ह्यांचे व्यर्थ न हो बलिदान!
"क्रांतिकारक" हा शब्द किती जबरदस्त अर्थपूर्ण आहे नाही! ज्यांच्या नसानसात क्रांतीपूर्ण विचार भरले आहेत, आणि जे आपल्या जीवाची परवा न करता देशासाठी,निस्वार्थ वृतीने कार्यरत आहेस अश्या व्यक्ती. आज बघाल तर इतिहासजमा झालेली काही मंडळी,ज्यांची नवे अभ्यासात शिकून आदर्श विचार मनात येऊन जातात,लहानपणी पाठ्यपुस्तकात ज्यांची माहिती अभ्यासली हे क्रांतिकारक काहींच्या मनात खोलवर ठसा उमटवून जातात.असेच ३ म्हणजे,भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव! दिनांक २३ मार्च १९३१ ह्या दिवशी ह्या तीन देशभक्तांना ब्रिटीश सरकारने ८० वर्षांपूर्वी फाशी दिले,तेव्हां लोकांमध्ये हलकल्लोळ माजला,साहजिकच आहे! आज जेव्हां इतक्या वर्षांनी देखील ह्या ३ क्रांतीवीरांचे स्मरण आपल्या मनाला हेलावून सोडते तर अर्थात ८० वर्षापूर्वी लोकांमध्ये किती असंतोष इंग्रज सत्तेविरुद्ध चीड निर्माण झाली असेल,तो दिवस काळाच्या इतिहासात कोरला गेला आहे! ...