'शब्द' माझी एक कविता......





शब्द,पाऊल पाऊल
उचलता,भारावले.
वेडेपिसे पसरले,
    अंगी अंगी शहारले...

शब्द रुतले अंतरी 
  अन काळीज हेलावले
भाव नेत्री ओथंबले 
    शब्दाळले,ओलावले...

शब्द रुपेरी चंदेरी 
  असा नृत्य भास सारा.
आणि हसरे आनंदी 
  खेळविती ह्या मनाला.

शब्द नाठाळ चावट,
 शब्द कधी आरोपिती.
वेडे भन्नाट रागिट,
कधी मनात दडती.

शब्द भावभावनांचे. 
असती स्वर अंतरीचे. 
सापडले मौल्यवान
  दूत असे हे मनाचे...

   --श्रिया 
-

टिप्पण्या

  1. शब्द,पाऊल पाऊल
    उचलता,भारावले.
    वेडेपिसे पसरले,
    अंगी अंगी शहारले...

    waah.... khup divasani tujhi kavita.... ani bhidali...khup bhavali... !!!

    उत्तर द्याहटवा
  2. छान झालीये कविता ....... तुझ्या कवितेला कवितेतूनच दाद...
    शब्द आनंदी हसरे
    शब्द रडके बोचरे
    शब्द नाठाळ चावट
    शब्द रागीट तापट
    शब्द दाटले दाटले
    ओठातच अडकले
    भाव अंतरीचे
    नेत्रातून पोहचले

    उत्तर द्याहटवा
  3. श्रिया ताइ...मस्त झाली आहे कविता...आवडली
    >>
    शब्द रुतले अंतरी
    अन काळीज हेलावले
    भाव नेत्री ओथंबले
    शब्दाळले,ओलावले

    हे खुप आवडल :)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ