'चित्र'


         
           रोजच्या सारखीच  आजची पण सकाळ...एक नवा दिवस.सूर्याची किरणे आज खूप वेगळी भासत होती.तिने लगेच आपली रोजनिशी काढली....लिखाणाला सुरवात.खूप काही सुचू लागले, भराभर लिहित गेली,....एका शब्दावर आली आणि अचानक एक आठवण जागी झाली.पटकन उठावेसे वाटले जागेवरून, कपाटाकडे गेली, उघडून ते चित्र बाहेर काढले.


          तिने काढलेले,त्याच्या सोबतीने...दोघांनी मिळून रंग भरलेले चित्रात.चित्र खासच खास अगदी दोघांचेच असे फक्त...आणखीन कोणीच कधी न पाहिलेले.त्यांच्या रंगात न्हाहून निघालेले चित्र. त्याच्या आवडत्या रंगात. निळ्या रंगाचा जरा जास्तच वापर केला गेला तिच्या नकळत त्या चित्रात असे वाटले तिला ते पाहताना.

            सावकाश परत खुर्चीकडे घेऊन आली आणि इतक्या सारया वर्षात न बदलेली एक गोष्ट तिच्या लक्षात आली....'ती भावना'...ज्या भावनेने ते चित्र रेखाटले.ते क्षण,अविस्मरणीय असे, तिने कधीच ओढून ताणून त्यांची याद आणली नव्हती ,पण जेव्हां अशी एखाद्या सुगंधासारखी येऊन ती अचानक दरवळायची,तो सुगंध चंदनच बनून गेलेला.
चित्रावरून अलगद हात फिरवताना तिने डोळे मिटले.तिच्या पापण्या खोलवर रुतल्या सारख्या....इतका अलगद स्पर्श आणखीन कोणाचा नसेल....इतकी काळजी कोणी कधी केली नसेल....पण ती हरवूनच गेली,कोणीकडे.....काहीतरी हट्टाने, हक्काने धरून ठेवण्याचा प्रयत्न करताना ती काळजी सुटून गेली,...कदाचित त्याच्याकडेच राहायचे असेल तिला नेहेमीसाठी आणि त्याचे शब्द आता आणखीन तोकडे झाले असावेत...हाक पण मारता न येण्याइतके....तिने डोळे उघडले, चहा तसाच निवून गेला होता...ते चित्र पण अचानक तिला जड वाटू लागले हातात....अजून छान रंग भरता आले असते का? अजून काही वेगळे काढता आले असते का?इतका कमी वेळ हातात होता त्यात किती सारया कल्पना मनाशी खेळत होत्या, सर्वात आवडलेली, चित्रात उतरली, तेव्हां रंग अगदी  मनासारखे वाटत होते न? मग आज ते चित्र परत एकदा उजळणी करावी तसे रंगवावेसे का बरे वाटते आहे तिला? 

        तिने ते चित्र अलगद परत कपाटात, ठेवून दिले. नेहमीच ते चित्र  पाहताना हे असे तेच तेच विचार एकाच रेषेत कसे येतात अगदी नेमाने ह्याचे तिला आश्चर्य वाटले....
तिने रोजनिशीत काही मनातले लिहिले, आणि ती परत एकदा तिच्या लिखाणाच्या जगावेगळी झाली.....जगाच्या गडबडीत मिसळली ......
.......दुसऱ्या दिवसापर्यंतच ....
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद इंद्रधनू.....हे चित्र मी काढलेले नाही पण माझ्या आवडत्या चित्रांपैकी एक आहे.....

      हटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. सुरवातीपासूनच मला रूपकात्मक काही लिहायची खूप इच्छा होती ....तसे लिहिण्याचा 'चित्र' ह्या पोस्ट द्वारे प्रयत्न केला आहे.....तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद योगेश.....

      हटवा
  3. खूप छान गं.... वाचताना मी हरवून गेले त्या चित्रात...

    >>>>>>>चित्रावरून अलगद हात फिरवताना तिने डोळे मिटले.तिच्या पापण्या खोलवर रुतल्या सारख्या....इतका अलगद स्पर्श आणखीन कोणाचा नसेल....इतकी काळजी कोणी कधी केली नसेल....पण ती हरवूनच गेली,कोणीकडे.....काहीतरी हट्टाने, हक्काने धरून ठेवण्याचा प्रयत्न करताना ती काळजी सुटून गेली,...कदाचित त्याच्याकडेच राहायचे असेल तिला नेहेमीसाठी आणि त्याचे शब्द आता आणखीन तोकडे झाले असावेत...हाक पण मारता न येण्याइतके...<<<<<<<<

    का कोण जाणे इथे तर हलकीशी शिरशिरी आली अंगावर .....!!
    nostalgic व्हायला झालं आपोआप.... हीच तर किमया आहे तुझ्या लेखनाची.... :)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद चैताली.....:) मनातले सगळे तसच्या तसं लिहिण्याचा प्रयत्न करते,शब्द साथ देत असतात......

      हटवा
  4. भावनांचे रंग मस्त उतरलेत कॅनवास वर
    सुरेख रंगसंगतीचे छान चित्र व्हावे हे आयुष्य ही कामना !!! :)

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान,रंग असे भरावे की चिरकाल उरावेत न!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रवीण...
      हो रंग असे असावेत कि चिरकाल टिकावेत,पण'क्षणभंगुरता' हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.... तिने त्या चित्रात रंग जरी मनापासून भरले तरीही कुठेतरी काही बदल करता आला असता का...हा प्रश्न तिच्या मनात येतो,रूपकात्मक लिहिले आहे.....माणसाच्या मनाची अस्थिरता दिसून येते....

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ