'कवडसे'
'कवडसे',किती सुंदर आणि किती स्मृतींच्या मागे पुढे पडलेले !!!...जरा ऊन आले कि पटकन एखाद्या खिडकीच्या फटीतून आलेला एक उभा कवडसा... त्या कवड्श्यामध्ये नाचणारे धुळीचे कण.सावली आणि ऊन ह्यांचा खेळ.केळीच्या हलणाऱ्या पानाशी खेळणारे ऊन, वारयामुळे ह्या पानाची एक हालचाल,हलणारी सावली.
दुपारी लहानपणी झोप यायची नाही पण आई सुटीच्या दिवशी मागे लागायची,थोडा वेळ आमची मस्ती कमी व्हावी म्हणून असणार आणि दुपारची शांतता राहावी हा दुसरा उद्देश.मग काय,अजूनही आठवते,कौलारू छपरातून ऊन कसे आत डोकवायचे,लहान लहान उन्हाचे कवडसे,काही उतरून पलंगावर उताणे पडलेल्या माझ्या अंगावर पडत.मग मी उठून ते हाताच्या तळव्यावर घ्यायचा प्रयत्न करायचे.कधी कधी एकदम वर्तुळाकार असे देखील कवडसे येत.काळोख असलेल्या त्या खोलीत हे 'कौलारू ऊन' हवेहवेसे वाटायचे!पूर्ण दुपार नाही पण थोडीशी दुपार जेव्हां जाग असायची मला,मी असा हा उन कवड्श्यांचा खेळ पाहायचे.ताटावर उन झेलून त्याच्यावरून प्रकाश भिंतीवर परावर्तित करणे असाही खेळ चालायचा कधी कधी. पाण्यावरून उन चाकाकायचे,डोळे भरून हा ओला प्रकाश पहिला आहे....
पाठच्या खोलीतून खिडकी उघडली कि वाडीत कळशी धूत बसलेली शोभा ताई दिसायची.कळशी राखेने आणि पांढरया पावडरने,नारळाच्या काथ्यांनी साफ करायची.कळशीचे उन्हात चकाकणे आठवते.वाडीत दुपारी एकदम शांत आणि थंड असायचे.रहाट,त्याचा आवाज,आणि वाडीत सोडलेल्या पाण्याचा आवाज.
वाडीत पायात काहीच न घालता फिरायला आवडायचे.हिरव्या पानांचा,सुपारीचा येणारा वास..नारळाच्या झावळ्या आणि पायाला टोचणारे खडे...पण एक आनंद असायचा. कोंबड्यांची आणि त्यांच्या पिलांची धावपळ...आवडायची पाहायला.चिमण्या,सात बहिणी इकडून तिकडे उडत.कावळे काव काव करत.
घराला लागून शेकटाचे झाड होते,त्यावर कधी कधी माकडांचा एक ताफा यायचा.ह्यांच्या हातात एकदा एक पत्रा मिळाला,मग काय त्यावर ऊन पाडून इकडे तिकडे प्रकाश टाकणे सुरु झाले.तोंडाने विचित्र आवाज काढत हि माकडांची फळी नुसती त्या पत्र्याच्या तुकड्या मागे लागलेली..त्यांनाही खेळ आमच्याच सारखे.
मागे एक चिकूचे झाड होते, त्याखाली सापाचे वारूळ आहे असे कोणीसे सांगितले होते अर्थात,मुलांनी तिकडे जाऊ नये म्हणून असणार..पण आम्हां मुलांना मोठा उत्साह सगळीकडे संचार आमचा.
दुमजली कौलारू घर वाडीतले...आणि आमच्या घराचा जिना..मस्त लापाछापी रंगली कि लपायला चिकार जागा.वाडी,घर,शेजारयांचा मोठा वाडा,जिन्याच्या खाली पण लपता यायचे,तिकडे नारळाच्या चोड्यांचा किंवा विटांचा ढीग त्यापाठी लपता यायचे.पकडापकडी,लगोर आणि काय काय!दुपारच्या 'उन्हाचा त्रास' छे!! हा शब्दच न्हवता जमेत....ऊन आम्हां मुलांना कधी जाणवलेच नाही. सुटीतले ऊन नेहमी हवे होते.दुपारी कपडे धुवून वाळत दोरीवर घातले असले कि मग त्यांची वाऱ्याने होणारी फडफड आणि उन्हात त्यांची पडणारी हलणारी जमिनीवरची थंड सावली पाहायला मस्त वाटायचे..कपड्यांमध्ये लपून बसणे,खेळ संपत नसत.ओल्या कपड्यांचा अलगद होणारा उन्हातला स्पर्श....पण कपडे खाली पडता उपयोग न्हवता नाहीतर मोठ्यांचा मार...
शाळेत दप्तर सांभाळत जाताना गप्पांच्या नादात कधी सूर्य जाणवलाच नाही.तेव्हां 'सनस्क्रीन लोशन' वगेरे भानगडी न्हाव्त्या ...पायातल्या चपला काढून तापलेल्या डांबरी रस्त्यावर चालणे, चटचट पाय उचलावे लागत.रस्ता काळा आणि काही ठिकाणी डांबर ओले वाटायचे.उन्हामुळे मृगजळाचा भास व्हायचा दूरवर.घरी येण्याच्या नादात असायचो,आणि मग दुपारी खेळ संध्याकाळ झालेली जाणवायची नाही.शाळेच्या पाठीमागे समुद्र होता अगदी जवळ, त्यामुळे शाळेच्या मागच्या पटांगणात उंचच उंच सुरुची झाडे,आणि वाळू...ती तापलेली असायची पण थंड आणि गरम अशी जाणवायची पावलांना,कारण बाजूलाच वर्गाची उंच भिंत होती त्यामुळे सावली असायची वाळूचा काही भाग इतका तापलेला नसायचा.वाळूचे कण उन्हात चमकताना चांदी सारखे वाटत.किती वेळा वाळूत पडलो,लोळलो मनसोक्त खेळलो.थंड सावल्यांची दुपार वाटायची मला.मग थंड गार बर्फाचा 'गोळा' खायचा,एक पेप्सीकोला १० पैशाला मिळायचा मग नंतर २५ पैसे असा दर झालेला आठवतो, किंवा बोरे,चणे शेंगदाणे... मधल्या सुटीतली धमाल.

आज 'ऊन' तेच आहे पण 'सावल्या' बदलल्या.'कवडसे'तेच आहेत पण 'खेळ' बदलले.आसपासचे विश्व मोठे वाटू लागले. विचार बदलले.तरीही मला हा 'कॅलीडोस्कोप' आवडतो.'कवडसे' हातात पकडता येत नाहीत तरी पकडावेसे वाटतात.दर वेळी नवीन असा ऊन पावसाचा,' ऊन सावल्यांचा' खेळ अनुभवायला आवडते.

आज 'ऊन' तेच आहे पण 'सावल्या' बदलल्या.'कवडसे'तेच आहेत पण 'खेळ' बदलले
उत्तर द्याहटवाकिती सुंदर लिहिता तुम्ही ..
अगदी मी पण जुन्या आठवणीत रमलो
अप्रतिम लेख ..
Very Nice one... aata kharach asa unhala nahi baghayala milat...
उत्तर द्याहटवाधन्यवाद बंड्या...माझे लिखाण तुला आवडले हे वाचून छान वाटले.पोस्टची सुरवात आणि शेवट मला खूप महत्वाचे वाटतात.
उत्तर द्याहटवामला काय वाटते हे लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न असला तरीही कित्येकदा शब्द अपुरे पडतात,तरीही जेव्हां वाचकांकडून पोचपावती मिळते तेव्हां आपले प्रयत्न यशस्वी होताहेत असे वाटते...
तुषार,उन्हाळा तितकाच असेल पण माणसे बदलली आहेत...आजूबाजूच्या जगाशी स्पर्धा करता करता आपले जग बदलू लागले कोणालाच कळले नाही.सिमेंटची जंगले दिसू लागली,हिरवळीच्या शोधात कोकणाचा रस्ता धरावा लागतो...का असे? नको आहे न असे....निसर्गाचे तेच रूप पाहावेसे वाटते.शहरीकरण.
उत्तर द्याहटवागावातल्या लोकांमध्ये पण आज खूप बदल झाला आहे,हा बदल अटळ आहे.बऱ्याच गोष्टी खूपच जलद गतीने बदलत गेल्या समाजात.... ती जुनी माणसे हरवली,पोशाख पण बदलत जात आहेत.
काय करावे आपण, तर ह्या अश्या अनेक स्मृती जवळ ठेवून पुढे पाहावे! आणि काय!
कित्ती कित्ती सुंदर निसर्ग वर्णन केले आहेस ......आणि बालपणातला तो निरागसपणा पण .....अगदी निसर्गासारखा अवखळ बालिश किती छान लिहिले आहेस....मलाही माझ गाव माझे कौलारू घर चौसोपी वाडा आणि माजघरातल्या त्या कवडश्यांचे चांदणे आठवले ......खरच तू म्हणाल्याप्रमाणे आता उन तेच आहे सावल्या त्याच आहेत पण ......आजूबाजूचे विश्व आपल्या बदलले आहे .......भूतकाळाच्या अंधारात आपणच कवडसे असल्याचा भास झाला तुझा लेख वाचून अगदी मनापासून आवडला लेख ....कारण खूप अनुभव देवून जातो हा लेख .....
उत्तर द्याहटवातुझ्या पुढील लेखनास खूप खूप सदिच्छा
---कविता
कवि एक सांगू का? तुझा हा अभिप्राय एका कवितेसारखा वाटतो, शब्द सहज येतात आणि वाचून मनाला भिडतात.
उत्तर द्याहटवाप्रत्येकाचे बालपण असते,काही आठवणी सारख्या असू शकतात.पण प्रत्येकाच्या बालपणात काही'खास खासच'असते!'बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा'!!
हि साखर एकदाच आपले आयुष्य इतके काही गोड करून जाते न, कि मग अगदी पुढे जाऊन देखील पुन्हा पुन्हा तो गोडवा अनुभवता येतो.तुझ्या शुभेच्छा अश्याच माझ्या सोबत राहोत!
कित्ती सुंदर लिहिलंय... खूप छान ब्लोग आहे... :)
उत्तर द्याहटवाधन्यवाद!इंद्रधनू ह्या माझ्या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे.....
उत्तर द्याहटवाआज 'ऊन' तेच आहे पण 'सावल्या' बदलल्या.'कवडसे'तेच आहेत पण 'खेळ' बदलले.
उत्तर द्याहटवाkitti ga sundar shabd.... majhe balapan atahavle... :) tujhya shabdanche kavadase angabhar pangharun ghyavaese vatale...
चैताली तुझी दाद वाचून छान वाटले....अशीच वाचत रहा आणि हो तुझ्या कविता सुद्धा देत रहा आम्हां वाचकांना.....:)
उत्तर द्याहटवा