सुवर्णदिन!
मागे वळून पाहताना दिलखुलास,हसरे,खेळकर,शिस्तीचे पण प्रेमाने बहरलेले, आई आजी च्या कुशीत खेळत मोठे झालेले बालपण.नंतर भारतातली काही वर्ष, महाविद्यालयातले दिवस त्या आठवणी आणि नंतर इकडे परदेशातले बदलेले जग.लहानपण हवेहवेसे वाटणारे, किती काही लिहून काढण्यासारखे अनुभव, शाळेच्या आठवणी, मैत्रिणींच्या आठवणी,फुलपाखरासारखे हे दिवस उडून जातात आणि मग आपण होतो मोठे,संसारी आपल्या विश्वातल्या चौकटीत,गुरफटून जातो, रोजचे व्यवहार, नोकरी घर नातेवाईक, मित्रवर्ग सर्व काही ह्यात दिवस उडू लागतात.भराभर पुढे जाऊ लागतात.
मध्ये घराजवळ एक ओल्ड एज होम आहे तिथली काही वृद्ध मंडळी मला एका शॉपिंग मॉल मध्ये भेटली. सगळी मंडळी एकदम हसत खेळत आणि आनंदात वाटत होती.फूड कोर्ट मध्ये माझ्या बाजूला एक आजी आजोबा बसले होते माझ्याकडे पाहून हसले म्हणून मी पण हसले. बोलू लागलो.ते दोघे एकमेकांचे नातेवाईक न्हवते,मित्र मैत्रीण म्हणू. :) आयुष्याच्या उत्तरार्धात हसत राहणे आणि एकमेकांना आनंदात ठेवणे महत्वाचे.दोघांची कुटुंब आपापल्या विश्वात, मुले मोठी झालेली भेटायला येणारी.
प्राथमिक गप्पा झाल्याबर मला त्या आजी काही म्हणाल्या ते इथे देते आहे मला पटले त्यांचे अनुभवाचे बोल....." प्रत्येक दिवस हा सोन्याचा असतो.एक एक दिवस जपून ठेव, आनंदात घालव,खूप महत्वाचे आहे हे! आज मी ८२ वर्षांची आहे, आयुष्यभर नोकरी केली, मुलांना मोठे केले, पतीची सेवा केली, आठवणी जपल्या, सगळेच मनासारखे नाही पण तरीही ते सगळे दिवस परत यावेसे वाटले तरीही येणार नाहीत आज. लहानपण आपण जसे विसरू शकत नाही तसच तरुणपण देखील आहे, सगळी वर्ष आहेत,वर्ष खूप पटकन गेली ग कळलेच नाही कधी मी म्हातारी झाले." असे म्हणून आजी हसल्या.मला म्हणाल्या "आज वाटते कित्येक गोष्टी करायच्या राहून गेल्या,दुःखाचे प्रसंग येतात,पण त्यावर मात करून पुढे जा तिकडे वेळ जातो आणि मग परत आनंदाकडे यायला वेळ लागतो." त्यांच्या मनातले त्या बोलत होत्या.
मग मला वाटले कि आपल्या भूतकाळातल्या आनंदाला पाहावे कधी? जेव्हां आपण दुखात असू.त्या आठवणी दिलासा देतात, देतील.पण आपला आजचा प्रत्येक दिवस पण तितकाच महत्वाचा आहे.त्या आजींचा हसमुख चेहेरा आठवला.कोणी कुठे भेटून आपल्याला कसे योग्य काही सांगते, नाहीका? जणूकाही बाप्पाच त्यांच्या मुखातून वदतो........... :) :)

छान झालीय पोस्ट...त्या आज्जी म्हणाल्या ते अगदी बरोबर आहे बघ..हे नेहमीचंच आहे न जुन्या आठवणी काढून आधीचे दिवस चांगले होते म्हणण...
उत्तर द्याहटवातुझ्या टिप्पणी बदल धन्यवाद अपर्णा...
उत्तर द्याहटवाहोय शिवाय आजचा दिवस देखील महत्वाचा तो पण उत्तम जावा म्हणून प्रयत्न करावे... :)