पोस्ट्स

!!! शुभ दीपावली !!!

इमेज
              दिवाळी...........दिव्यांची,आकाश कंदीलांची,रांगोळीची,अभ्यंगस्नानाची,फराळाची,फटाक्यांची,बहार!          वर्षातून एकदा येणारी हि दिवाळी सगळ्यांना आनंद देते.अनेक शुभेच्छा,भेटकार्डासोबत आणि मिठाई सोबत मैत्री घेऊन येते. हास्य विनोद,गप्पा रंगतात.नातेवाईक,आप्त,सर्वांच्या मेळाव्यात,एकत्र आनंदात सहभागी होऊन आपण आपले रोजचे जग थोडे बाजूला ठेवतो.दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणाचे महत्व जाणवते.लहानांना दिवाळीची गोष्ट सांगून पुढे दिवाळी अशीच येत राहावी आणि साजरी होत राहावी असा मोठ्यांचा प्रयत्न असतो.सर्वांना हा सण खूप आवडतो.नवीन कपडे,नवीन खरेदी आणि त्यासाठी लोकांची बाजारात झालेली गर्दी, उडालेली झुंबड,किती किती उत्साह ओसंडत असतो सर्वत्र!                        धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी),लक्ष्मीपूजन,पाडवा किवा बलिप्रतिपदा आणि भाऊबीज....तुळशी विवाह  हे दीपावलीचे दिवस .श्री ...

" नेमेची येतो बघ ' पाववाला ' ! "

          "नेमेची येतो बघ 'पाववाला'!" ह्या वाक्यातला बदल, तुमच्या लक्षात आलाच असेल! पण हे अगदी खरे आहे हं! एक वेळ 'पावसाळा' मागे पुढे सुरु होईल पण 'पाववाला' मात्र अगदी नियमित येणारी व्यक्ती आहे.                                               शहरातून ठराविक भागात बेकरीतले काही पदार्थ सायकलवरून विकणारा हा 'पाववाला' आणि त्याची ती ठराविक हाळी ऐकली कि सवयीने सकाळी सकाळी लोक पैसे तयार ठेवतात. मऊ आणि कडक पाव, खारी आणि बटर शिवाय आणखीनही  बरेच गोड पदार्थ देखील हे आणून देऊ शकतात. नियमितपणा चुकलेला नाही ह्याला. पावसाळ्यात मुसळधार पावसात देखील हजेरी लावणारच.सायकल कोपऱ्यावर लावून अगदी गुढघाभर साठलेल्या पाण्यातून  चालत येणारा पाववाला पण पहिला आहे मी.ठरलेली घरे, ठरलेले पैसे ह्यासाठी इतकी धडपड! कधी एक शब्द जास्त बोललेला आठ...

शरद ऋतूचे देखणे दर्शन.....

इमेज
शरद ऋतू ,पानांचे वेगवेगळे रंग, आणि हवेतला गारवा , अश्या वेळी खूप सारी छायाचित्र  काढाविशी वाटली तर नवल नाही! रंगबिरंगी पानांना आणि निसर्गाला असेच कॅमेर्यात टिपून ठेवलेले काही क्षण ...Fall 2010

सांजगारवा....

'तिच्या' निजेला चंद्र हासरा रजनी गुणगुणते 'त्याचे' स्वर 'तिच्या' पापणी मध्येच दिसते ते 'त्यांचे' घर ते 'त्यांचे' घर.... लाल रुपेरी कौलारू परि, आणि नेटके सुरेख अंगण. अंगणी आहे तुळस आगळी प्राजक्ताचे सडे लांबवर... दरवाज्यावर तोरण हलते, रंग भिंतीचे, 'त्याचे' मीपण. सुगंध उदबत्तीचा येता विसरून जाते 'ती' 'तिजला' पण... खिडकीपाशी,पडदे निळसर, सर्व असावे मनाजोगते 'त्याचे' हास्य अन 'तिचे' लाजणे अल्लड,अवखळ आणि निर्मळ.... यावा नेहमी 'सांजगारवा' हरवून जावी सारी कलकल फक्त उरावे 'दोघांमधले' क्षणिक अंतर क्षणिक अंतर.... -श्रिया (मोनिका रेगे)-

'दूरदर्शन शाप कि वरदान?'

          लहानपणी  शाळेत असताना निबंधाचे विषय मिळायचे आणि एक त्यातला आठवतो ''दूरदर्शन एक शाप कि वरदान?'त्यावेळी लहान होते आणि अर्थात दूरदर्शनचे आकर्षण नवीन असल्यामुळे खूप वाटायचे अश्यावेळी त्या निबंधात मी काय लिहिले असेल ह्याचा तुम्हीं अंदाज लावू शकालच! त्यावेळचे काही लक्षात राहिलेले कार्यक्रम म्हणजे छायागीत,गजरा, चिमणराव आणि नंतर जेव्हां हिंदी कार्यक्रमांना सुरवात झाली तेव्हां चे 'नुक्कड','ये जो हैं झीन्दगी' हे काही कार्यक्रम आठवतात.तेव्हां दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम आणि मग रात्री ठराविक वेळ दिल्ली दूरदर्शन चे कार्यक्रम असत.             सद्यस्थिती पाहता,दूरदर्शन वरील वाहिन्या,आणि त्यावरील वेगवेगळ्या मालिका हा एक मोठा चर्चेचा विषय आहे,TV सेट आज घराघरात दिसतात एक वेळ 'तुळशी वृंदावन' दिसणार नाही पण TV मात्र आहेतच.. सर्वांचेच विश्व ह्या TV भोवती थोड्या बहुत प्रमाणत फिरते.. मोठ्यांना नोकरी व्यवसाय सांभाळून,जो वेळ मिळेल त्या वेळात आवडत्या मालिका बघणे हा एक रोजचा कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम चुकतच का...

जाणता राजा...

इमेज
आपल्या प्रत्येकात एक 'शिव छत्रपती' आहेत....सध्या कुठे हरवले आहेत ते ? महाराष्ट्राचे सोने करणारा,खरया अर्थाने महाराष्ट्राला जागे करणारा,चैतन्य देणारा आणि स्वातंत्र्य देणारा असा आपला राजा.....आज ह्या राजाची भारताला गरज आहे. सच्चाई,सचोटी,न्याय,खलांचे निर्दालन,शौर्यं, धिटाई,सर्व गुणांच्या एकत्रीकरणासाठी त्या जिजाऊला किती मेहेनत घ्यावी लागली असेल! आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली ती एक आदर्श माता,महाराजान मधला कणखरपणा, आणि स्वातंत्र्याबद्दलची ओढ,निर्माण करणे हे जणू तिचा जिवित उद्देश्य होते. आज आजूबाजूला आपल्या देशात अन्यायपूर्ण अश्या अनेक गोष्टी घडताहेत.वर्तमानपत्रातली पाने हि अश्या बरयाच बातम्यांनी भरलेली असतात ज्या वाचून मन अस्वस्थ होते.... सगळीकडे 'भ्रष्टाचाराचे राज्य'...हा आपला शत्रू इतक्या सहजपणे देशात घुसून आतल्या आत देश पोखरतो आहे...."सगळी सिस्टिमच जर बिघडली असेल तर मग मी एकट्याने बदलून काय होईल?" असा मुलभूत प्रश्न सगळे एकमेकांना विचारतात जेव्हां असे विषय चर्चेत येतात. सर्वांसाठी केलेले असे स्वतःचे असे राज्य जे स्वराज्य ते प्रत्येकासाठी आहे;...

आमची गच्ची!

गच्ची.....................घराला असली कि उंचावरून बरच काही अनुभवता येते. लहानपणी गच्चीवर खेळायला जायचो,धमाल यायची! सुटीत गच्चीचा वापर खेळण्यासाठी....आणि परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी करत असे मी. गच्चीवरून रात्री चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश बघताना,चटईवर उताणे झोपून गप्पा मारत आम्हीं बहिणी आणि आईबाबांबरोबर ती आकाशगंगा दुर्बिणीतून पाहताना,थंड वाऱ्याच्या झुळ्कीला अंगावर झेलत मस्त पडून राहायचो, डोळे भरून चांदण्या पाहताना थोड्या वेळासाठी शांतपणे एकही शब्द न बोलता ते आकाश अनुभवायचो, मध्येच येणारा रातकिड्यांचा आवाज, एखाद्या पक्ष्याचा आवाज आणि शेजाऱ्यांच्या घरातून येणाऱ्या TV चे आवाज सोडले तर अगदी मध्येच गाड्यांचे व रस्त्यावरच्या तुरळक लोकांचे बोलण्याचे आवाज येत असत.हि गच्चीसहल कधी कधी उकडलेल्या किंवा भाजलेल्या शेंगांची मेजवानी पण घेऊन यायची.कधी कधी तेव्हा बाबा गाणे म्हणत त्यांचा सूर इतका छान लागायचा कि ती संध्याकाळ खरच गच्चीत संगीतमय होऊन डोलू लागायची. शेजाऱ्यांच्या गच्चीचे होणारे दर्शन, वाळत घातलेले कपडे, काहींच्या गच्चीत तर पापड आणि मिरच्या पण वाळत अ...