पोस्ट्स

"मेरी झाँसी नही दूँगी!"

इमेज
सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी, बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी, गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी। चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।। कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी, लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी, नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी, बरछी ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी। वीर शिवाजी की गाथायें उसकी याद ज़बानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।। लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार, नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार, सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवार। महाराष्टर-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।। हुई वीरता की वैभव के स...

"सुट्टी"

        "सुट्टी"शब्दाची जादूच अशी आहे कि सगळी मंडळी ती पडली कि एकदम खुश!सुट्टीचा आनंद काही वेगळाच.सक्तीची सुट्टी वेगळी पण घेतलेली सुट्टी,मग ती शाळेला सुट्टी असो,ऑफिसला किंवा घरकामाला, ह्या शब्दात एक मौज आहे.लहानपणी शाळेत जाणे,शाळेतला अभ्यास,शाळेतला खेळ आणि इतर शालेय उपक्रम,स्पर्धा ह्या व्यतिरिक्त आम्हां मुलांचे एक वेगळे विश्व नक्कीच होते.ह्या विश्वात जो वेळ मिळायचा तो नेहमीच कमी वाटायचा,"अजून थोडा वेळ आलेच ग आई","थोडे वाचते अजून","अजून खेळूदे न",हि अशी वाक्य आठवतात.          शाळा संपून लागलेली सुट्टी 'मे महिन्याची',दुसरी दिवाळी आणि मग गणपतीची सुट्टी ह्या सुट्टीतले कार्यक्रम सणासुदिशी निगडीत असत.घरात पाहुणे मंडळी एक वेगळेच उत्साहाचे सणाचे वातावरण.आम्हीं मुले ह्या वातावरणाचा एक भाग बनून जात असू.मग घरात मोठ्यांना कामात मदत करताना पण सुट्टी असल्याने एक आनंद मिळायचा.गणपतीत मोदक बनवायला आणि आपण बनवलेले मोदक खायला एक वेगळीच गम्मत वाटायची  गणपतीची आरास,आरत्या,प्रसादाचे जेवण,असा हा  मिळून साजरा केलेला गणेशोत्सव,काकांकडे सगळे जमत असू सुट...

'सुंबरान-सोनेरी दिवसांच्या आठवणी'.

इमेज
        हल्लीच एक चित्रपट पहिला,मराठी चित्रपट..पूर्वी असलेल्या मराठी चित्रपटांपेक्षा वेगळा असा.चित्रपटाकडून जेव्हां काही गोष्टी शिकायला मिळतात तेव्हां ती नुसतीच करमणूक राहत नाही तर चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर एक समाधान असते,काहीतरी मिळवल्याचा आनंद असतो!आजपर्यंत असे फारच मोजके चित्रपट पहिले आहेत ज्यातून खूप काही मिळाले,त्यातलाच श्री.गजेंद्र अहिरे दिग्दर्शित,'सुंबरान-सोनेरी दिवसांच्या आठवणी'.                  ह्या चित्रपटाची कथा,त्यातील पात्रे,त्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध,पिढ्यानपिढ्या जपलेल्या अश्या आणि आता जीर्ण झालेल्या वाड्याशी असलेली प्रत्येकाची भावनिक गुंतवणूक,नात्यांमधील सच्चेपणा आणि भूतकाळातील अनेक घटनांची वर्तमानात केलेली पेरणी,असा हा चित्रपट.ह्या कथानकातील काही पात्रे हि स्वतःचा भूतकाळ आपल्याला सांगत आहेत.वर्तमानातल्या आजच्या त्यांच्या परिस्थितीला त्यांचा भूतकाळ हा कसा जबाबदार आहे हे आपणास हळू हळू उलगडत जाते.       अस म्हणतात,'जेव्हा विचारांच्या शृंखला होतात,काह...

! शाश्वत !

इमेज
 सहजच कधी ह्या वाटेवर     'अनोळखी'बनून तरी एकदा,    उतरू देत तुझी पाऊले.    मग सापडतील मला,    माझे हरवलेले क्षण.    कितीही वाटले,       मनात मळभ  दाटले  तरीपण,                   थोडक्यात  निवांत  बोलू,भेटू,रडू .......       ओळखीचेच हसू पण'खरे'.           तुझ्यामाझ्यात अंतर कधी वाढलेच  नव्हते        पडलाच नव्हता ग, कुठे घाव         साधले होते सगळे सगळे भाव       एका रेषेत सरळ,चालत आयुष्य होते.         पण सगळीच'पूर्णता'नको म्हणालीस,      उतरून गेलीस'हृदयाचा जिना.      'परत न येण्याचे'दिलेस वचन        खात्रीने स्वतःची काळजी घेण्याचा      घेतलास'पण',     ...

'शब्द' माझी एक कविता......

इमेज
शब्द,पाऊल पाऊल उचलता,भारावले. वेडेपिसे पसरले,     अंगी अंगी शहारले... शब्द रुतले अंतरी    अन काळीज हेलावले भाव नेत्री ओथंबले      शब्दाळले,ओलावले... शब्द रुपेरी चंदेरी    असा नृत्य भास सारा. आणि हसरे आनंदी    खेळविती ह्या मनाला. शब्द नाठाळ चावट,  शब्द कधी आरोपिती. वेडे भन्नाट रागिट, कधी मनात दडती. शब्द भावभावनांचे.  असती स्वर अंतरीचे.  सापडले मौल्यवान   दूत असे हे मनाचे...    --श्रिया  -

'कवडसे'

इमेज
                     'कवडसे',किती सुंदर आणि किती स्मृतींच्या मागे पुढे पडलेले !!!...जरा ऊन आले कि पटकन एखाद्या खिडकीच्या फटीतून आलेला एक उभा कवडसा... त्या कवड्श्यामध्ये नाचणारे धुळीचे कण.सावली आणि ऊन ह्यांचा खेळ.केळीच्या हलणाऱ्या पानाशी खेळणारे ऊन, वारयामुळे ह्या पानाची एक हालचाल,हलणारी सावली.              दुपारी लहानपणी झोप यायची नाही पण आई सुटीच्या दिवशी मागे लागायची,थोडा वेळ आमची मस्ती कमी व्हावी म्हणून असणार आणि दुपारची शांतता राहावी हा दुसरा उद्देश.मग काय,अजूनही आठवते,कौलारू छपरातून ऊन कसे आत डोकवायचे,लहान लहान उन्हाचे कवडसे,काही उतरून पलंगावर उताणे पडलेल्या माझ्या  अंगावर पडत.मग मी उठून ते हाताच्या तळव्यावर घ्यायचा प्रयत्न करायचे.कधी कधी एकदम वर्तुळाकार असे देखील कवडसे येत.काळोख असलेल्या त्या खोलीत हे 'कौलारू ऊन' हवेहवेसे वाटायचे!पूर्ण दुपार नाही पण थोडीशी दुपार जेव्हां जाग असायची मला,मी असा हा उन कवड्श्यांचा खेळ पाहायचे.ताटावर उन झेलून त्याच्याव...

"कुठे काही चुकते आहे का?"

इमेज
                मनात किती वेळा हा विषय येऊन गेला.ह्या विषयावर लिहायचे म्हणजे कमीच आहे!पण लिहायचे आज मनात होते म्हणून हा प्रयत्न!कुठे काय चुकते आहे ते कळण्यास मार्ग नाही पण नक्कीच काहीतरी चुकत जाते.आणि ह्यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.            आजोबांचा प्रेमळ धाक आठवतो.त्यांनी शिकवलेली रामरक्षा,श्लोक,पाठांतर,एक प्रकारची शिस्त. घरातले वातावरण आजी आजोबांमुळे आमच्यासाठी खूप वेगळे होते.लहानपण त्यांच्या सोबत कसे उमलून आले आणि अनेक उत्तम संस्काराची बीजे कशी पेरली गेली आमच्यात ते आज जाणवते.त्यांचे घरातले महत्व अनन्यसाधारण होते हे नक्की.मी असा विचार करू शकत नाही कि आमचे घर आणि त्यात मी आई बाबा आणि आम्हीं बहिणी अर्थात,आता आजी आजोबा नाहीत पण ते असताना जो घरात ओलावा होता,त्यांच्यामुळे जे चैतन्य होते ते,आम्हां सर्वांमध्ये नक्कीच उतरले आहे.           'वृद्धाश्रम,ह्या नावात सगळे आले का? 'घरात नको' म्हणून,'निरुपयोगी' म्हणून,असे अनेक शब्द अ...