'कोलावेरी दी'
ही 'कोलावेरी दी' नक्की काय भानगड आहे असा पहिला प्रश्न मला पडला होता.....मग ते गाणे जसे आपल्या प्रत्येकाकडे अलगद Facebook ने आणून ठेवले तसेच माझ्याकडे पण आलेच....ते गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हां खूप वेगळे वाटले होते,त्याची रिदम आवडली...ताल आवडला.हे गाणे म्हणजे नुसते शब्द,आणि ते अर्थ लावत लावत एकात एक नुसते गुंतलेले,ह्यात नीटसे lyrics म्हणतात तसले काही नाहीच.गाण्याच्या सुरवातीलाच गायक म्हणून आपल्याला ऐकणाऱ्यांना हे सांगून सावध करतो कि हे फ्लॉप सोंग आहे,,'एका प्रेमात असफल झालेल्या व्यक्तीचे गाणे'.'कोलावेरी दि' म्हणजे 'प्रचंड चीड','घातकी राग'मग ह्यामधील तमिळ शब्दासाठी शोधाशोध झाली थोडी,पण जालाच्या कृपेने ते पण सहज मिळाले.अगदी कोणी पण हे गाणे सहज पाठ करून म्हणू शकते.लगेच काल परवा सोनू निगम च्या मुलाने हेच गाणे आपल्या बालिश आवाजात गाऊन दाखवलेले (शेवटच्या कडव्यातले शब्द बदलून--- अगदी लहानग्या वयासाठी योग्य करून )परत एकदा You Tube च्या कृपेने पाहायला मिळाले,जे सर्वांनी उचलून धरले....
ह्या गाण्याला अर्थ आहे का?असा प्रश्न विचारयला नको.पण ह्यातले जे संगीत आहे ते आणि तो मोकळेपणा ज्या मोकळेपणाने गायकाने ते गीत सहज म्हंटले आहे,मध्ये मध्ये एका वाक्यातले संवाद घालून त्यामुळे हे एक वेगळेच गीत आहे असे वाटले.शब्द सुचतील तसे गाण्यात घातल्यासारखे किवा पेरल्यासारखे वाटतात.ऐकणाऱ्यांना एकदा ऐकून समाधान होत नसावे कारण नाहीतर ते 'हिट लिस्ट' वर आले नसते.सगळीकडे,जगात आता हे गाणे लोक ऐकत आहेत.कित्येकांना हे गाणे मुळीच आवडले नाही असे पण ऐकिवात आले.पण अगदी नेहमीचे नाही पण काहीतरी वेगळेच असे ह्या गीतात आहे,तरुण पिढीला नक्कीच आवडणारं असं काही आहे.वाढत्या वयात,एक धुंदी,मस्ती आणि संगीत हे प्रत्येकाच्या अनुभवात असते.त्या वयात आवडलेली गाणी मोठेपणी आवडतीलच असेही नाही.ह्या ' teenage' मध्ये पुढे जावेसे वाटते,काहीतरी करत रहावेसे वाटते,उमेदीची महत्वाची अभ्यासाची अती महत्वाची अशी हि काही वर्ष.मग असली हलकी फुलकी गाणी अभ्यासाच्या,चढाओढीच्या धावत्या जगात एक आनंद देऊन जातात...वाढत्या वयात शरीरात,मनात,एक संगीत असते,हेच खरे! ह्या गीतात एक धमाल आहे जी सर्वांना लहान होऊन अनुभवावी लागणार आहे!
आता 'कोलावेरी दि' चे रिमेक अनेक येत आहेत,मग त्यात वेगवेगळी मंडळी दिसत आहेत,गाणे सुद्धा थोडे थोडे बदलले आहे....हे बदल पाहून असं विचारायचे का,कि हे गीत इतके कसे काय बदलले?आणि सर्वांना ह्या गीतात बदल करून काय बरे मिळते आहे?एखादं नावाजलेले गीत असते,त्या गीताला जस आहे तसच ऐकणे ह्यात खरा आनंद असतो.जुनी चित्रपटातील प्रसिद्ध गाणी;त्यातली काही इतकी प्रसिद्ध का होतात?आणि ती वर्षानुवर्ष तितकीच का गुणगुणली जातात?त्यांची प्रसिद्धी का इतकी वर्ष टिकते?सगळेच असते त्या गाण्यांमध्ये म्हणून.Masterpiece अशी हि गाणी मनःपटलावर कोरली गेली आहेत.हे धनुष ने स्वरबद्ध केलेले,स्वतः गायलेले आणि स्वतःच्या शब्दात गुंफलेले गाणे सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे पण तसच राहील का आणि ते पण त्या गीताचा अस्सलपणा तसाच टिकून राहील का सांगणे कठीण.
कधी वाटते अशी गाणी काही काळासाठी येतात आणि हरवूनही जातात...अर्थात हे गाणे मला आवडले, इतर गाण्यांहून वेगळे असे काही सापडले.धनुषचा प्रयत्न वाईट नाही.गम्मत वाटली ऐकून,तसं तर एकदा ऐकून थांबले नव्हते सारखे ऐकत होते लागोपाठ,सहज गुणगुणले देखील मध्ये मध्ये नंतर काही दिवस.
एक वेगळा प्रयत्न आहे तमिळ आणि इंग्रजी......असे हे गाणे.
तुम्हाला काय वाटते ह्या गाण्याबद्दल?
सोनू निगम च्या मुलाने,निवानने हेच गीत म्हंटले ती लिंक देण्याचा मोह आवरला नाही .....
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
mala he gane aavadale!! tumhi mhanta tase te fb var aale aani te share pan kele. vegle ase kahi aikayla baghayla milale ki tevdach jara aaplya life madhe change hoto, utsah yeto, ninad maze tari tasech aahe, lekh chhan lihila aahe.
उत्तर द्याहटवाअभिप्रायाबद्दल धन्यवाद रोहिणी ताई तुम्हीं म्हणता तसे हे हलके फुलके गाणे वेगळेपणामुळे आवडून गेले....
उत्तर द्याहटवाकोलावेरी तर भारीच आहे. पण निवान कसला गोड आहे... त्याच्या आवाजात पण मस्त वाटलं :)
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर इंदधनू,आणि निवान इतका धिटाईने गायला आहे हे गीत....मस्तच!
उत्तर द्याहटवाअगदी अगदी ! काहीसे हटकेच आहे. आणि अशीही सोनू निगमची मी गरगरणारी पंखी आहे. ( :D:D ) त्याच्या लेकाने गायल्यामुळे अजूनच सहीच ! :)
उत्तर द्याहटवाभानस श्रुतीसंवेदना ह्या माझ्या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे...:)
उत्तर द्याहटवामी पण सोनू निगमच्या आवाजाची पंखी आहे अगदी तुमच्या सारखीच.....आणि हे गाणे निवानाच्या आवाजातले छान वाटते....