ह्यांचे व्यर्थ न हो बलिदान!
"क्रांतिकारक" हा शब्द किती जबरदस्त अर्थपूर्ण आहे नाही! ज्यांच्या नसानसात क्रांतीपूर्ण विचार भरले आहेत, आणि जे आपल्या जीवाची परवा न करता देशासाठी,निस्वार्थ वृतीने कार्यरत आहेस अश्या व्यक्ती.
आज बघाल तर इतिहासजमा झालेली काही मंडळी,ज्यांची नवे अभ्यासात शिकून आदर्श विचार मनात येऊन जातात,लहानपणी पाठ्यपुस्तकात ज्यांची माहिती अभ्यासली हे क्रांतिकारक काहींच्या मनात खोलवर ठसा उमटवून जातात.असेच ३ म्हणजे,भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव! दिनांक २३ मार्च १९३१ ह्या दिवशी ह्या तीन देशभक्तांना ब्रिटीश सरकारने ८० वर्षांपूर्वी फाशी दिले,तेव्हां लोकांमध्ये हलकल्लोळ माजला,साहजिकच आहे! आज जेव्हां इतक्या वर्षांनी देखील ह्या ३ क्रांतीवीरांचे स्मरण आपल्या मनाला हेलावून सोडते तर अर्थात ८० वर्षापूर्वी लोकांमध्ये किती असंतोष इंग्रज सत्तेविरुद्ध चीड निर्माण झाली असेल,तो दिवस काळाच्या इतिहासात कोरला गेला आहे!
ह्या खरया देशभक्तांना राज्यसभा आणि लोकसभा सभासदांनी अर्थात सर्व नेत्यांनी शिस्तीत एकत्रित येऊन अभिवादन केले आणि अर्थात त्यांच्या वर भाषण केले गेले.मनात एक विचार प्रकर्षाने आला कि आपल्या देशातच हि मंडळी जन्मली होती आणि भारतभूमी बद्दल निस्वार्थ प्रेम,भक्ती ह्या क्रांतिवीरांना शोभून दिसली! नुसते भाषण करणाऱ्या आपल्या नेत्यांनी, खरया अर्थाने जर देशासाठी काही केले,तरच ह्या क्रांतिवीरांना खरी श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल नाहीतर नाही!
दर वर्षी हा दिवस स्मृतीत राहील.ह्या दिवशी अशीच भाषणे होतील,शब्द उतू जातील,डोळ्यात अश्रू पण येऊ पाहतील पण खरया निधड्या छातीचे हे 'सिंह' पुन्हा निर्माण होणे नाही! आणि जर झाले तर ते योग्य कारणासाठीच व्हावेत,देशाच्या उन्नतीसाठी आणि निस्वार्थ भक्ती ज्यांच्या वागण्या बोलण्यातून आढळेल असे असावेत. आज आपल्या देशाला अश्या अनेक वीरांची खरी गरज आहे!
आज हि स्वतंत्र भूमी आम्हा सर्व भारतीयांना लाभली ह्या अश्या अनेक स्वातंत्र्य सेनानीमुळे!
ह्या शुरवीराना माझे शतशः प्रणाम!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा