पोस्ट्स

'कवडसे'

इमेज
                     'कवडसे',किती सुंदर आणि किती स्मृतींच्या मागे पुढे पडलेले !!!...जरा ऊन आले कि पटकन एखाद्या खिडकीच्या फटीतून आलेला एक उभा कवडसा... त्या कवड्श्यामध्ये नाचणारे धुळीचे कण.सावली आणि ऊन ह्यांचा खेळ.केळीच्या हलणाऱ्या पानाशी खेळणारे ऊन, वारयामुळे ह्या पानाची एक हालचाल,हलणारी सावली.              दुपारी लहानपणी झोप यायची नाही पण आई सुटीच्या दिवशी मागे लागायची,थोडा वेळ आमची मस्ती कमी व्हावी म्हणून असणार आणि दुपारची शांतता राहावी हा दुसरा उद्देश.मग काय,अजूनही आठवते,कौलारू छपरातून ऊन कसे आत डोकवायचे,लहान लहान उन्हाचे कवडसे,काही उतरून पलंगावर उताणे पडलेल्या माझ्या  अंगावर पडत.मग मी उठून ते हाताच्या तळव्यावर घ्यायचा प्रयत्न करायचे.कधी कधी एकदम वर्तुळाकार असे देखील कवडसे येत.काळोख असलेल्या त्या खोलीत हे 'कौलारू ऊन' हवेहवेसे वाटायचे!पूर्ण दुपार नाही पण थोडीशी दुपार जेव्हां जाग असायची मला,मी असा हा उन कवड्श्यांचा खेळ पाहायचे.ताटावर उन झेलून त्याच्याव...

"कुठे काही चुकते आहे का?"

इमेज
                मनात किती वेळा हा विषय येऊन गेला.ह्या विषयावर लिहायचे म्हणजे कमीच आहे!पण लिहायचे आज मनात होते म्हणून हा प्रयत्न!कुठे काय चुकते आहे ते कळण्यास मार्ग नाही पण नक्कीच काहीतरी चुकत जाते.आणि ह्यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.            आजोबांचा प्रेमळ धाक आठवतो.त्यांनी शिकवलेली रामरक्षा,श्लोक,पाठांतर,एक प्रकारची शिस्त. घरातले वातावरण आजी आजोबांमुळे आमच्यासाठी खूप वेगळे होते.लहानपण त्यांच्या सोबत कसे उमलून आले आणि अनेक उत्तम संस्काराची बीजे कशी पेरली गेली आमच्यात ते आज जाणवते.त्यांचे घरातले महत्व अनन्यसाधारण होते हे नक्की.मी असा विचार करू शकत नाही कि आमचे घर आणि त्यात मी आई बाबा आणि आम्हीं बहिणी अर्थात,आता आजी आजोबा नाहीत पण ते असताना जो घरात ओलावा होता,त्यांच्यामुळे जे चैतन्य होते ते,आम्हां सर्वांमध्ये नक्कीच उतरले आहे.           'वृद्धाश्रम,ह्या नावात सगळे आले का? 'घरात नको' म्हणून,'निरुपयोगी' म्हणून,असे अनेक शब्द अ...

'शेवटास न गेलेली गोष्ट'

इमेज
                                'शेवटास न गेलेली गोष्ट' हि कल्पना आवडते सर्वांनाच.अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यन्त.आता मोठ्यांपर्यन्त येव्हढ्याचसाठी म्हणाले कारण आज कालच्या दूरदर्शनवरील मालिका जवळ जवळ न संपणारी गोष्टच असतात नाहीका! कारण मग जेव्हां त्या संपतात तेव्हां,तोवर उत्सुकता पण संपलेली असते सर्वांचीच....              नक्की माणसाला हि 'शेवटास न गेलेली गोष्ट' का बरे आवडत असावी? दर वेळी नाविन्य असलेली, आजीने सांगितलेली गोष्ट आठवली. रामायणात शेवटी 'राम राज्यावर बसला' अस जेव्हां ती म्हणाली होती तेव्हां तितकेसे ते पटले न्हवते.इतक्यातच कसे रामायण संपेल?आणि त्यात 'राम राज्यावर कसा बसू शकेल?' आजीला शब्दात पकडून भंडावून सोडलेले आठवते आहे,आजीची मग तारांबळ उडायची.एक तर आधी तिला कोकणी यायचे आणि मराठी कोकणी अशी ती गोष्ट रंगायची..पण तरीही मग वेगळी गोष्ट हवी असायची अगदी झोपेपर्यंत,म्हणायला, ऐ...

ह्यांचे व्यर्थ न हो बलिदान!

इमेज
                    "क्रांतिकारक" हा शब्द किती जबरदस्त अर्थपूर्ण आहे नाही! ज्यांच्या नसानसात क्रांतीपूर्ण विचार भरले आहेत, आणि जे आपल्या जीवाची परवा न करता देशासाठी,निस्वार्थ वृतीने कार्यरत आहेस अश्या व्यक्ती.            आज बघाल तर इतिहासजमा झालेली काही मंडळी,ज्यांची नवे अभ्यासात शिकून आदर्श विचार मनात येऊन जातात,लहानपणी पाठ्यपुस्तकात ज्यांची माहिती अभ्यासली हे क्रांतिकारक काहींच्या मनात खोलवर ठसा उमटवून जातात.असेच ३ म्हणजे,भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव! दिनांक २३ मार्च १९३१ ह्या दिवशी ह्या तीन देशभक्तांना ब्रिटीश सरकारने ८० वर्षांपूर्वी फाशी दिले,तेव्हां लोकांमध्ये हलकल्लोळ माजला,साहजिकच आहे! आज जेव्हां  इतक्या वर्षांनी देखील ह्या ३ क्रांतीवीरांचे स्मरण आपल्या मनाला हेलावून सोडते तर अर्थात ८० वर्षापूर्वी लोकांमध्ये किती असंतोष इंग्रज सत्तेविरुद्ध चीड निर्माण झाली असेल,तो दिवस काळाच्या इतिहासात कोरला गेला आहे!    ...

असाही एक आनंद!

इमेज
दूर कुठेतरी पहात असता ती त्याने तिच्या मनात एक फेरी टाकली 'चल भटकून येऊ' म्हणाला तिला, आणि गाडी बाहेर काढली  ... उगाचच जास्तच विचार करणारी ती त्याच्या साठी झुरणारी ती... 'लांब कुठे जातो आहोत' न विचारणारी ती फक्त अनुभवत राहिली वेग, गाडीचा.... रस्त्यातली पळणारी हिरवळ डोळ्यात मावत न्हवती. माणसांचे थवे,गाड्यांचा गोंधळ मागे पडला रस्ता शांत दोघांसाठी थांबलेला जणू ! गाडी मात्र सुसाट थांबण्याचे नाव नाही.... अंतर कापत जाणे,दूरवर कुठेतरी मनातली विचारांची स्पंदने कमी झाल्यासारखी तिचे डोळे आता हसरे, नेहमीचे त्याच्या मनाला एक समाधान. तिचे वागणे आता कुठे ओळखीचे! गाडी वळणावर उभी विसावलेली ती त्याच्या जवळ उभी. समोर एक टेकडी, देवळाचा कळस.... घंटानाद आणि ओंकाराचे स्वर... अचानक येणारा पाऊस,ओला वारा मृदगंधित निसर्ग सारा.... भिजून चिंब,शांत मने.....असाही एक आनंद! -- श्रिया

रंगोत्सव!

इमेज
                 होळीच्या रंगात न्हाऊनी उजळत गेली संस्कृती कलह सारे विसरुनी जाऊ उभारू आज एक युती... होळीच्या ह्या शुभ अवसरी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

सुवर्णदिन!

            मागे वळून पाहताना दिलखुलास,हसरे,खेळकर,शिस्तीचे पण प्रेमाने बहरलेले, आई आजी च्या कुशीत खेळत मोठे झालेले बालपण.नंतर भारतातली काही वर्ष, महाविद्यालयातले दिवस त्या आठवणी आणि नंतर इकडे परदेशातले बदलेले जग.लहानपण हवेहवेसे वाटणारे, किती काही लिहून काढण्यासारखे अनुभव, शाळेच्या आठवणी, मैत्रिणींच्या आठवणी,फुलपाखरासारखे हे दिवस उडून जातात आणि मग आपण होतो मोठे,संसारी आपल्या विश्वातल्या चौकटीत,गुरफटून जातो, रोजचे व्यवहार, नोकरी घर नातेवाईक, मित्रवर्ग सर्व काही ह्यात दिवस उडू लागतात.भराभर पुढे जाऊ लागतात.         मध्ये घराजवळ एक ओल्ड एज होम आहे तिथली काही वृद्ध मंडळी मला एका शॉपिंग मॉल मध्ये भेटली. सगळी मंडळी एकदम हसत खेळत आणि आनंदात वाटत होती.फूड कोर्ट मध्ये माझ्या बाजूला एक आजी आजोबा बसले होते माझ्याकडे पाहून हसले म्हणून मी पण हसले. बोलू लागलो.ते दोघे एकमेकांचे नातेवाईक न्हवते,मित्र मैत्रीण म्हणू. :) आयुष्याच्या  उत्तरार्धात हसत राहणे आणि एकमेकांना आनंदात ठेवणे महत्वाचे.दोघांची क...