तुझे माझे असे काहीसे !

'हुरहूर' शब्दात सगळे आले...
साठवलेले,तरळलेले
ओलेत्या पापणीतून सांडलेले
धुक्यागत दाटलेले...

आठवणींच्या पडद्याआड लपलेले
पावसागत उधाणलेले
अनपेक्षित आनंदातले
सावरता न येणाऱ्या भावनांमधले

ओंजळीत साठवून ठेवलेल्या कळ्या जणू
संध्याप्रकाशात सामावलेले
पावलोपावली जाणवणारा  आधारस्थंभ
शब्दांमधून कासावीस करून जाणारे....

नटलेले,सजलेले,मोहरवून टाकणारे
रागावणारे,रुसणारे,लांब जाऊन बसणारे...
एकंच रे ते असे, तुझे प्रेम......माझे 'फक्त' माझे वाटणारे!

-- श्रिया(मोनिका रेगे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ