पोस्ट्स

'श्रेय '

इमेज
                   मी हरवलो आहे ग,पूर्णपणे...स्वतःला हरवून बसणे आणि ते सुद्धा मुद्दाम,हट्टाने,का ते माहित नाही..."सगळ्या प्रश्नांना उत्तरे असतात" हे माझेच वाक्य आहे आणि तुला ते नक्कीच आठवत असेल हे ऐकताना .. उत्तरे असतील,'कारणे'नसतात.'धडा शिकणे' आणि पुढे त्या वाटेकडे न झुकणे हे खूप कठीण असते पण करावे लागते.स्वतःला समजावताना किती महिने गेले असतील...विचार आणि प्रश्न ह्यांच्या गुंत्यात अडकून तोच तोचपणा आला होता.पण हे सगळे नाकारणे म्हणजे स्वतःशी अन्याय करणे झाले असते.खेचाखेची झाली मनात आणि शेवटी खूप ताण आला आणि दोरी किंचित उसवली....तिच्या तुटून हलक्या झालेल्या धाग्यांना काहीच इलाज नाही.दोरी परत तशीच्या तशी नाही होऊ शकणार कधी हे निश्चित.ह्या निर्णयापर्यंत नकळत यावेच लागले.स्वतःला फसवत राहता येणार नव्हते. आशा आणि निराशा ह्यात किती कमी जागा असते हे लक्षात आले.मला 'गद्य' लिहिता येत नसले तरी एक प्रयत्न करतो आहे आज,फक्त तुझ्यासाठी.        आज,'फिरून तुझी आठवण' ह्या माझ्या काव्य संग्रहाला पारितोषिक मिळाले...ते घे...

पाऊले

इमेज
पाऊलांना ऐकायचे नसायचे तेव्हां कोणाचे ... स्वतःचेच खरे करायचे मनावर घेतलेले असायचे....... आई म्हणायची "झाडावर चढू नको पडशील".... "पाऊले ऐकत नाहीत ग तुझे आई काय करू सांगशील?" पाऊलांना वाटायचे सायकल शिकायची  शंभर  वेळा पडले तरी हार नाही मानायची.... बाबा म्हणायचे "सांभाळून बाळ"..... पण पाऊलांना कुठे भीती असायची! शाळेतले खेळ, स्नेहसंमेलनाची  वेळ... स्टेजलाच आमची भीती वाटायची..... अभ्यास केला,पण खेळ सांभाळून.... पाऊलांना तेव्हां अभ्यासाची जाण असायची..... हल्ली  सारखे फुटले नव्हते  क्लासेस   चे पेव... स्वतःलाच स्वतःचा देता यायचा वेळ.... पाउलांची वाट तितकी अवघड झाली नव्हती   स्पर्धेपाठी सगळी इतकी वेडी झाली नव्हती.... मैदानी खेळ दूरदर्शनवर भारी होते.... आई बाबा संध्याकाळी मुलांसाठी होते.... पाऊलांना अनेक गोष्टी आजीने दिल्या   बालपण त्यांचे खूप आल्हाददायक होते.... आज पाऊले मोठी झाली..तरी मन बालपणात रमते... जुने सोबती,शाळा सुटली तरी आठवांमध्ये गुंगते.... ...

'चित्र'

इमेज
                     रोजच्या सारखीच  आजची पण सकाळ...एक नवा दिवस.सूर्याची किरणे आज खूप वेगळी भासत होती.तिने लगेच आपली रोजनिशी काढली....लिखाणाला सुरवात.खूप काही सुचू लागले, भराभर लिहित गेली,....एका शब्दावर आली आणि अचानक एक आठवण जागी झाली.पटकन उठावेसे वाटले जागेवरून, कपाटाकडे गेली, उघडून ते चित्र बाहेर काढले.           तिने काढलेले,त्याच्या सोबतीने...दोघांनी मिळून रंग भरलेले चित्रात.चित्र खासच खास अगदी दोघांचेच असे फक्त...आणखीन कोणीच कधी न पाहिलेले.त्यांच्या रंगात न्हाहून निघालेले चित्र. त्याच्या आवडत्या रंगात. निळ्या रंगाचा जरा जास्तच वापर केला गेला तिच्या नकळत त्या चित्रात असे वाटले तिला ते पाहताना.             सावकाश परत खुर्चीकडे घेऊन आली आणि इतक्या सारया वर्षात न बदलेली एक गोष्ट तिच्या लक्षात आली....'ती भावना'...ज्या भावनेने ते चित्र रेखाटले.ते क्षण,अविस्मरणीय असे, तिने कधीच ओढून ताणून त्यांची याद आणली नव्हती ,पण जेव्हां अशी एखाद्या सुगंधासारखी येऊन त...

Google Buzz ला राम राम.

इमेज
               Google Buzz ला राम राम.....आज पासून बझ्झ दिसत नाहीये.  बरेच काही  असे ह्या 'buzz बाबाने' दिले जालावरले,लिहिलेले वाचलेले काही लक्षात राहिलेले,असे हे बझ्झबाबा.गुगल बाबांनी ह्यांना एक संधी दिली लोकांपर्यंत गुगलप्रेमी जनतेपर्यंत येऊ दिले.मग बझ्झबाबा प्रसिद्ध झाले आणि मार्गी लागले.अनेक चाहत्यांनी त्यांना उचलून धरले.त्यांचे नाव सर्वत्र ऐकू येऊ लागले.जालावर अनेक बझ्झप्रेमी निर्माण झाले आणि नुस्ता  बझ्झ बझाट  झाला...इकडे गप्पा,लहानसहान वाद,एक एका शब्दाचा वाक्याचा,एखाद्या गाण्याचा,छान कथा किंवा कवितेचा बझ्झ पडायचा....सकाळी आपापल्या कामावर गेलेल्या मंडळींनी कामाला खरी सुरवात  करण्याआधी ह्या 'बझ्झला' सुरवात केलेली असायची.....चहाची वेळ आणि बझ्झ ची वेळ एक होऊ लागली अनेकांची.अनेक संवाद सुरु होत आणि संपत बझ्झ वर....जालाच्या किमयेत बझ्झ नवीन माध्यम.एक प्रकारचे संवाद माध्यम आणि ह्याने अनेकांना माहितीपूर्ण असे काही मिळवून दिले.          पण आपल्या गुगलबाबांना मात्र पुढे पुढे जायची खोड आणि न...

'कोलावेरी दी'

इमेज
                         ही 'कोलावेरी दी' नक्की काय भानगड आहे असा पहिला प्रश्न मला पडला होता.....मग ते गाणे जसे आपल्या प्रत्येकाकडे अलगद Facebook ने आणून ठेवले तसेच माझ्याकडे पण आलेच....ते गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हां खूप वेगळे वाटले होते,त्याची रिदम आवडली...ताल आवडला.हे गाणे म्हणजे नुसते शब्द,आणि ते अर्थ लावत लावत एकात एक  नुसते गुंतलेले,ह्यात नीटसे lyrics म्हणतात तसले काही नाहीच.गाण्याच्या सुरवातीलाच गायक म्हणून आपल्याला ऐकणाऱ्यांना हे सांगून सावध करतो कि हे फ्लॉप सोंग आहे,,'एका प्रेमात असफल झालेल्या व्यक्तीचे गाणे'.'कोलावेरी दि' म्हणजे 'प्रचंड चीड','घातकी राग'मग ह्यामधील तमिळ शब्दासाठी शोधाशोध झाली थोडी,पण जालाच्या कृपेने ते पण सहज मिळाले.अगदी कोणी पण हे गाणे सहज पाठ करून म्हणू शकते.लगेच काल परवा सोनू निगम च्या मुलाने हेच गाणे आपल्या बालिश आवाजात गाऊन दाखवलेले (शेवटच्या कडव्यातले शब्द बदलून--- अगदी लहानग्या वयासाठी योग्य करून )परत एकदा You Tube च्या कृपेने पाहायला मिळाले,जे सर्वांनी उचलून धरले....   ...

नवे घर....

इमेज
        नवीन जागा,नवीन घर,सगळे आजूबाजूचे वातावरण बदलणार हे नक्की,पण आधीच्या घराचा सहवास अगदी भिंतन भिंत आणि कोपरान कोपरा ओळखीचा झालेला.पहिले पाऊल टाकले ते ह्याच घरात इकडे आल्यावर,,त्यामुळे आता इतक्या दिवसांची,म्हणायला वर्षांची सवय मोडून पुढे जायचे,'सवय मोडून' हा शब्द अगदी जाणवतो आहे...मनाला काहीतरी वेगळेपण,मोठा बदल होणार आहे ह्याची जाणीव होते आहे..हे न,सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत होते,नाहीका?प्रत्येकाच्या बाबतीत,मात्र वेगवेगळ्या गोष्टींची सवय झालेली मोडायची,वेगवेगळे अनुभव.        आपली घरातली स्वयंपाक खोली.विशेष ओळखीची माझी अशी,आता तिच्यातल्या सगळ्या लहान गोष्टी,भांडी रिकामे करून नीट एका ठिकाणी करायचे,त्या खोलीला पण त्या भांड्यांची,माझी सवय झाली असेल असे कुठेतरी वाटले.स्वयंपाकघर,तिकडे अगदी उत्तम पाककृती पासून अगदी साफ वाट लागलेल्या पाककृती पर्यंत अनेक अनुभव.नवीन आणलेल्या भांड्यांचा सेट,ते लावलेले  स्वयंपाकघर. घरातली प्रत्येक खोली छान लावलेली,सगळे समान आता परत बांधायचे..घरातली पुस्तके एकत्र करून ठेवणे,जुने सामान काही त्यातले देऊन टाकणे...

Festival of Lights....

इमेज
                                                         सर्व वाचकांना दिवाळीच्या   शुभेच्छा  !!          दिवाळीची गोष्ट सर्व दिवाळीच्या दिवसांचे महत्व आणि दिवाळी एक प्रमुख सणांपैकी म्हणून वाटणारे अप्रूप! दर दिवाळीची मजा वेगळीच! सुटीचा आनंद,आणि दिवाळीच्या तयारीतला उत्साह.घराघरातले वातावरण आणि दुकाने रस्ते सगळीचकडे 'आली दिवाळी' तयारीला लागा अशी नांदी असते.भारतात असताना दिवाळीचा एक वेगळाच अनुभव होता संपूर्ण दिवाळी म्हणता येईल अशी आठवणीत राहिली नेहमीसाठी!          लहानपणापासून प्रत्येक दिवाळी सर्वांसोबत साजरी केली. सगळे जवळचे एकत्र जमत आणि हा सण उत्साहात साजरा होत असे. घराला  रंग देण्यापासून ते दिव्यांनी घर झगमगून जाईपर्यंत,आकाश कंदिलाची शोभा,पणत्यांची गच्चीतली रोषणाई,फटाक्यांचे आवाज,आकाशात अचानक दिसणारा प्रकाश आणि डोळे भरून दिव्यांना पाहता पाहता मनात देखील अनेक रंग...