"मुखवटे आणि चेहेरे"

"मुखवटे आणि चेहेरे" ह्या नावाची एक मालिका मराठी दूरदर्शन वर असायची. त्या मालिकेचे नाव विशेष वाटले होते , ते आज आठवले आणि मग विचार येत गेले ते लिहित गेले , आणि हे post तयार झाले.आपल्या आजूबाजूला अनेक चेहेरे फिरताना दिसतात , काही ओळखीचे असतात काही अनोळखी दिसतात , ह्या चेहेऱ्यांना नावे आहेत आणि नावे आणि जोडीला आडनावे ही ह्या चेहेऱ्यांची ओळख असते .ह्यातले किती चेहेरे खरेखुरे वागतात आणि किती मुखवटे पांघरून असतात हे सांगणे कठीण! आज कालच्या जगात खऱ्याची किंमत किती केली जाते , खरया भावनांना किती समजून घेतले जाते , आणि हे चेहेरे असे का मुखवटे घालून फिरत असावेत हे सगळे प्रश्न समोर येतात. खरे मुखवटे नसतात तर स्वभावाला एका मुखवट्याचे स्वरूप येते, वागणे बदलते, खोटे हसू, खोटे समाधान दाखवले जाते, अश्यांची नाती सुद्धा मग एक बनावी अंगरखा पांघरून येतात. खरेतर ; "नावात काय आहे!", म्हणतात..एखाद्याचे नाव आणि ती व्यक्ती ह्यात साधर्म्य असेलच असे सांगता येत नाही , आणि म्हणून वाटते कि मग ह्या चेहऱ्यांना दिलेली नावे, त्यांना तरी काय अर्थ उरतो!
समाजात राहतो, एकमेकांशी बांधले गेलो आहोत. ह्या अवनीने आपल्याला सर्वांना थारा दिला आहे , मग एखाद्याकडे खूप काही मालमत्ता आणि एखाद्याकडे पुरेसे कपडे पण दिसत नाहीत , अश्या फरकात कित्येक माणसाच्या पिढ्या आहेत हे खरे आहे, जणू आपण ते मान्य केले आहे . एकमेकांशी केलेले ते छुपे करार आहेत कदाचित! मग जी मंडळी सुबत्तेत आहेत त्यांना ती आवडते आणि ती रहावी टिकून म्हणून प्रयत्न करताना आपण कोणाला त्रास तर देत नाहीये न, आपल्यामुळे कोणाचे नुकसान तर होत नाहीये न, ह्याचा विचार राहत नसावा, आणि ज्यांच्याकडे धन नाही ते त्यासाठी प्रयत्न करताना मुखवटे चढवत असावेत,सुसंपन्न होणे हे गरजेचे आहे पण त्यासाठी आपल्यातला खरेपणा, सचोटी , जिवंत ठेवणे महत्वाचे आहे. देवाने आपल्याला शक्ती दिली सारासार विचार करण्याची , आणि प्रयत्न करण्यासाठी नेहमीच तो आपल्याला बुद्धी देत असतो. मोठे होताना प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात, अनुभव येत असतात , मोठ्यांकडून बरंच काही शिकायला मिळते , पण पुढे जाऊन मोठे झाल्यावर 'एकला चलो रे!' हे बंगाली वाक्य आपण पाळतो का? इकडे सगळेच एकटे आहेत हे पूर्ण सत्य आहे , ह्या बद्दल मी बोलत नाहीये तर , "स्वतंत्र मत" प्रत्येकाला हवीत, अश्या अर्थी मी म्हणते आहे कि एकला चलो रे बंधू !!
काय बरोबर , काय चूक हे दिवसाच्या शेवटी ठरवण्याऐवजी , आणि समजून उमजून घडणाऱ्या चुका थांबवण्यासाठी मुखवटे उतरवून प्रत्येकाने स्वतःला संधी दिली पाहिजे. आजूबाजूला जगात जे काही चालले आहे , ते सगळे वृत्तपत्रांतून, दूरदर्शन वरून , इंटरनेट च्या माध्यमातून सतत कानावर येते , दिसते पण मग हे प्रश्न प्रश्नच बनून का राहिले आहेत? सर्व समाजातल्या वर्गांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केले तर आणि खरया भावनेने , विचार केले तर सर्वांसाठी बरंच काही करता येण्यासारखे असेल.पुढच्या पिढ्या तरी काही प्रश्नांची उत्तरे आपण त्यांना मिळवून दिली अस आपल्याला सांगतील, आणि अजून प्रयत्न करतील.'जगा आणि जगू द्या !' जिकडे अन्याय होतो आहे तिकडे , "त्याचे मला काय करायचं आहे ?" , "मला काय फरक पडतो !", "आधीच माझ्या जीवनात इतके प्रश्न आहेत पडलेले त्यात मी कशाला विचार करावा आणखीन त्रास करून घ्यावा !", ह्या आणि तत्सम वाक्यांना दूर फेकून द्या कारण हे बोलणारा मुखवटा नको आहे आपल्याला .आपल्याला हवा आहे आजचा चेहरा, जो ह्यावर विश्वास ठेवतो कि हे जग माझे आहे आणि मी जगाचा एक महत्वाचा भाग आहे! मला सर्वांना समान पाहायचे आहे, जरी मी एक कणमात्र प्रयत्न करेन तरीही अनेक कण कण एकत्र येऊन बरंच काही होणार आहे.
हे प्रश्न मग समाजातल्या महागाई, गरिबी, बेकारी, पासून ते राजकीय प्रश्न सुद्धा असतील, पण मला काय वाटते ते मी बोलू शकले पाहिजे, आणि करू शकले पाहिजे. मी एकटी नाही माझे स्वतंत्र विचार मला एकटीने मांडता आले पाहिजेत पण मग मात्र मला सर्वांची साथ हवी , ज्यांना ज्यांना वाटते कि प्रश्न सोडवून उत्तरे मिळवू , त्यांनी हे विचार मनात आणले पाहिजेत.
सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती ह्यांची सांगड घातली गेली तर बरंच काही घडू शकते. एक दोन दिवसात वा एक दोन वर्षात नाही पण सर्वांसाठी केले गेलेलं प्रयत्न हे नक्कीच कधी न कधी उपयुक्त ठरतील.
मग प्रत्येकाला त्याचा खरा हुद्दा मिळेल, तुम्हीं काही उपयुक्त सामाजिक कार्य केलेत तर ते तुमचे खरे नाव , तुम्हीं खरया अर्थाने नावाजले जाल....त्याला बराच अर्थ असेल असे मला वाटते.
स्वतःशी जसे खरे वागता तसेच इतरांशी पण तितकेच मोकळे आणि खरे वागणे खूप महत्वाचे आहे. मुखवट्यांचे जग आपल्यालाच नष्ट करायचे आहे नाहीका?
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे)
सुरेश भटांची एक गझल आठवली ........
काय ती खरी होती आपसातली नाती
सावल्याच सारयांच्या चाचपीत मी गेलो....
तुला हवा तसा धरू कुठून चेहरा
उधार आणला नवीन अजून चेहेरा
तुझा रुकार कि तुझा नकार ऐकतो
प्रकाशतो पुन्हा पुन्हा विझून चेहेरा
अरे सुखात नासली तुझी स्वतंत्रता
कधीच टाकलास तू विझून चेहरा
कळेन जीव हे कसे जिवंत राहती
कसे नटून चालती ,नसून चेहरा
कितीक चाचपायचे अजून चेहेरे
निघे नवाच चेह्र्यामधून चेहरा
तुला जरी फिरून मी कधी न पाहिले
तुझा मनात ठेवला जपून चेहरा ......
काय ती खरी होती आपसातली नाती
सावल्याच सारयांच्या चाचपीत मी गेलो....
तुला हवा तसा धरू कुठून चेहरा
उधार आणला नवीन अजून चेहेरा
तुझा रुकार कि तुझा नकार ऐकतो
प्रकाशतो पुन्हा पुन्हा विझून चेहेरा
अरे सुखात नासली तुझी स्वतंत्रता
कधीच टाकलास तू विझून चेहरा
कळेन जीव हे कसे जिवंत राहती
कसे नटून चालती ,नसून चेहरा
कितीक चाचपायचे अजून चेहेरे
निघे नवाच चेह्र्यामधून चेहरा
तुला जरी फिरून मी कधी न पाहिले
तुझा मनात ठेवला जपून चेहरा ......
Dattatraya Joshi urf ..Shyam kaka म्हणाले...
उत्तर द्याहटवाही तुझ्या जवळ सामाजिक बांधिलाकिची भावना आहे ...ती सतत अशीच तेवत राहू देत ...सर्वसामान्य-न-मधे त्या बद्दल जाणीव निर्माण होवू देत ...साक्षात् संत द्यानेश्वरंनी देखिल ..पसायदान मागतांना ..खला-न-ची व्यंकटी सांडो..हेच मागाने मागितले होते त्या सर्वेश्वर जवळ ...तुझ्या कडून अश्याच सामाजिक बांधिल्किची अपेसका आहे ..नवा समाज निर्माण होंय साठी ..
२५ मार्च २०१० १०-२१ am
श्याम काका तुम्हीं तुमच्या लाघवी शब्दात आम्हां सर्वांना असेच मार्गदर्शन करत राहा, तुम्हीं दिलेली टिप्पणी खरच आवडली ,धन्यवाद!
उत्तर द्याहटवा