!! मला भेटलेला आनंदघन !!
एक आठवणीत राहिलेली व्यक्ती म्हणजे माझ्या लहानपणी घरासमोर एका शेताच्या कडेला एका लहानश्या झोपड्यात राहणारा एक लोहार, आणि त्याचे कुटुंब....म्हणायला सुखी परिवार...
सकाळी पहाटे उठून भराभर सगळे आवरून नवरयाला कामात मदत करणारी त्याची ती कष्टाळू बायको आठवली कि वाटते इतक्या कष्टात,गरिबीत पण आनंदाने रोजचा दिनक्रम पार पाडत, चेहेऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवू शकणारी अशी किती माणसे असतात? अश्या ह्या व्यक्तींबद्दल आज लिहिते आहे खरे पण त्या आठवणी इतक्या जबरदस्त आहेत ,ते चेहेरे इतके खोलवर मनावर परिणाम करून गेले आहेत कि इतके सारे प्रभावी शब्द नसतील कदाचित माझ्या साठवणीत....जे मला ह्या माझ्या आठवणी मांडायला, तुमच्या समोर , मदत करतील! तरीही हा प्रयत्न करते आहे.
सकाळी पहाटे उठून भराभर सगळे आवरून नवरयाला कामात मदत करणारी त्याची ती कष्टाळू बायको आठवली कि वाटते इतक्या कष्टात,गरिबीत पण आनंदाने रोजचा दिनक्रम पार पाडत, चेहेऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवू शकणारी अशी किती माणसे असतात? अश्या ह्या व्यक्तींबद्दल आज लिहिते आहे खरे पण त्या आठवणी इतक्या जबरदस्त आहेत ,ते चेहेरे इतके खोलवर मनावर परिणाम करून गेले आहेत कि इतके सारे प्रभावी शब्द नसतील कदाचित माझ्या साठवणीत....जे मला ह्या माझ्या आठवणी मांडायला, तुमच्या समोर , मदत करतील! तरीही हा प्रयत्न करते आहे.
मी लहानच होते, असेन १० वर्षांची पण लोहाराच्या २ मुलांशी खेळायचे, एक मुलगी आणि एक मुलगा, माझ्याहून थोडे लहान पण त्यांच्या डोळ्यातले निरागस भाव अजूनही आठवतात.
लोहाराचा भाता सकाळपासून कामाला लागायचा. इतकी उष्णता असायची त्याच्या त्या झोपडीत, मदतीला एक गावातलाच मुलगा होता ,लोहार कामानिमित्त गावात गेला कि मग त्याची बायको कामाला लागायची...
शेतातले ते साधेसे झोपडे. मी लहान होते मला आश्चर्य वाटायचे कि इतक्या लहान जागेत कसे काय राहत असतील! काही थोडीशी भांडी घरात, कपडे पण अगदी मोजकेच....
तिच्या चेहरयावर गोंदलेले होते, कपाळावर आणि हनुवटीवर. कपाळाला मोठे कुंकू अभिमानाने मिरवायची ......गळ्यात डोरले ,हातात काचेच्या हिरव्या ४ बांगड्या ,कधी त्यांचा रंग लाल असायचा; इतकच काय ते नाविन्य, एका पायात एक तांब्याचा वाळा होता तिच्या ते आठवते... पायात चपला नसत आणि अंगावर एकदम साधे लुगडे. तिचं नटणे आठवते, ते म्हणजे नवीन , जत्रेच्या वेळेला घेतलेल्या बांगड्या नाहीतर एखादा गजरा...अबोलीचा ,,,,छान दिसायची... ह्या सगळ्यामुळे छान दिसायची, कि तिच्या त्या हास्यामुळे खुलायची कोण जाणे!!
लोहार स्वतः तर नेहमीच हसतमुख, साध्या वेशात ,गूढघ्यापर्यंत मळकट धोतर, वर्ण एकदम रापलेला, गळ्यात आणि दंडावर काळा दोरा आणि त्यात ताईत. मी सुटीच्या दिवशी त्याच्याकडे खेळायला गेले कि त्याला गम्मत वाटायची," मोठ्या घरची ताई " ,म्हणायचा मला, बाबा डॉक्टर होते त्यामुळे त्याला वाटायचे कि मी त्याच्याकडे येते, त्याच्या घरात त्याच्या मुलांशी खेळते, त्याला आश्चर्य वाटत असावे कदाचित! पण कधीच माझ्याशी वागण्यात काही बदल जाणवला नाही मला . त्यांच्या घरातलीच एक असल्यासारखा मला वागणूक मिळत असे.आपलेपणा जाणवत असे.
माझ्या घरातले सगळे, आई बाबा , आजी आजोबा सर्वांना आम्हाला त्याच्या त्या कष्टाळू परिवाराचे कौतुक होते....
त्याच्या मुलांशी खेळता खेळता बरेच काही जाणवले मला, त्यांना शाळेत पण महामुश्कीलीने पाठवत होता लोहार, हे कळले. त्यांच्याकडे २ जोडी कपडेच आहेत हे कळले.....
खेळ तर नाहीतच; पण घरात सणाला गोड करताना पण पंचाईत असते हे पण कळले. लाडू , जिलेबी हे नुसते पहिले आहे त्यांनी हलवायाच्या दुकानात हे कळले. कधी घरात गोड बनले तर 'तांदुळाची खीर'....हे आठवते ,कारण तिच्या प्रेमळ हाताने वाढली होती तिने मला ती आणि कोण आग्रहाने मला खाऊ घातली होती , अजूनही आठवतात तिचे ते प्रेमळ डोळे , ती माझे खूप लाड करायची, अगदी तिच्या मुली सारखेच.
त्यांना शाळेत जाताना रोज पाहायचे मी, लोहाराने ठरवले होते कि मी नाही शिकलो पण मुलांना शिकवीन, बाबांना एकदा सांगत असताना ऐकले होते मी.
'मग मनात एक दिवस अचानक काही आले ,अशीच गेले आणि २ पेन्सिली दिल्या दोघांना . काय आनंद झाला होता त्यांना !! ,अजून त्यांचे हसरे चेहरे आठवतात.
मग पुढे जाऊन वाटले त्यांची ती कापडी दप्तरे पाहून कि त्यांना वाटत नसेल का कि आपल्याकडे छान दप्तरे असावीत, म्हणून मग मी मुंबईला काकांकडे गेले असताना बाबांना विचारले बाबांनी तयारी दाखवली आणि त्यांना दोघांना दप्तरे दिली....अर्थात लोहाराला तसे आवडले नाही कारण तो पण स्वाभिमानी होता , त्याने मग काही कामे लोहाराची मदत जिथे लागते ती , करून दिली....ह्याला काय म्हणावे? मैत्रीचा हात पुढे करणे ? ,एकमेकांना मदत करणे ?
दिवस जात होते. पावसाळ्यात खूप पंचाईत होत असे त्या कुटुंबाची . शेतात पाणी यायचे आणि मग ते ३ महिने, काही काळासाठी, स्थलांतर करावे लागायचे त्यांना....
थोडक्यात पक्कं घर न्हवते ना ,त्यामुळे हे सर्व करावे लागत होते .
काही वर्षांनी आम्हीच शहरात आलो ,,,गाव मागे सुटला खरा पण आठवणी काही कमी झाल्या नाहीत ,उलट बरंच काही शिकवून गेल्या, आज पर्यंत शिकवत आल्या आहेत...
विपरीत परिस्थती असूनही , किती मोठे आणि कणखर मन असेल त्या लोहाराचे!, निर्व्यसनी असा हा आमचा शेजारी, काही खास गुण होते त्याच्यात, जे आज काल सापडत नाहीत, आणि जरी असले तरीही माणसाच्या,पांढरपेश्या समाजाच्या मोठेपणाच्या डौलात कुठेतरी हरवून जातात.....
प्रत्येकाला आज वाटते कि , माझ्या आयुष्यात आराम हा आलाच पाहिजे कारण मी रोज ८ तास मान मोडून ऑफिस मध्ये काम करतो वा करते, माझ्या ह्या अपेक्षा आहेत आयुष्याकडून आणि इतका काळ मी मला दिला आहे . ह्या काळात मला ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत, नाही मिळू शकल्या तर मी अजून कष्ट करेन . पैसा हा ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागतो ,म्हणजे मुख्य उद्देश पैसा मिळवणे, त्यापाठी मग दिवस रात्र कष्ट . त्यात काय काय हरवले आहे माझे? रात्री झोपताना मन शांत असते का? मनात कामाचे किती विचार असतात? सगळ्या अपेक्षांपाठी धावता धावता, माझेपण ,,असा माझा आनंद असा उरला आहे का? अपेक्षा मग घरात सर्वांकडून,आणि त्यांच्या माझ्याकडून......
कमीतकमी असतात का त्या अपेक्षा ? नाही....उलट जास्तीजास्त असतात... लहान कुटुंब असूनही ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जातो घरातला करता पुरुष आणि स्त्री सुद्धा. मुलांच्या लहानग्या मनावर पण, 'हे हवे आणि ते हवे', ह्या पासून ते 'मी मोठे झाल्यावर हे बनेन, आणि त्यासाठी मला हे केले पाहिजे' अशी सुरवात असते अपेक्षांची, स्वतःकडून अपेक्षा आणि मग दुसऱ्यानकडून ....
ह्या लोहाराच्या काय अपेक्षा असतील त्याच्या आयुष्याकडून? सांगणे कठीण, दोन वेळचे जेवण मिळत होते आणि त्यात तो आनंदी होता. अल्पसंतुष्ट होता का? नाही . तर आनंदी होता खरया अर्थाने....कारण त्याने जे सत्य आहे ते निखळपणे मान्य केले होते, त्याचे सत्य त्याची गरिबी ....ती शाप आहे असे त्याला कधी वाटले नाही आणि म्हणून तो आनंदात होता.
तो कष्ट करत होता ते पैसे मिळवण्यासाठी किती आणि कर्तव्यासाठी किती सांगणे कठीण पण जितके काही जमत होते तितकेच करत होता हे मला कळत होते.
गावाच्या जत्रेला वर्षातून १दा मुलांना आणि पत्नीला घेऊन जाताना त्याच्या आनंदाला पाहून खरच वाटले आज,, कि आपण आजकाल 'world tour ' च्या गोष्टी करतो; पण जाताना पैश्याचा विचार , परत आल्यावर झालेल्या खर्चाचा विचार असतो, मग खरया अर्थाने ती tour आपण उपभोगली का? अनुभवली का? तो आनंद आहे का कुठे जो मी पहिला होता त्या लोहाराकडे होता तो ? मोठ्या अपेक्षा न ठेवता आयुष्याकडून तो इतका सुखी होता, मग सगळेच का नाही होऊ शकत तसे, का नाही ? त्यात कोणताच कमीपणा नाही ना! आपण प्रयत्न करणे सोडून देणार आहोत? नाही कधीच नाही , पण रोजचा आपला दिवस जसा सुरु होतो तसाच आनंदात संपवावा , बाप्पा आपल्याला आणखीन एक पहाट अनुभवायला देतो, म्हणतो ,"घ्या ,तुमच्या साठी आणखीन एक दिवस घ्या , हा दिवस आनंदात घालवा , प्रश्नाना सामोरे जाताना ताठ मानेने जा आणि जर उत्तरे मिळाली नाहीत तर जिद्द सोडू नका, आनंद कायम ठेवा कारण एक एक दिवस खूप महत्वाचा आहे."
आनंद कशात आहे? मानण्यात आहे फक्त मानण्यात आहे हेच खरे!
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
सुंदर सुंदर अति सुंदर लेखन.. आनंद शोधायला प्रयत्न करावा लागतो आजकाल हे खरंच कळत नाही. पैशाच्या मागे लागून हल्ली सगळंच गमवत चाललो आहोत की काय असे वाटतंय गं... खरंच... आपण आपल्यावरून पण ही कल्पना करू शकतो. तुझ्या लेखाने २५ वर्षापुर्वी आम्ही ज्यास्तं आनंदात होतो का असे भासू लागलेय. कारण एकच परिस्थिति बेताची... असो...
उत्तर द्याहटवाखूप मजा आली लेख वाचून... अशाच छान लेखाच्या प्रतिक्षेत..
तुझीच संध्या
संध्या तुझ्या कडून आलेली टिप्पणी खरच खूप प्रेरित करते मला ! अशीच वाचत राहा आणि मी लिहित राहीन.....
उत्तर द्याहटवाMonica kharach khup chan lihates agadi sadya ni sopya bashet ani shabdachi mandani dekhil tewadhich sahaj ji manala sparshun jate asa vatate ki he tar aaply manach farach javal cha. mala tuze javal pas sarech likhan avadale pan hi kavita khup kahi shekaun jate.to lohar ni tyachi bayko khup changale udharan aahet aaplya sarvan sathi.
उत्तर द्याहटवाधन्यवाद रुपाली, तुझी टिप्पणी खरच आवडली.... हो आपण सर्वांसाठी लोहार आणि त्याचे कुटुंब चांगले उदाहरण आहेत हे नक्कीच!
उत्तर द्याहटवाMonica kharach khupch chan lihates
उत्तर द्याहटवातुझ्या टिप्पणी बद्दल धन्यवाद प्रवीण.
उत्तर द्याहटवाप्रवीण तुझे ह्या ब्लोगवर स्वागत आहे !:)
उत्तर द्याहटवा