वाढदिवसाची भेट!
![]() |
| एक असामान्य प्रतिभेचे प्रतीक असे हे 'भेट कार्ड' |
प्रत्येकाचा वाढदिवस एक 'खास दिवस',आयुष्यात अनुभवांनी भरलेले असे अजून एक वर्ष कमी झाले;कि पुढे जाण्यासाठी एक वर्ष,आणखीन पुढे गेले,मोठ्यांचे शुभाशीर्वाद लाभले!..ह्यातील हवे ते म्हणू शकतो आपण.घरातल्या घरात पूर्वी हा दिवस साजरा होत असे.आज सुद्धा कित्येकांच्या घरात असाच हा घरातल्या घरात साजरा होतो....आई ओवाळते,घरातले सगळे आशीर्वाद देतात गोडाचे जेवण होते..आणि हा आनंदाचा दिवस सर्वांच्या मनात उरतो.ह्या दिवशी काहींच्याकडे वेस्टर्न कल्चर कडून घेतलेले गाणे"Happy Birthday to you !!" सगळे गात वाढदिवस असलेल्याच्या भोवती जमतात,केक कापून मग शुभेच्छा देऊन केक खाण्यासाठी आणि चेहेऱ्याला लावण्यासाठी वापरण्यात येतो....मग घरातली पार्टी किवा हॉटेल मध्ये देण्यात येणारी मोठी 'बर्थडे पार्टी'....हे हल्ली बऱ्याच ठिकाणी दिसून येते.
माझ्या लहानपणी माझ्या काही सवंगड्यांना ह्या दिवशी घरी बोलावून सर्वांना छान छान खायला आणि मग मेणबत्या लावलेला केक त्या फुकून त्या वेळी सर्वांनी टाळ्या वाजवून दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! लहानपणी ह्याचे कौतुक वाटायचे.सवंगड्यांनी आणलेल्या भेटवस्तू ह्या सर्वाचे विशेष वाटायचे..नवीन कपडे आणि त्या दिवशी घरातल्या सर्वांकडून होणारे खास लाड,आणि एक मस्त जेवणाचा बेत.माझ्या आवडीचे आई बनवायची.हे असे वाढदिवस ७ वर्षांची होईपर्यंत साजरे झालेले आठवतात.नंतर घरात आई आजी आजोबा बाबा आणि बहिणी सोबत वाढदिवस साजरे केले.मोठेपणी ह्या दिवसाचे महत्व कळू लागले.मुंबई पुण्याकडे राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकांकडून येणारी वाढदिवस निमित्त पाठवलेली कार्ड,पण हि देखील लहानपणी आलेली आठवतात...ती भेटकार्ड मी ठेवली पण आहेत.लहानपणी घरी आईने बनवलेला केक आणि भेट वस्तू आणि ह्या दिवसाचे एक नाते मनात रुजले होते.तो दिवस हवाहवासा वाटायचा तेव्हां,ह्या गोष्टींसाठी !!एक धमाल यायची.
नंतर मोठेपणी शाळा कॉलेज,मग वाढदिवशी एक वेगळे वातावरण.'बर्थडे पार्टी'तीपण बाहेर..आम्हीं काही मैत्रिणी मिळून चित्रपटाला पण जात असू..आज आठवतो तो आम्हीं५जणींनी मिळून साजरा केलेला माझा वाढदिवस!बाहेर छानश्या हॉटेल मध्ये जेवण आणि मग एक सर्वांच्या आवडीचा चित्रपट पाहिलेला! लक्षात राहिलेले असे ते आणखीन काही वाढदिवस! ते दिवस परत येत नाहीत हि जाणीव जरी असली तरी ह्या वाढदिवसांनी मला तेव्हां खूप काही दिले इतके दिले कि आज देखील त्या दिवसांनी दिलेले 'ते' गिफ्ट न उघडताच ठेवावेसे वाटते मला!
आईने बनवलेल्या घरघुती केक मध्ये जी माया होती,ती आज बाहेरून आणलेल्या केक मध्ये निश्चितच नाही.वाढदिवशी मोठ्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतलेले आज पर्यंत सोबत आहेत.आजीने हनुवटीला धरून केलेले कौतुक आणि नवीन कपडे आईच्या मागे लागून मिळवलेला एखादा सलवार कमीज घालून फिरण्यात जी मजा होती ती खासच!
ह्या वर्षी जो माझा वाढदिवस मी साजरा केला..त्यात अनेकांच्या शुभेच्छा मिळाल्या,अनेकांचे आशीर्वाद देखील लाभले.घरातल्यांचा उत्साह त्याबरोबरच माझा पण ओसंडत होता..बेत साधा केला होता...तसा घरातल्या घरातच वाढदिवस केला,पण ह्या दिवशी एक 'भेटकार्ड' आई बाबांनी पाठवले,जे मला सर्वात मोठी भेट वाटले.ह्या कार्डाची खासियत अशी कि 'हे कार्ड हात नसलेल्यांनी रंगवलेले असे सुंदरकार्ड आहे'.ज्याचे छायाचित्र वर देत आहे.ह्या सर्व कलाकारांनी बनवलेली हि कार्ड विकून त्यांची मेहेनतीची खरी कमाई,आपल्या अपंगत्वावर असा मिळवलेला एक विजय पाहून मनात आदर निर्माण झाला.आपण देवकृपेने धडधाकट निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असतो.वाढदिवशी आपल्याला ह्याची जाणीव होते.ह्या कार्डाने मला अचानक ह्या दिवशी ह्या कलाकारांच्या कलेचे त्यांच्या जिद्दीचे आणि मेहेनतीचे जे दर्शन घडवून दिले त्यामुळे माझा वाढदिवस खरच सार्थकी लागला असे म्हणावे लागेल!
हा खरच माझ्या आयुष्यातला Happy Happy Birthday ठरला हे नक्की ! ...
ह्या कार्ड चे छायाचित्र तर सर्वांना नक्कीच आवडेल.आणि त्याच्याबद्दल माहिती असलेली वेबसाईट खाली देत आहे.ह्या कलाकारांचे कसब ह्या साईट वरील त्यांच्या कलेचे नमुने पाहून आपणा सर्वांना जाणवेलच!खालील वेब साईट जरून पहा...
www.imfpa.co.in

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.काय योगायोग आहे बघ माझ्या ब्लॉगवर नेमका केक आहे...घेतलास का?
उत्तर द्याहटवाया कार्डावरून आठवल मला यावेळी आईबाबांनी बाबा आमटेंच्या आश्रमातून बरीच कार्ड पाठवली आहेत..तिथल्या आजारी माणसांनी बनवलेली..इतकी छान आहेत न...अशा माणसाची कला प्रेरणा देऊन जाते ना ग..
सुंदर लेख..आनंद वनातल्या एका मुलीचा व्हिडीओ मी कार्ड वर टाकला होता. त्या मधे ती पायाने सुई दोरा ओवणे, आणि नंतर पेंटींग वगरे करतानाचा व्हिडिओ आहे तो..
उत्तर द्याहटवाश्रिया, खरच 'वाढवणारा' दिवस ठरला की तो तुमच्यासाठी :-)
उत्तर द्याहटवाधन्यवाद अपर्णा!तुझ्या केक ची धमाल वाचली...मज्जाच वाटली! आणि सांगू तू अक्षरश माझ्या डोळ्यादेखत केक बनवत होतीस इतके छान वर्णन केले आहेस...काही ठिकाणी वाचताना हसले पण आणि तुझा केक मस्तच झाला असणार ह्यात वाद नाही!मला त्याच्या चित्रातून तो मिळाला...अगदी माझ्या वाढदिवशी !!!! :)
उत्तर द्याहटवाअरे वा,तुझ्याकडे पण अशी कार्ड्स आहेत का?अश्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे मला खूप महत्वाचे वाटते...तुझ्या आई बाबांनी तुला हि पाठवलेली कार्ड्स खूप सुंदर भेट आहे!हो आपल्याला सर्वांनाच हि अशी भेट प्रेरणा देऊन जाते....
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद महेंद्र माझ्या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे! अरे वा!तुमच्याकडे तर अश्या एका कलाकाराचे चित्रीकरण केलेलं आहे...lucky you !
उत्तर द्याहटवातुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सविता ताई,तुम्हां सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच पाठीशी आहेत...एक आनंदाचा दिवस नक्कीच'वाढवणारा दिवस'ठरला माझ्यासाठी!
उत्तर द्याहटवाहे भेटकार्ड खूपच छान आहे गं.... आणि लेखही छानच... मस्त उजाळा मिळाला जून्या आठवणींना... !!
उत्तर द्याहटवाछान वाटले तुझी प्रतिक्रिया वाचून चैताली....वेगवेगळ्या कला आणि कलाकार....देवाची किमया आणि माणसाला मिळालेले वरदान.पण स्वतःच्या अपंगत्वावर मात करून कला जोपासणे किती कठीण असू शकेल...दुसऱ्याच्या दयेवर न जगता अभिमानाने आपल्या ह्या कलेच्या जोरावर पुढे वाटचाल करणाऱ्या ह्या कलावंतांना खरच मानले पाहिजे! जुन्या आठवणी त्या तर साथ कधीच सोडत नाहीत आणि तुझ्या आठवणींना मी उजाळा देऊ शकले ह्याचा आनंद होतो आहे आता...
उत्तर द्याहटवाकिती सुंदर. विश्वासच बसत नाहीये की हे हात नसलेल्या लोकांनी बनवलं आहे.
उत्तर द्याहटवाहोय इंद्रधनू हे चित्र हात नसलेल्या चित्रकाराने काढले आहे...किती जिवंत आहे न चित्र! मला खूपच आवडले. :)
उत्तर द्याहटवा