असाही एक आनंद!




दूर कुठेतरी पहात असता ती
त्याने तिच्या मनात एक फेरी टाकली
'चल भटकून येऊ' म्हणाला तिला,
आणि गाडी बाहेर काढली  ...

उगाचच जास्तच विचार करणारी ती
त्याच्या साठी झुरणारी ती...
'लांब कुठे जातो आहोत' न विचारणारी ती
फक्त अनुभवत राहिली वेग, गाडीचा....

रस्त्यातली पळणारी हिरवळ डोळ्यात मावत न्हवती.
माणसांचे थवे,गाड्यांचा गोंधळ मागे पडला
रस्ता शांत दोघांसाठी थांबलेला जणू !
गाडी मात्र सुसाट थांबण्याचे नाव नाही....

अंतर कापत जाणे,दूरवर कुठेतरी
मनातली विचारांची स्पंदने कमी झाल्यासारखी
तिचे डोळे आता हसरे, नेहमीचे
त्याच्या मनाला एक समाधान.
तिचे वागणे आता कुठे ओळखीचे!

गाडी वळणावर उभी
विसावलेली ती त्याच्या जवळ उभी.
समोर एक टेकडी, देवळाचा कळस....
घंटानाद आणि ओंकाराचे स्वर...
अचानक येणारा पाऊस,ओला वारा
मृदगंधित निसर्ग सारा....
भिजून चिंब,शांत मने.....असाही एक आनंद!

-- श्रिया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ