पोस्ट्स

कविता

इमेज
तू कविता वाचतोस तेंव्हा,ती,रंगते!  तिच्या शब्दाशब्दात अडकलेल्या भावना जागृत होतात.... तू कवितेला समजून घेतोस. लिहिताना कागदावर तिचे रूप;आणि तुझ्या शब्दात जेंव्हा तिला गुंफतोस तेंव्हाची ती,किती बदलते..  ऐकत रहावीशी वाटते!         ती थंडीची वाचतोस तेंव्हा,लपेटली जाते उबदार शालीसारखी भोवती.. पावसात काळा ढग बनून बरसत राहते,तुझ्या आवाजातील जादू,आणि कवितेचे शब्द,त्यांचे अर्थ..  हलके हलके वाटू लागते..जणू सगळे ताण एका क्षणात विरघळून जावेत तसे काहीसे!  तुझी कविता जेंव्हा उंबऱ्यावर रेंगाळते,तेंव्हा तिचे भांबावणे,भर दुपारी सावली शोधत हिंडते तेंव्हा, तिची होणारी तगमग...थंड वाऱ्याची झुळूक आणि तुझ्या कवितेच्या पानाचे मिटणे.. हिरवळ पसरलेली वाटते मनात! मग पुन्हा एक fresh day !! तुझ्या आणि तुझ्या कवितेचा ! -श्रिया Thank you Tumblr for beautiful picture.🙏 फोटो साभार आंतरजालावरून...

जर तरची गोष्ट

इमेज
बऱ्याच दिवसांनी ब्लॉग वर काही पोस्ट करते आहे. सध्या भारतात आहे.खूप वर्षांनी आले आणि खूप राहते आहे! ह्या भारत भेटी बद्दल जितके लिहावे कमीच आहे! आई बाबा बहिणी,सर्व नातेवाईक,आप्त सर्वांसोबत निवांत वेळ मिळाला,नेहमीसारखे धावपळीचे दिवस नाहीत त्यामुळे,भारतात नवीन अनुभव,भटकंती,अनेक उत्तम उपाहारगृहात घेतलेला पाहुणचार,नवीन ओळखी,काही सहली आणि ह्या सर्वाची खूप सारी छायाचित्रं साठवत जाते आहे. ही भारत भेट,माझ्यासाठी अनेक सुंदर अनुभव,आनंदाचे उत्साहाचे,उत्सवाचे वातावरण घेऊन आली.बाप्पाने दिलेली ही अमूल्य भेट आहे! महत्त्वाची जबाबदारीची कामे चालू आहेत.पण त्याच बरोबर क्षणभर विश्रांती मिळते,अशा उत्तम नाट्य कलाकृतीतून !     मध्ये एका शनिवारी ' जर तर ची गोष्ट ' २ अंकी मराठी नाटक पाहिले. खूप दिवस मी वाट पाहत होते की उमेश कामत,आणि प्रिया बापट ह्यांचे हे नाटक पुण्यात येते, आणि सगळे व्यवस्थित जुळून आले ते शनिवारी.  नाटकाचा विषय गंभीर असला तरी तो एका वेगळ्याच पद्धतीने सादर केला गेला आहे.२ अंकात हा विषय मांडणे तसे अवघड असूनही बऱ्यापैकी प्रेक्षकांपर्यंत त्यातला संदेश पोहोचला आहे.मला ह्या कलाकारांचे ने...

एक लोभस संध्याकाळ

इमेज
  संध्येचे वेगवेगळे रंग ,आणि आकाशी कोणी चित्रकाराने त्याची केलेली उधळण 👌 सूर्यास्ताच्या वेळी सूर्य बाप्पा,जाताना मागे त्याच्या अनेक छटा सोडून जातो.माझ्या घराच्या जवळ उंचावरून आकाश पाहताना हे लोभस रंग दृष्टीला सुखावतात.थंडीत वेगळे,उन्हाळ्यात आणि शिशिर ऋतूत वेगळे रंग..           काही छायाचित्र घेतली पण समाधान होत नाहीच! खरं तर डोळ्यांच्या कॅमेऱ्याने जे रंग दिसतात ते फोटोत तसेच्या तसे येणे अवघड!           किती तरी वेळ हे दृश्य पाहत होतो मी आणि माझी लेक,अश्यावेळी शब्द कुठेतरी हरवतात.मन ह्या रंगात रंगत जाते! Today's beautiful evening !!💕    -मोना (श्रिया)

क्षणभर विश्रांती

इमेज
 ह्या वर्षी उन्हाळा आलाय खरा,पण सगळेच स्तब्ध होते,रस्ते,शांत. थंडीचे महिने, बाहेर बराच वेळ घालवता येत नसल्याने,इकडे उन्हाळ्याची सगळे आतुरतेने वाट पाहत असतात. पण करोना साहेबानी यंदा सर्वाना घरी राहण्याची शिक्षा फर्मावलेली.आता कुठे जरा उसंत दिली;तेंव्हा हळू हळू थोडी वर्दळ दिसू लागली आहे.          इकडे उन्हाळा जेमतेम 4 महिने टिकतो,तसा सप्टेंबर शेवटी शेवटी गार होऊ लागतो...संध्याकाळचे गार वारे सुटते.त्या पूर्वी लोक भरपूर उन्हाळ्याचा आस्वाद घेऊन टाकतात...तसाच एक आमचा आजचा दिवस होता..घराजवळील पार्क मध्ये चटई घेऊन पोहोचलो,मी आणि माझी लेक..        निसर्गाच्या सानिध्यात आम्हा दोघींना भलतेच आवडते! झाडांचा,फुलांचा वास, फुलपाखरे, आणि गवतावर फिरणाऱ्या लहान मंडळींची लगबग बघायला आवडते.आज ज्या वृक्षाखाली आमच्या गप्पा रंगलेल्या त्याचे नाव weeping willow tree .ह्या वृक्षाखाली झोपून त्याचा प्रचंड विस्तार पाहायला खूप छान वाटत होते...त्याची पाने आणि फांद्या खालच्या दिशेने झुकलेल्या असतात, आणि वाऱ्यावर झुलताना पाहायला मस्तच वाटते.हा वृक्ष गूढ वाटतो. बुंधा बराच...

पहिला हिमवर्षाव ..

इमेज
त्याचे शुभ्र कण सगळीकडे पसरले.वाऱ्याचा झोत आकाशातून येताना घेऊन आला थंडावा! आज त्याच्या आगमनाचा पहिला दिवस ! आकाश झाकोळून आपण येण्याची आगामी सूचना पाठवून,सूर्यनारायणाचा सुटीचा दिवस म्हणायचा ! काळोख जायलाच तयार नव्हता,जेमतेम सकाळ झाल्यासारखी. हिवाळा !!! थंडीची जोरदार सुरवात ...किती पटकन थंडी येते इकडे ! उन्हाळा थोडा येऊन जातो,आणि मग आपले वर्चस्व सिद्ध करायला हिवाळा हजर होतो. रात्र लांबलचक,काळोख 5 वाजता संध्याकाळी,आणि दिवस तसा रजईत दडी मारून बसण्यासारखा! पण थंडी हा इकडचा मुख्य ऋतू,आणि त्याच्या येण्याने फक्त जॅकेट,थंडीचे कपडे,बूट आणि गाडीला स्नो टायर हा बदल अंगवळणी पडल्यागत ! लहान मुलांना स्नोचे विशेष कौतुक! मलाही हा आवडतो,कारण ह्याला ह्याचे एक स्वतंत्र महत्व आहे.रस्त्यात गाड्यांची सगळी मस्ती हा सहज उतरवतो..शिस्त आणि गाड्यांचे कमी झालेले वेग पाहून बेट्याची कमाल वाटते! निसरड्या रस्त्यांमुळे सगळे आपापली वाहने जपून चालवू लागतात,ऑटो ट्राफिक कंट्रोल दिसतो. थंडीचे वेगवेगळ्या रंगांचे स्वेटर,जॅकेट,हॅट्स,स्कार्फ...लहान गोंडयांच्या स्नो हॅट्स शाळा सुटली कि पाठीवर बॅग घेऊन स्नो मध्ये मनमुरा...

एक रूपक

एक सावली उन्हाच्या अगदी जवळपास विसावलेली.  उन्हाचा   रट्टा,  दुपारचा कडक फटका तिच्या अंगवळणी पडलेला,सवयीचा झालेला.  त्याची तगमग, म्हणजेच त्याच्या मनातली झळ. सावली गार, सतत थंडावा देणारी.तिचे वेगवेगळे आकार,तिच्या वेगळंवेगळ्या लांब्या. ऊन पण कमी जास्त होणारे,तो उन्हासारखा.  अचानक तापणार; पण ती मात्र सतत सावली सारखी मागे पुढे धावत त्याच्या.  ह्या दोघांमध्ये येणार म्हणजे फक्त पाऊस! तो आला कि असा गारवा  पसरतो कि ऊनं नाहींसे झाल्यागत आणि सावली हरवलेली.  हा पाऊस त्या दोघांना त्यांच्या कामांपासून,थोडा वेळ कुठेतरी लांब घेऊन जाऊन, कधी गडगडाट करत तर कधी चमचमाट करत राहतो.  त्या दोघांना पाऊस आवडतो,मनापासून ! मग स्वप्न फुलतात,गीते उमलतात,नवीन मनाला पालवी फुटते .  तो त्याची कटुता विसरू लागतो. त्याच्यातले ऊन निवू लागते.आनंदाचे तुषार आणि भावनांचा पाऊस ! तिची सावली त्याला काही काळ नकोशी होते. ती दुरावते,थोडी रुसते.स्वतःत गुरफटते.त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करणे खूप अवघड असते पण ती तरीही ते झेलते .  ऊन सावलीला दुरावते....

काही मनातले ..

'दोन घडीचा डाव ' असा विचार कधीच मनाला चाटून जात नाही ना ! असं सवयीचे झालंय सगळेच! श्वास घेणे, सहज संथ लयीत चाललेले असते.सगळे आपापल्या विश्वात,धुंदीत,कैफात! मन मस्त मगन, मन मस्त मगन! खरेतर कुठे काही घडले, की त्याची बातमी होते. सर्वांनी वाचण्यासाठी वर्तमानपत्र ती छापतात. चॅनल वाले लहान पडद्यावर ती उमटवतात ! लगेच सर्व मीडिया वाले त्याची दखल घेतात.फार फार तर काही दिवस महिने बातमी फिरते, गोल गोल व्हाट्स ऍप पण मागे नसते. लोक चुकचुकतात, काही प्रक्षोभक लेख जन्मतात.बातमी जुनी झाली कि  तिचा भूतकाळ तयार होतो. परिणाम किती जणांवर खराखुरा होऊन पडसाद,प्रतिसादात उमटतात? एकतरी जिवंत चळवळ,काही क्रियात्मक जन्माला येते? नुसती बातमी कानावर पडून हवेत विरून धुवा धुवा, मग उद्या पुन्हा वृत्तपत्रात सापडतो बातम्यांचा खेळ नवा !! -मोना (श्रिया)