.आवाज इतका साथ देत नसला तरी संगीत मात्र होते जवळ.पण आज खुर्ची नेहमीच्या जागी होती व्यवस्थित.टेबलवर काही कागद वाऱ्यामुळे इकडे तिकड...

Second last Date

इमेज
                    अलगद वाऱ्याने उडून तरंगत येणारे पान तिच्या जवळ येऊन पडले.गार वाऱ्याची झुळूक येऊन गेली आणि परत एक दोन पाने त्या वाऱ्याने सावकाश खाली आणली.आजूबाजूची झाडे रंग बदलणारी पाने आणि शिशिर ऋतूचे ते रूप तिला आवडायचे..आठवड्यातला हा एक दिवस बरच काही घेऊन यायचा दोघांसाठी आणि देऊनही जायचा दोघांना.हवेतला गारवा,शब्दांची देवघेव,मस्त काहीतरी खादडायला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक जपलेले असे नाते.गेली अनेक वर्ष उनपावसाळे बघत एकत्र प्रश्न सोडवत उत्तरांना सापडली नाहीत तर शोधून काढून एकमेकांना सोबत करत आली होती दोघे.         ' ह्या पानांचे आयुष्य संपले असावे' असा स्वतःशीच विचार करत तिने ती सगळी पाने एकत्र  केली.बसल्या बसल्या झाडाच्या सावलीत शांत एकांत.स्वतःशीच मनातल्या मनात संवाद.त्याची येण्याची वेळ ठरलेली पण कधीच वेळेत यायचे नाही असा त्याचा नियम.आणि त्यावर काहीच बोलायचे नाही असा तिचा नियम..तेव्हढ्या वेळेत तिला नेहमीच आधी येण्याचा आणि वेळ भरपूर मिळण्याचा एक फायदा म्हणजे काहीतरी मनात ठरवून ठेवता या...