Google Buzz ला राम राम.


      
        Google Buzz ला राम राम.....आज पासून बझ्झ दिसत नाहीये. बरेच काही असे ह्या 'buzz बाबाने' दिले जालावरले,लिहिलेले वाचलेले काही लक्षात राहिलेले,असे हे बझ्झबाबा.गुगल बाबांनी ह्यांना एक संधी दिली लोकांपर्यंत गुगलप्रेमी जनतेपर्यंत येऊ दिले.मग बझ्झबाबा प्रसिद्ध झाले आणि मार्गी लागले.अनेक चाहत्यांनी त्यांना उचलून धरले.त्यांचे नाव सर्वत्र ऐकू येऊ लागले.जालावर अनेक बझ्झप्रेमी निर्माण झाले आणि नुस्ता बझ्झबझाट झाला...इकडे गप्पा,लहानसहान वाद,एक एका शब्दाचा वाक्याचा,एखाद्या गाण्याचा,छान कथा किंवा कवितेचा बझ्झ पडायचा....सकाळी आपापल्या कामावर गेलेल्या मंडळींनी कामाला खरी सुरवात  करण्याआधी ह्या 'बझ्झला' सुरवात केलेली असायची.....चहाची वेळ आणि बझ्झ ची वेळ एक होऊ लागली अनेकांची.अनेक संवाद सुरु होत आणि संपत बझ्झ वर....जालाच्या किमयेत बझ्झ नवीन माध्यम.एक प्रकारचे संवाद माध्यम आणि ह्याने अनेकांना माहितीपूर्ण असे काही मिळवून दिले. 

        पण आपल्या गुगलबाबांना मात्र पुढे पुढे जायची खोड आणि नवीन शोध लावायची सवय,त्याचा परिणाम म्हणजे 'गुगल प्लस'.....ह्याच्या आगमनाने गुगलबाबा आनंदले आणि अर्थात बझ्झ वरील कृपा मात्र कमी झाली त्यांची. बझ्झबाबा लवकरच समाधिस्थ होणार आहेत हि बातमी जालावर हाहा म्हणता पसरली.सर्वांना रुखरुख लागली,पटत नव्हते पण गुगलबाबांचा निर्णय कायम होता.
           
        आता हे अचानक का झाले ते मात्र सांगणे कठीण.सर्व बझ्झप्रेमींना तितकेसे ते पटले नाही...राहिले असते बझ्झ तर काय झाले असते? पण बझ्झबाबा म्हणाले,"सर्वांना संधी दिली पाहिजे.नवीन येणाऱ्या मंडळींना देखील पुढे काही करायचे प्रोत्साहन दिले गेले पाहिजे" हेच जर आपल्या देशातल्या राजकारण्यांनी केले तर किती बरे....सहज आपली जागा एखाद्या होतकरू नवीन कल्याणकारी समाजाच्या कार्यकर्त्याला देणे सोपे नाही न! सहज उत्पन्न मिळणारे सोडून देणे सोपे नाही,जनतेचे प्रेम अचानक कमी होईल असे का बरे ह्यांना वाटते कोण जाणे! पण स्वार्थाची भाषा जालावर गुगलबाबांनी केली नाही,ना बझ्झबाबांना येते, गुगल प्लसबाबा आले त्यांचे पण स्वागत केले केले गेले.....

          बझ्झबाबा कि जय! ह्यांना आपण सगळे हरवून बसणार आहोत, आजपासून हे दिसत नाहीयेत.....पण त्यांची समाधी हि चिरकाळासाठी  आहे का?कि काही काळ, ते मात्र सांगता येत नाहीये.त्यांच्या चाहत्यांना आता त्यांच्या  स्मृती राहतील.धमाल बझ्झबझाट लक्षात राहील.....बझ्झ कट्टा प्रेमींना बझ्झ आठवत राहील! 
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
             

टिप्पण्या

  1. Never used Buzz .. so, don't know what you people will be missing :-(

    Savita
    (aativas)

    उत्तर द्याहटवा
  2. सविता ताई Google Plus म्हणून'Buzz'सारखेच असलेले,'Buzz'चे जुळे भावंड म्हणता येईल असे application आले आहे,बघ..साधारण तसच आहे....perhaps you may like it.

    उत्तर द्याहटवा
  3. Yep, using Google Plus ... but almost all those friends on FB are also on G+ .. so, in the end the world remains limited and I keep on repeating myself!!

    उत्तर द्याहटवा
  4. Savita tai...you are absolutely right....G+ is helping us as an extra tool to keep in touch with our friends....but then our world is limited and we keep on repeating ourselves......but still I liked Buzz better....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ