श्री गुरूदेव दत्त !
आज श्री दत्त जयंती.
बालपणी आम्ही चौल भोवाळे येथील दत्ताच्या जत्रेला जात असू.बालपणीच्या विश्वात जत्रेला जाणे म्हणजे एक आनंदाचे देणे असायचे.मोठ्यांच्या सोबत कधी बैलगाडीतून,कधी रिक्षा,काही प्रवास पायी,आणि मग देवळापर्यंत पायऱ्या.अर्थात आमचे लहानगे जग त्या जत्रेतील वेगवेगळी आकर्षणे,विविध खेळ,डोंबारी,माकडाचे खेळ,भिंगर्या,फुगे,पिपाण्या,उसा
खारे शेंगदाणे,चणे फुटाणे,चना चोर गरम,भज्यांचे विविध प्रकार ह्यांचा घमघमाट हवेतल्या गुलाबी थंडीत पसरलेला असायचा! चहा कॉफीची लहान टपरी असायची.आम्ही जेवून आलेलो असायचो पण पुन्हा एकदा भूक लागायला हे सारे पुरेसे होते.
ओळखीचे अनेक चेहरे दिसायचे,कानटोपी,स्वेटर,शाली दिसत,रंगविरंगी कपड्यांनी नटलेल्या,केसात फुले,गजरे माळून उत्साहात फिरणाऱ्या ललना,चिमुरडी मुले त्यांच्या हातात साखर पेरलेला गुलाबी कापूस,बत्तासे,हट्ट करणारी काही मंडळी,त्यांची समजूत काढण्याचे विविध प्रकार करणारे आई वडील..
प्रचंड आवाज,आकाश पाळणे,मोठमोठ्या लाऊड स्पीकर वर चाललेल्या घोषणा,एक न दोन ह्या जत्रेतील माझ्या आठवणी कायम रुजल्या आहेत.बालपणातील जत्रेतील ते रंग,आवाज,उत्साह,देवळातील प्रसन्न वातावरण,सणाचे,पवित्र वातावरण,खूप मौज वाटायची.
आज श्री अक्कलकोट स्वामी महारांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा योग होता.
खूपच प्रसन्न वाटले.ही एक वेगळीच अनुभूती होती.मन हलके फुलके होऊन पुन्हा एकदा दत्ताच्या जयंती उत्सवानिमित्त भरणाऱ्या जत्रेच्या आठवणीत हरवले!
ह्या लेखा सोबत आजचे दर्शन आणि चौल भोवाळे येथील श्री दत्तगुरु ह्यांची मूर्ती तसेच परिसर ह्याची छायाचित्र येथे पोस्ट करत आहे.
- मोना











वाssssकिती सुंदर लिहीतेस तु! दत्तदर्शनही सुरेख.. Really tallented . खूप शुभेच्छा 💐❤️
उत्तर द्याहटवाधन्यवाद शीला 😊🙏🏻
हटवाReading this brought back memories of the fairs I used to visit as a child. The sights, sounds, and smells all feel so alive through your words. Really nice blog and the photos are beautiful too!
उत्तर द्याहटवाThank you Sarvesh for reading my post,and I am glad that you liked it .Keep reading and your comments and suggestions are valuable!
हटवाVery well written , you touched every aspect.
उत्तर द्याहटवाIt brings back so many good memories.
Wonderful to read, keep it up.
Expecting more, obviously.
Thank you Prasad for reading my post. खूप छान वाटले वाचून, आपल्या अलिबाग रेवदंडा येथील देवस्थाने,पुरातन असून येथील जत्रा खरोखर सर्वांनाच आवडीच्या आहेत!असेच वाचत रहा आणि नक्कीच गुगल अकाऊंट मधून प्रतिक्रिया दिल्यास तुझे नाव दिसेल.
हटवाव्वा डोळ्यासमोर उभे राहिले सगळे, जसेच्या तसे!!
उत्तर द्याहटवातुझ्या बोलक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद वैभव.
हटवा