! शाश्वत !



 सहजच कधी ह्या वाटेवर

    'अनोळखी'बनून तरी एकदा,
   उतरू देत तुझी पाऊले.
   मग सापडतील मला,
   माझे हरवलेले क्षण.


   कितीही वाटले,
      मनात मळभ दाटले तरीपण,  
               थोडक्यात निवांत बोलू,भेटू,रडू .......
      ओळखीचेच हसू पण'खरे'.

  
       तुझ्यामाझ्यात अंतर कधी वाढलेच नव्हते 


      पडलाच नव्हता ग, कुठे घाव 

       साधले होते सगळे सगळे भाव 
     एका रेषेत सरळ,चालत आयुष्य होते.

        पण सगळीच'पूर्णता'नको म्हणालीस,
     उतरून गेलीस'हृदयाचा जिना.
     'परत न येण्याचे'दिलेस वचन
       खात्रीने स्वतःची काळजी घेण्याचा
     घेतलास'पण', 
      पण मी घसरतच राहिलो ग....


   उमटत  राहिले मनावर 

असंख्य आठवणींचे 'पडसाद' 
   नादावले मन शेवटपर्यंत.
 अन तुझ्यासाठी आजही 
    ती वेडी वाट चालत सुटतो.

   उरतात 
सोबतीला 

फक्त तुझ्या'सावल्या' 


ओळखीच्या हसत ...

श्रिया (मोनिका रेगे )

   





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ