माझी चित्र मैत्री




चित्र रंगवताना मनातले अनेक रंग उतरतात चित्रांमध्ये आणि बोलू लागतात माझ्याशी,तो संवाद इतका नवीन असतो दर वेळी कि प्रत्येक रंग काहीतरी वेगळे सांगत असतो,आणि चित्राच्या दिशेने धावत असतो जणू!लहानपणा पासून आई बाबांनी , आजोबा आजीनी नेहमीच प्रोत्साहन दिले मला. घरात आईकडून चित्रकला आम्हां बहिणीं मध्ये आली...आणि खरच हि देणगी नुसती आवड म्हणून नाही तर मनाला एक प्रकारचा आनंद समाधान मिळवून देते अस वाटते.
पहिली रंग पेटी आणि पहिली चित्रकलेची वही खरच लक्षात राहिली आहे. लहानपणी रंगीत खडू मिळत "कॅमलिन"चे किती सारे,असे जवळ होते, नंतर pencils आणि मग रंग, कुन्च्ल्याशी ओळख झाली.आजही लहानपणी काढलेली चित्र आई बाबांनी ठेवली आहेत, गम्मत वाटते त्या चित्रकलेच्या वह्या बघताना.....
लहानपणी आजोळी सर्वात पहिली ओळख ह्या चित्रकलेशी माझी, माझ्या आजोबांनी करून दिली..आईचे बाबा ..हे उत्तम डॉक्टर तर होतेच पण त्यांच्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढून स्वतःच्या कलागुणांना जोपासले होते त्यांनी.photography, painting, संगीत' हे त्यांचे काही छंद. घरात त्या काळात आजोबांना मार्गदर्शन करायला कानडे मास्तर येत. कानडे मास्तर हे थोडक्यात म्हणजे आजोबांचे drawing teacher होते. लेंगा सदरा आणि एक झोळी,पायात कोल्हापुरी चप्पल आणि हातात ऊन लागू नये म्हणून छत्री अश्या वेशात येणारे कानडे मास्तर आजही मला आठवतात ..मी तेव्हां असेन ७ वर्षांची. ते आले कि आम्हीं बहिणी त्यांच्या पाठी असू,कारण ते मग रंग आणि कुंचले,drawing board ,सगळ्याची जमवाजमव करत,बाहेर मोठ्या बाल्कनी मध्ये आजोबा आणि कानडे मास्तर ह्यांचा हा क्लास चालायचा.'oil painting' चे धडे देत असत कानडे मास्तर.तसं पाहायला गेले तर,ते आजोबांहून वयाने लहान...पण तरीही आजोबा त्यांना मान देत .मी सुद्धा पूर्ण वेळ त्या क्लास मध्ये फी न भरता शिकणारा मेम्बर होते .
खूप आवडायचं पाहायला,वेगवेगळे रंग कसे एकमेकांमध्ये मिसळतात ते कोणता रंग आधी द्यावा कोणता नंतर,कोणते रंग उठून दिसतात,आणि चित्राला उठाव आणण्यासाठी काय करावे इत्यादी अनेक गोष्टी ते शिकवत.ती माझी लहानपणची आठवण खूप महत्वाची ठरली,रंगांची ओळख तिकडे झाली होती न! नंतर ते रंग जणू शालेय जीवनाचा भाग बनले..हळू हळू आवड वाढत गेली तसे चित्रांना अर्थ आले,रंगांना बहार आली. आणि बक्षिसे मिळू लागली शाळेत....मग उत्साह आणखीन वाढला!
चित्रकलेचे शिक्षक लक्षात राहिलेले म्हणजे पहिली ते सातवी पर्यंत शिकवणारे 'शिंदे सर, त्यांची खूप मदत झाली मार्गदर्शन लाभले.शाळेत सातवीत असताना 'रंगभरण स्पर्धेत' भाग घेतलेला आठवतो..चित्र छान आले होते प्रिंटेड पेपर समोर देण्यात आला होता आणि त्यात रंग भरायचे.मुळात मला हि स्पर्धा आहे ह्याचा त्या वेळी विसर पडला आणि रंग भरत गेले..इतका छान वाटत होते का कोण जाणे! आवडत होते मनापासून रंग भरत होते.मध्ये मध्ये काही शिक्षक जवळून जाता येता थांबत आणि पाहत होते,मला कळेना कि नक्की काय चुकते आहे ज्यामुळे हे मंडळी थांबून पाहत आहेत..चुकत असावे काहीतरी असे वाटू लागले शेवटी ..पण मी माझे रंगकाम काही थांबवले नाही. काही दिवसांनी शाळेत गेले तर मोठ्या वर्गातली एक मैत्रीण धावत पळत आली माझ्याकडे आणि माझे अभिनंदन करू लागली,'रौप्य पदक' मला त्या स्पर्धेत मिळाले म्हणून सर्वांनी कौतुक केले,पण मला खर सांगायचे तर, ते चित्र रंगवताना जो आनंद मिळाला होता त्याचे वर्णन करणे कठीण! एक गोष्ट लक्षात आली कि आपल्या डोळ्यांना जे रंग इतके सुंदर दिसतात आणि त्या रंगांचे एकमेकांशी जे मैत्र आपण साधतो ते पहाणाऱ्यांना पण आवडते.
पुढे painting चे वेगवेगळे माध्यम,पेपर,ग्लास,वूड painting शिकले. आजही रंगांशी असलेली मैत्री सोडलेली नाही.कारण हि मैत्री खूप घनिष्ट आहे.
प्रत्येकाला एखादा तरी छंद असावा,जो रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून आपल्याला लांब घेऊन जाईल आणि एक समाधान,मनाला शांती,विरंगुळा मिळवून देईल.कित्येकांना आवाजाची दैवी देणगी असते,काही मंडळी ह्या देणगीचा उपयोग करतात,आवड आणि इतरांचे मनोरंजन..मित्र मंडळींमध्ये काही नावे आवर्जून घ्यावीशी वाटली, नाशिकच्या सौ. कन्याताई गुणे, नागपूरचे श्री सुबोध साठ्ये, मुंबईचे श्री.अभिजित राणे, सौ. प्राजक्ता सावरकर शिंदे (मुंबई) सर्वांचे खरच कौतुक वाटते.सर्वांना माझ्या शुभेच्छा!चित्रकलेच्या क्षेत्रात पुढे जाणारया माझ्या ह्या मैत्रिणी ,सौ भाग्यश्री देशमुख (मुंबई)आणि सौ.धनश्री आठवले (कॅनडा) ह्यांना , कवितेच्या शब्दवेड्या जगात यशाची वाटचाल करणाऱ्या अश्या मुंबईचे श्री गुरु ठाकूर, सौ. जयश्री ताई अंबासकर (कुवैत) आणि सौ. दीपिका ताई जोशी (कुवैत) ह्या सर्वांना मनापासून अनेक शुभेच्छा!! ह्या सर्वांच्या मैत्रीतून जे काही आज मिळवते आहे ते खरच अनमोल आहे...ह्या सर्वांच्या जवळ कला आहे आणि खरच ह्या कले इतकी मौल्यवान गोष्ट आणखीन दुसरी नाही असच म्हणावे लागेल!
इथे काही माझी चित्र ह्या post च्या सुरवातीला आपल्यासाठी लावत आहे बघा आवडतात का.....
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
प्रिय मोनिका...
उत्तर द्याहटवाअग्गं किती सुंदर..लेखणी भरभरून उतरू लागली आहे ह्यात मला किती आनंद मिळतोय सांगणे कठिण. तुझ्या चित्रकलेचे मर्म आत्ता उलगडले हं.. सहीच.. अशीच कला जोपासत रहा गं राणी... खूपच छान.तर मग आम्हाला पण शिकवा थोडे फार... आणि हे पण छान की हीच कला तुझ्या देवश्री मधे पण उतरली आहे.
तुझ्या आई बाबांनी ठेवलेली तुझी जुनी चित्रकला बघायला खरंच मजा येत असेल. माझे तर जुने काही नाहीये पण रुचिर शिशिर चे मी असेच जपून ठेवले आहे ते बघायला वाचायला मनभरून आनंद मिळतो हे खरे...
खूप खूप अभिनंदन...
तुझीच संध्या
संध्या तुझ्या प्रोत्साहनामुळे खरच बघ तो ब्लॉग कसा छान वाटू लागला आहे, खरच खूप आनंद होतो जेव्हां तू इतका छान लिहितेस मनापासून वाचतेस आणि पावती देतेस.... धन्यवाद!
उत्तर द्याहटवाatishay chhan aahe mala tujhe koutuk kiti karu an kiti ase hovun gele aahe ; saglyanche haatatun ase balpan vaalu sarkhe nistun gele pan tu tyala shabdaat badist karun kiti sundar rupade dile aahe ; he tula tya sarveshwara kadun milale aahe tyala thanks de an asech sundar sundar hya pudhe hi tujhya kadun lihun rangavun de
उत्तर द्याहटवाश्याम काका छान वाटले तुमचा अभिप्राय वाचून...मी प्रयत्न करते आहे लिहिणे आणि मनापासून लिहिणे ह्यात फरक असतो , अनेकांना लिखाणाचे अंग असते पण प्रयत्न करावा तितका थोडा आहे,,,, आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे..धन्यवाद!
उत्तर द्याहटवा