Festival of Lights....
सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा !!
दिवाळीची गोष्ट सर्व दिवाळीच्या दिवसांचे महत्व आणि दिवाळी एक प्रमुख सणांपैकी म्हणून वाटणारे अप्रूप! दर दिवाळीची मजा वेगळीच! सुटीचा आनंद,आणि दिवाळीच्या तयारीतला उत्साह.घराघरातले वातावरण आणि दुकाने रस्ते सगळीचकडे 'आली दिवाळी' तयारीला लागा अशी नांदी असते.भारतात असताना दिवाळीचा एक वेगळाच अनुभव होता संपूर्ण दिवाळी म्हणता येईल अशी आठवणीत राहिली नेहमीसाठी!
लहानपणापासून प्रत्येक दिवाळी सर्वांसोबत साजरी केली. सगळे जवळचे एकत्र जमत आणि हा सण उत्साहात साजरा होत असे.घराला रंग देण्यापासून ते दिव्यांनी घर झगमगून जाईपर्यंत,आकाश कंदिलाची शोभा,पणत्यांची गच्चीतली रोषणाई,फटाक्यांचे आवाज,आकाशात अचानक दिसणारा प्रकाश आणि डोळे भरून दिव्यांना पाहता पाहता मनात देखील अनेक रंग भरून जायचे.सगळ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडताना दिसायचा.नवीन खरेदी,रंगीत छान कपडे,मिठाई फराळ,उदबत्त्याचा सुवास,आणि सगळीकडे भरून राहिलेला सण....आपली दिवाळी!
आज परदेशात आल्यावर देखील दिवाळी साजरी करताना तो उत्साह टिकून आहे पण भारतातली दिवाळी इकडे आणता येत नाही न ! जाणवत राहते काहीतरी कमी पडते आहे असे,पण तरीही आठवणी आणि संस्कार पुढे जाणे सांगत असतात.परदेशात,सर्वांपासून लांब येऊन आपण काय हरवून बसतो तर त्याचा एक भाग आहे हे 'सणासुदीचे वातावरण !' इकडे आमची,लहानशीच दिवाळी ! फटाके फराळ दिवे सगळे सगळे आहे पण हि दिवाळी तरीही वेगळीच वाटत राहणार! कारण भारतातली पाहिलेली दिवाळी आठवत राहणारे मन ऐकत नाही न !
दिवाळी सर्वांसाठी घराघरात सौख्य आनंद घेऊन येते अनेक रंगांची सुरेख रांगोळी दारात,फुलांचे तोरण,दिव्यांची माळ, आणि रोषणाई....फराळाचा थाट आणि उदबत्यांचा घमघमाट! घरात पाहुणे मंडळी,सुग्रास जेवण आणि फटाक्यांचा आवाज.....सगळीकडे हर्षाचे वातावरण....आणि सुटी खास!सगळे दिवाळीचे दिवस घेऊन येतात वेगवेगळे व्यंजन आणि रंगीत कपडे.....नवी खरेदी, उत्साह.....नवे वर्ष अनेक उपक्रमांना नवी सुरवात....आपला सर्वांचा खराखुरा सोहळा आपली सर्वांची दिवाळी!
हि दिवाळी आणि नवे वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे,समृद्धीचे,भरभराटीचे, आणि आरोग्यदायी जावो हि सदिच्छा !!!

दिवाळीच्या शुभेच्छा तुलाही श्रिया..
उत्तर द्याहटवापेला अर्धा भरलेला म्हणायचं म्हणून मी काही वेळा म्हणते की इथे दिवाळीनिमित्ताने होणार प्रदूषण नाही....बाकी सगळं आठवणीत नेहमीच राहणार...
धन्यवाद अपर्णा...तुला दिवाळीच्या शुभेच्छा! आपली इकडची दिवाळी प्रदूषण रहित हे अगदी बरोबर...
उत्तर द्याहटवापण त्या फटाक्यांच्या धुराचा विरत जाणारा आकाशातला वास आजही लक्षात राहिला आहे ग!....पहाटे उठून फटाक्यांच्या दणकेदार आवाजात केलेले अभ्यंगस्नान आठवते.दोन्ही कानात बोटे घालूनही ऐकू जाईल असा फटाक्यांचा आवाज,डोळे दिपतील इतकी आतिषबाजी, अर्थात काही हे धूर निर्माण करणारे फटाके सोडले,तर बाकीचे सगळे खूप आवडायचे मला.फटाक्यांची माळ हातात धरून पेटवण्याचे उद्योग आठवतात...:) बाण बाटलीत ठेवून त्याची वात थोडीशी जळते आणि बंद होते,तेव्हां चुलत भावंडे मागून घाबरवायची ते आठवले आणि असले हसू यायचे!! दचकून सुद्धा गम्मत असायची त्या तश्या घाबरण्यात कि फटक्याची वात पेटली कि नाही ह्या संभ्रमात असायचे,ते सुद्धा लक्षात आहे.....आपल्याला वाटते वात पेटली नाही आणि आपण मागे वळून चिडवत असलेल्यांची खबर घेत असतो आणि पटकन तो बाण वरच्या दिशेने झेप घेत असतो आपल्या नकळत....आणि मग कोणीतरी आपल्याला वळवते उंच गेलेला तो बाण दाखवायला...एक न दोन किती साऱ्या आठवणी. दिवाळीवर लिहावे ते कमीच आहे...
श्रिया...
उत्तर द्याहटवादिवाळीच्या शुभेच्छा तुलासुद्धा..
दिवाळीच्या सणाचा जोश तिथे नसेल... पण आठवणी अन त्या परंपरा आठवणे, जतन करणे... अन मुळात ती आस्था मनात असणे हे महत्वाचे नाही का...
ती आस्था कायम राहो या कामने सह दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा ... :)
धन्यवाद सखी
उत्तर द्याहटवातू म्हणतेस तसे मनात भारतातली दिवाळी ठेवून इकडे दिवाळी साजरी करायची.
तंतोतंत पटले.आणि माझ्या आनंदात तुम्ही सर्व जण सहभागी आहातच....
अशीच छान छान लिहित राहा नेहमी आणि एका दिवाळीत तुझ्यासोबत फटाके आणि फराळ :) काय चालेल न?
Happy Diwali to u...
माझ्यासोबत.... फराळ ... रांगोळी... गप्पाटप्पा .. खरेदी ... फोटो .... मैत्रिणी मिळून धिंगाणा नक्की :)
उत्तर द्याहटवासखी