' आपली मराठी '
"मराठी असे आमुची मायबोली...जरी आज ही राजभाषा नसे.
नको आज ऐश्वर्य ह्या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे"
सर्वात शेवटी एक अप्रतीम गीत आपल्या आवडत्या मराठी भाषेवर.......
नको आज ऐश्वर्य ह्या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे"
प्रत्येक मराठी व्यक्तीला मराठीचा रास्त अभिमान असतोच!
भारतात महाराष्ट्रात मराठी,वेगवेगळ्या गावातली,तिची वेगवेगळी रूपे,बोली मराठीतली वेगवेगळी गम्मत, देशावरची, कोकणातली,घाटावरची,पण शेवटी काय,मराठी ची गोडी अवीट !
भारतात महाराष्ट्रात मराठी,वेगवेगळ्या गावातली,तिची वेगवेगळी रूपे,बोली मराठीतली वेगवेगळी गम्मत, देशावरची, कोकणातली,घाटावरची,पण शेवटी काय,मराठी ची गोडी अवीट !
परदेशात इतकी वर्ष राहिल्यावर जेव्हां कुठे रस्त्यात मराठी कानावर पडते तेव्हा एकदम आनंद होतो.बोलत रहावेसे वाटू लागते ह्या मराठीत!माझ्या मुलीचा जन्म इथला.पण आम्हीं कटाक्षाने पाळले एक तत्व,'घरात फक्त मराठी बोलायचे'.शाळा सुटली तिची कि मराठी सुरु ते थेट दुसरया दिवशी शाळेत जाई पर्यंत.तिने मराठी भाषा उत्तम आत्मसात केली.तिला मराठी बोलता येते ह्याचा अभिमान वाटतो.लिहिता आणि वाचता पण नक्कीच येईल कारण त्या दृष्टीने ती पण स्वतःखूप प्रयत्नशील आहे.
मध्ये एक अनुभव आला.खरेदीसाठी बाहेर गेले होते.बाजूलाच एक कुटुंब होते,भारतीय वाटले. आपापसात मराठीत संवाद सुरु होते म्हणून माझे लक्ष गेले आणि वाटले कि आता नवीन संवाद होतील, म्हणून नमस्कार करून मराठीत बोलण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला मी.'निष्फळ' हा शब्द का वापरला तर, मी मराठीत सुरवात केली आणि त्या क्षणी त्या जोडप्याने माझ्याशी इंग्रजीत संवाद सुरु केला. मी मराठीत आणि ते इंग्रजीत अस बरोबर वाटेना म्हणून मग मी हार पत्करली.मला थोडे वाईट वाटले.ओळख झाली आमची पण एक दुवा जो भाषेचा तो,त्या क्षणी हरवला होता. कारण,,,त्या जोडप्यालाच माहित.
असा हा पहिला वाहिला अनुभव नाही बरका! एका बाजूला आपल्या मुलांना 'मराठी' का बरे येत नाही,असे बोलत आणि चूटपुटत राहून त्यांना मराठी शिकण्यासाठी क्लास्सेसना घालण्याचा ह्या मराठी आई बाबांचा खटाटोप पाहून वाटते,मराठी इतकी कठीण आहे का? स्वतः जोवर अभिमानाने भाषा मिरवणार नाही तोवर मुलांच्या मनात कशी रुजवणार? नुसते दागदागिने,कपडे मोठाली घरे आणि गाड्या हेच फक्त मिरवता येते असे आहे का?
असा हा पहिला वाहिला अनुभव नाही बरका! एका बाजूला आपल्या मुलांना 'मराठी' का बरे येत नाही,असे बोलत आणि चूटपुटत राहून त्यांना मराठी शिकण्यासाठी क्लास्सेसना घालण्याचा ह्या मराठी आई बाबांचा खटाटोप पाहून वाटते,मराठी इतकी कठीण आहे का? स्वतः जोवर अभिमानाने भाषा मिरवणार नाही तोवर मुलांच्या मनात कशी रुजवणार? नुसते दागदागिने,कपडे मोठाली घरे आणि गाड्या हेच फक्त मिरवता येते असे आहे का?
भाषेचा अभिमान देश सुटला म्हणून सुटू शकत नाही. इथले इतर भाषिक पाहते.चीनी लोक, त्यांची कठीण भाषा पण मुलांना शिकवतातच.त्यांची इकडे जन्मलेली पिढी देखील बाहेर जरी इंग्रजी बोलत असतील तरीही घरात आले कि पूर्णपणे त्यांच्या भाषेचा पेहेराव करतात.ते संस्कार टिकवणे आणि पुढे न्हेणे त्यांना खूप महत्वाचे वाटते.आपल्याला का अशी जाणीव नाही हा विचार मात्र करणे गरजेचे आहे.
एक तर आज खूप जलद गतीने प्रगतीच्या मागे धावणारा विद्यार्थी,वाचनाची आवड किती मुलांना जोपासता येत असेल कोण जाणे! माझे बाबा लहानपणी आम्हां बहिणींना पुस्तक प्रदर्शनात न्हेत.तिकडे मराठी लेखकांची,कवींची ओळख दर वेळी होत असे त्यांच्या नवीन नवीन पुस्तकांतून.बाबांनी वाचनाची सवय आम्हाला लहानपणी लावली,आणि मग आवड निर्माण झाली वाचनाची.आज त्याचा फायदा मला नक्कीच आहे.
इंग्रजी ची गरज आज सगळीकडे आहे,अगदी मान्य.कामावर जाते तिथे मला इंग्रजीतच बोलावे लागते. इकडे तर इलाजच नाही कारण परदेशात आले आहे न! पण मग घरी आले रे आले कि इंग्रजी ला बाजूला ठेवून 'मराठीमय' होण्यातच खरे समाधान लाभते!!!
नोकरी करणाऱ्या आई बाबांना स्वतःसाठी पण खूप कमी वेळ मिळतो,भारतात काय आणि इकडे काय, पण तरीही मी पाहते कि माझ्या काही मैत्रिणी अगदी वेळात वेळ काढून मुलांना मराठी वाचून दाखवतात.छान वाटते ते पाहून.भाषा हि वाढावी,शब्दसंग्रह वाढावा,ह्यासाठी घरात सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.अगदी साधे सोपे खेळ पण खेळता येतात ज्याने मराठी शब्दसंग्रह वाढेल उदाहरणार्थ,शब्दांच्या भेंड्या लावणे.
भाषा कशी वाढेल तर सोबत नेहमी जोपासली आणि पुढच्या पिढ्यान पर्यंत योग्य तर्हेने पोहोचवली तरच तिचा विकास आणि अर्थात आपला विकास होईल.
भाषा कशी वाढेल तर सोबत नेहमी जोपासली आणि पुढच्या पिढ्यान पर्यंत योग्य तर्हेने पोहोचवली तरच तिचा विकास आणि अर्थात आपला विकास होईल.
ह्याबद्दल आपल्याला काय वाटते, आपले मत जरूर इथे नमूद करावे.
आपल्या बोलण्यात कटाक्षाने मराठीच शब्द यावेत ह्या दृष्टीने प्रयत्न करावा.मी करते. कठीण आहे पण जमते आहे.अभिमान वाटतो माझ्या भाषेचा,माझ्या मराठीचा,जिच्यामुळे मला बरंच काही शिकायला मिळाले, माझ्या लोकांची ओळख पटली,अनेक नवीन ओळखी झाल्या मित्रपरिवार वाढला,आज पर्यंतचा माझा प्रवास मराठीत झाला आहे,आणि असाच होत राहील अशी आशा आहे.
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
होय खरं आहे तू म्हणतेस ते. माझा पण अनुभव असाच आहे. मराठीचा अभिमान ठेवा ही सांगायची वेळ आलीये ही खुपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण प्रयत्नशील राहणे व पाठपुरावा करणे हेच आपल्या हाती आहे. जसे तू केलेस तसे आम्ही पण घरांत आधी मराठी व मराठीच हवे हा कटाक्ष ठेवला होता. असो...
उत्तर द्याहटवालेख छान झालाय... अभिनंदन... असेच छान छान लिहीत रहा...
संध्या
संध्या छान वाटले ग तुझी टिप्पणी वाचून... धन्यवाद!
उत्तर द्याहटवाआपणच आपली मराठी जगवली पाहिजे...मी पण खुपदा अनुभव घेतला आहे...मराठी येत असुनही खुप जण हिंदी किंवा इंग्लीश मधुनच बोलतात ...पण मी हार काही मानत नाही...मी अश्या लोकांशी मराठीतुनच बोलतो. . . .छान झाली आहे पोस्ट. :)
उत्तर द्याहटवातुझ्या टिप्पणी बद्दल धन्यवाद योगेश! तू म्हणतोस तसे न हार मानता आपण मराठीतूनच बोलायचे.... :)
उत्तर द्याहटवा