'श्रीयुत गंगाधर टिपरे' एक आगळी वेगळी मालिका!


टिपरे कुटुंबीय फक्त शलाका दिसत नाहीये 

       आपले'आबा'आपल्याला आपलेसे करून घेणारे आबा. आबा म्हणजे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'....टिपरे कुटुंबियांमध्ये अग्रणी आणि सर्वांच्या मनात घर करून राहिलेले असे.दूरदर्शनवरील लक्षात राहिलेल्या काही मालिकांमध्ये 'श्रीयुत गंगाधर टिपरे'ही श्री केदार शिंदे दिग्दर्शित...एक मालिका विशेषकरून लक्षात राहिली     मला.'झी मराठी'वर दाखवण्यात येणाऱ्या ह्या मालिकेतले आबांचे व्यक्तिमत्वच तसे आहे! ह्या भूमिकेत श्री.दिलीप प्रभावळकर ह्यांनी अप्रतीम कामगिरी केली आहे.

      ही मालिका श्री प्रभावळकर लिखित"अनुदिनी"ह्या पुस्तकावर आहे...हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने १९९८ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केले होते.श्री.प्रभावळकर लिखित ह्या आबांच्या व्यक्तिमत्वाचे खरच कौतुक करावेसे वाटते,हे असे धोतर घातलेले आजोबा,शिस्तीचे पण तरीही प्रेमळ,स्वतःच्या मुलाला सुनेला सांभाळून घेणारे,वेळी योग्य मार्गदर्शन करणारे,नातवंडांचे लाडके आबा....
    
      ही दरवेळी काहीतरी नवीन घेऊन येणारी मालिका आणि कुटुंबात सगळीच मंडळी रोजचे व्यवहार करत,सगळे अगदी घरच्यासारखे वाटणारे.आबांची नात शलाका(रेश्मा नाईक),श्रीलेश उर्फ शिरया हा आबांचा नातू(विकास कदम),आबांची सुनबाई श्यामल(शुभांगी गोखले),मुलगा शेखर(श्री.राजन भिसे) आबांचे मित्र,शिरयाचे मित्रमंडळ,शेखरच्या ऑफिसातले मित्रमंडळ,आणि टिपरे ह्यांचे हे घर अगदी आपण त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊन येतो...सर्वांबरोबर बसून दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहतो,जेवण करतो,अगदी पत्ते पण खेळतो.
            
        सर्वांच्या भूमिका ह्या मालिकेत खूप सुरेख झाल्या आहेत.कलाकारांना सूचना दिल्यासारख्या वाटत नाहीत,अभिनय अगदी जिवंत वाटतो.मालिका संपली होती पण तरीही लक्षात राहिली होती.अभिनय,हलकेफुलके विनोद ह्यामुळे ...वाटले का संपली? अजून चालली असती तर! पण कधी कधी एखादा कथा एखाद्या वळणावर संपलेलीच बरी असते.....तिच्या वाचकांना पाहणाऱ्यांना तिचे महत्व राहते.ती कंटाळवाणी न होता लक्षात राहते.'परत एकदा हि मालिका सुरु करण्यात आली आहे',हे कळले आणि खूप आनंद झाला....आम्हां परदेशात वास्तव्य करणाऱ्या मराठी मंडळींसाठी जालावरून हिचे भाग पाहता येत आहेत जुने नवे सगळे भाग....
          
        मराठी घरातली कथा अगदी 'घराघरातली कथा' म्हणून हि मालिका पहावीशी वाटेल.आबांनी प्रेक्षकांना लहान लहान प्रसंगांतून खूप काही शिकवले.नातेसंबंध,एकमेकांबद्दलचा आदर,ह्यासोबत हसवले पण आणि रडवले पण.लहान मोठे सर्वांनी मिळून पाहण्यासारखी मालिका म्हणून जास्त आवडली.संस्कारक्षम असे खूप काही चांगले शिकायला ऐकायला मिळते आहे ह्या मालिकेतून.झी मराठी वरील ह्या मालिकेची प्रक्षेपणाची वेळ मात्र माझ्या माहितीप्रमाणे सकाळची आहे जी सर्वांची'गडबडीची वेळ'असते प्रत्येक घरात अश्या वेळी हि मालिका खरच पाहता येऊ शकेल का?असे वाटू लागले कि,हिची वेळ संध्याकाळची ठेवली तर नक्कीच पहाणाऱ्यांना निवांतपणे मालिकेचा आनंद घेता येईल....नवीन भाग अप्रतीम आहेत! 

         ह्या मालिकेचे काही भाग http://www.apalimarathi.com/ ह्या वेब साईटवर उपलब्ध आहेत.जरूर पहा...
साधेपणा आणि सच्चेपणा ह्या मालिकेची  खासियत आहे!
- लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
 ---श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेचे title song दाखवणारी खालील लिंक नक्की पहा ----

टिप्पण्या

  1. या मालिकेची आठवण दिल्याबद्दल धन्यवाद
    थोडक्यात भाग पहायला ही लिंक मस्त आहे.
    http://www.mypopkorn.com/tv/shriyut-gangadhar-tipre-10th-mar-2008-mon.html

    उत्तर द्याहटवा
  2. हम्म.. कधी पाहिली नाही ही मालिका. बघतो आता आरामात. धन्यवाद ! :)

    उत्तर द्याहटवा
  3. टीवी खूप कमी बघतो आधीपासून ... त्यामुळे थोड्याश्या बघण्यामध्ये ज्या मोजक्या मालिका मला भावल्या त्यापैकी ही एक...सहज, सुंदर... धन्स इथे हया मालिकेबाबत लिह्लत त्याबद्दल ....

    उत्तर द्याहटवा
  4. संकेत ह्या मालिकेचे नवीन भाग मला जास्त आवडले....जमल्यास नक्की बघ...thanks for reading my post...

    उत्तर द्याहटवा
  5. हे पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद देवेन(दवबिंदू)तुझे ह्या ब्लॉगवर स्वागत आहे.....
    हि मालिका माझी पण आवडीची नियमित नाही पाहता आली पण आता वेळ मिळेल तसा,वेळ काढून पाहते.अनेक मालिकांच्या गदारोळात चांगल्या मराठी मालिका हरवून जातात कुठेतरी,म्हणून वाटले ह्या टिपरे आजोबांबद्दल आणि परिवाराबद्दल थोडे लिहावे म्हणजे वाचणारे ह्या परिवाराला दूरदर्शनवर नक्कीच जाऊन पाहतील..

    उत्तर द्याहटवा
  6. माझी आवडती मालिका. ही रिपीट लागली तेव्हाही पूर्ण पहिली होती, आणि इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  7. You are welcome!इंद्रधनू हि मालिका आज पण खूप छान आहे. काही पाहणाऱ्यांचा असा अनुभव असतो कि मालिका परत सुरु झाली जर आणि नवे भाग आले तर त्यांचा दर्जा तितकाच असेल असे सांगता येत नाही.पण गंगाधर टिपरे ह्याला अपवाद आहे खास!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ