पोस्ट्स

जाणता राजा...

इमेज
आपल्या प्रत्येकात एक 'शिव छत्रपती' आहेत....सध्या कुठे हरवले आहेत ते ? महाराष्ट्राचे सोने करणारा,खरया अर्थाने महाराष्ट्राला जागे करणारा,चैतन्य देणारा आणि स्वातंत्र्य देणारा असा आपला राजा.....आज ह्या राजाची भारताला गरज आहे. सच्चाई,सचोटी,न्याय,खलांचे निर्दालन,शौर्यं, धिटाई,सर्व गुणांच्या एकत्रीकरणासाठी त्या जिजाऊला किती मेहेनत घ्यावी लागली असेल! आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली ती एक आदर्श माता,महाराजान मधला कणखरपणा, आणि स्वातंत्र्याबद्दलची ओढ,निर्माण करणे हे जणू तिचा जिवित उद्देश्य होते. आज आजूबाजूला आपल्या देशात अन्यायपूर्ण अश्या अनेक गोष्टी घडताहेत.वर्तमानपत्रातली पाने हि अश्या बरयाच बातम्यांनी भरलेली असतात ज्या वाचून मन अस्वस्थ होते.... सगळीकडे 'भ्रष्टाचाराचे राज्य'...हा आपला शत्रू इतक्या सहजपणे देशात घुसून आतल्या आत देश पोखरतो आहे...."सगळी सिस्टिमच जर बिघडली असेल तर मग मी एकट्याने बदलून काय होईल?" असा मुलभूत प्रश्न सगळे एकमेकांना विचारतात जेव्हां असे विषय चर्चेत येतात. सर्वांसाठी केलेले असे स्वतःचे असे राज्य जे स्वराज्य ते प्रत्येकासाठी आहे;...

आमची गच्ची!

गच्ची.....................घराला असली कि उंचावरून बरच काही अनुभवता येते. लहानपणी गच्चीवर खेळायला जायचो,धमाल यायची! सुटीत गच्चीचा वापर खेळण्यासाठी....आणि परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी करत असे मी. गच्चीवरून रात्री चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश बघताना,चटईवर उताणे झोपून गप्पा मारत आम्हीं बहिणी आणि आईबाबांबरोबर ती आकाशगंगा दुर्बिणीतून पाहताना,थंड वाऱ्याच्या झुळ्कीला अंगावर झेलत मस्त पडून राहायचो, डोळे भरून चांदण्या पाहताना थोड्या वेळासाठी शांतपणे एकही शब्द न बोलता ते आकाश अनुभवायचो, मध्येच येणारा रातकिड्यांचा आवाज, एखाद्या पक्ष्याचा आवाज आणि शेजाऱ्यांच्या घरातून येणाऱ्या TV चे आवाज सोडले तर अगदी मध्येच गाड्यांचे व रस्त्यावरच्या तुरळक लोकांचे बोलण्याचे आवाज येत असत.हि गच्चीसहल कधी कधी उकडलेल्या किंवा भाजलेल्या शेंगांची मेजवानी पण घेऊन यायची.कधी कधी तेव्हा बाबा गाणे म्हणत त्यांचा सूर इतका छान लागायचा कि ती संध्याकाळ खरच गच्चीत संगीतमय होऊन डोलू लागायची. शेजाऱ्यांच्या गच्चीचे होणारे दर्शन, वाळत घातलेले कपडे, काहींच्या गच्चीत तर पापड आणि मिरच्या पण वाळत अ...

एक निवांत क्षण!

आजकालच्या धावपळीच्या जगात, एक निवांत क्षण मिळणे कठीण! स्वतःशी कधी एकांतात बसून गप्पा मारलेल्या स्मरतात का? सकाळपासून रात्री पर्यंतचे घड्याळाच्या काट्यावर धावणारे आपले पाय, आपले विचार, कधी विश्रांती असते का ह्यांना? 'कालनिर्णयाचा' नवा अंक विकत घ्यायला जाताना अचानक जाणवते;कि अरेच्या!, नवीन वर्ष परत इतक्या पटकन आलेच..... एकमेकांना नवीन वर्षाभिनंदन करताना परत सर्वांच्या मनात नवे संकल्प उभे राहतात, हे करणार, ते करणारच्या मनोमनी घोषणा पण होतात, पण परत एकदा येतो 'सोमवार' आणि सुरवात होते त्याच त्या कामांना, आणि केलेले संकल्प कितपत आपण पुरे करू शकतो नवीन वर्षात? काही दिवसांपूर्वी मुंबईत असताना मैत्रिणीकडे गेले होते. ती एका टोलेजंग इमारतीत राहते. खाली मुलांना खेळायला पार्क, सुंदर व्यवस्था ,सर्व काही मनासारखे,असे तीच सांगत होती ....तिला तिची एक मुलगी,चांगली नोकरी, मनासारखा संसार....पण चेहरा चिंताक्रांत वाटला. म्हंटले,' काय ग कसले प्रश्न पडले आहेत का?काळजीत वाटतेस'....म्हणाली "आहेच ग, दिवस कसा संपतो कळत नाही, आधी नोकरी करत न्हवते तेव्ह...

सुधारणा विशेष --- समाजाला खरच हे कायदे उपयोगी कि दिखाऊ!

इमेज
SUPREME COURT OF INDIA सकाळी उठले तेव्हां खूप साऱ्या विचारांची गर्दी झाली होती मनात, परवा एका मैत्रिणीशी बोलता बोलता जाणवले कि मातृभूमी बदलत चालली आहे.माझी मैत्रीण सुद्धा इकडे परदेशातच आहे. आम्हीं देशाबाहेर पडलो त्या दिवशी मातृभूमीचे ते दर्शन मनात चित्रित झाले, ते कायम राहिले.नंतर इतक्यांदा गेले देशात पण पाउल पहिल्यांदा बाहेर टाकले तेव्हाचा भारत लक्षात राहिला आहे.किती बदल!आणि का.....योग्य अयोग्य,अनेक प्रकारचा,सगळे जगच जिथे बदलते आहे,तिथे हे आलेच! सुधारणा !म्हणून; इकडच्या काही गोष्टी ज्या खरच बरोबर आहेत त्या अनुसरणे बरोबर ठरले असते पण ते न करता ज्या गोष्टी आपल्याला नुसते modern,HI -FI, काहीतरी वेगळे करतो आहोत हि जाणीव देते तितकेच फक्त घेतो आहोत असे वाटले. 'एकत्र कुटुंब पद्धती',मग 'हम दो और हमारे दो' आणि आता सिर्फ 'हम दो ' ह्या जमान्यापर्यंत तर आलो खरे,ह्याही पुढे जाऊन मी ऐकले आहे कि,पाश्चिमात्य देशांतून घडत गेलेली कल्पना 'लिवि...

!!!! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं !!!!

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत! हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून, गात रहा; आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा. झुळझुळणार्‍या झर्‍याला मनापासून ताल द्या; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. कवी – मंगेश पाडगांवकर

माझी मी

इमेज
कधी कधी असा विचार करते कि 'मी कशी आहे?'प्रत्येक व्यक्तीला मी वेगळी वाटते....सर्वांना जाणवणारे असे काही स्वभाव गुणधर्म आहेत ....पण खरी मी कशी आहे हे कोणाला माहित?आहे,पण फक्त मला. कारण ते असे शब्दात सांगता येते का,किती सारया गोष्टी असतात स्वतःला माहित,वाटते पण त्या सांगता येत नाहीत,का येत नाहीत तर वाटून गेले ते सगळे मनातले उघड नसते.किती सारे अनुभव गाठीशी असतात....आणि ते जिवंत अनुभव खूप काही शिकवून जातात.काय महत्वाचे असते जगण्यासाठी,रोजच्या आपल्या उठण्या बसण्यात लहान मोठ्या अनेक गोष्टी घडत असतात. आपल्यासाठी एखादी खूप महत्वाची वाटणारी गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची असेलच असे नाही.सगळे मनासारखेच होते असे नाही आणि ह्यात पण एक गम्मत आहे.मग आपण विचार करतो,आपल्या मेंदूला खाद्य मिळते.असं नक्की का झाले असेल,माझे काही चुकले असेल का,कि हा पण एक अनुभव असं समजून राहावे,शांत राहावे,जे घडून गेले ते घडून गेले,त्यावर विचार करून काहीच मिळत नाही. तसेच आनंदाचे क्षण येतात आणि मग स्वतःचा विसर पडतो,एखाद्या वेळी अचानक स्नो पडू लागला कि जसे वाटते एकदम गार आणि नवीन,जिवंत झाल...

! पाऊस असा हा रुणझुणता !

इमेज
आज सकाळी नेहमीसारखी उठले , बाहेर सूर्यनारायणाने दडी मारलेली दिसली , आणि ' नभ मेघांनी आक्रमिले ' चा अनुभव आला . काळोख दाटून आलेला आणि पावसाची सर नुकतीच येऊन गेलेली ... परत येण्याची चिन्ह होती . हा इकडचा , कॅनडा चा पाऊस पाहिला कि खरच गम्मत वाटते . कधीतरी अगदी एखाद दुसरी सर आली तरीही , इथल्या लोकांची तारांबळ उडते . रेन बूट्स , छत्र्या , रेन कोटस घेण्यासाठी shopping centers,mall मध्ये थोडीशी गर्दी दिसते इतकंच त्या पावसाचे कौतुक ! छत्री उघडे उघडे पर्यंत म्हणता म्हणता पाऊस गायब होतो , आणि मग घरी येई पर्यंत पाऊस नाही .. कधी कधी अचानक येऊन भिजवून जातो खरा पण जाणवत पण नाही इतके कारण , घरी येईपर्यंत तुमचे कपडे बरयापैकी सुकलेले असतात , पण इकडच्या लोकांना एकाद दिवस जर थोडा जास्त पाऊस पडला तर कोण कौतुक वाटते त्याचे !' rainy day ' म्हणून त्या दिवसाचे नामकरण केले जाते . मग घरात बसून कंटाळा येतो अश्या दिवशी म्हणून shopping centers मध्य...