Happy New Year 2026 ❤️
नवीन वर्ष आले,किती पटकन दिवस सरतात!
आपल्या दिनदर्शिकेत डोकावले तर,काही दिवस सणाचे,काही हक्काचे रविवार,काही महत्त्वाच्या घडामोडींचे,काही आनंद घेऊन येणारे,नव्या खरेदीचे,सहलीचे,नव्याने झालेल्या ओळखींचे,काही जुन्या आठवणींमध्ये हरवलेले,वाचनाचे,लेखनाचे,नवीन पदार्थ बनविण्याचे,खास हॉटेलात जाऊन आस्वाद घेण्याचे,नाट्यगृह,चित्रपटगृहात सापडलेले मनोरंजन,पाहुणे,जुन्या वाटेवर हरवलेले अन् नव्याने सापडलेले ऋणानुबंध ह्या सर्व दिवसांनी उजळून टाकलेले माझे तुमचे आपले 2025..
पण काही अगदी जवळीची माणसे गेल्याच्या दुःखद प्रसंगांनी देखील हळवे झालेले 2025.माझ्या आयुष्यात काही नाती मी जपली,त्यात जवळची माझी मीना काकी,ती दिवाळीत मला,आम्हा सर्वांना सोडून देवाघरी गेली.खूप वाईट वाटले,आजही तिचे अस्तित्व हवेसे होते,ती नाही हे मन मान्य करत नाही!तसेच वर्षाच्या शेवटी मला वडील भावाची माया ज्यांनी दिली, ते माझे मावस दीर ज्यांना आम्ही काका म्हणत असू.त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून काढता येणार नाही!2025 रुख रूख लावून गेले!
काही गोड बातम्या पण मिळाल्या.चिमुकल्या बाळांची ह्या जगात एन्ट्री हा एक अतिशय आनंदाचा प्रसंग असतो! गेल्या वर्षी दोन नवीन बालकाचा जन्म झाला..असे हे वर्ष जाताना संमिश्र भाव निर्माण करून गेले!
तुम्हा सर्व वाचकांना मी ह्या 2026 वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.हे वर्ष सर्वांना भरभराटीचे,समृद्धीचे जावो!आरोग्य सुख,सुयश घेऊन येवो ही बाप्पाकडे प्रार्थना करते!
जेव्हा काही सुचते,आणि मग कागदावर शब्द उमटू लागतात.मनातले जसेच्या तसे,शब्दात गुंफून मांडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
तुम्हा सर्व वाचकांचे,नियमित माझ्या ब्लॉगला भेट देऊन,आपल्या कमेंट्स देणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते.तुमच्या बोलक्या प्रतिक्रिया मला मार्गदर्शक ठरतात,आणि प्रोत्साहित करतात.असाच लोभ कायम राहूदे !
धन्यवाद!
- मोना (श्रिया)

वाss! खूपच छान मोना! "२०२५ हे वर्ष संमिश्र भाव निर्माण करून गेलं", असं तू लिहिलंयस; ते अगदी खरंय. खूप छान लिहिलं आहेस !अगदी मनातलं! तुझं लिखाण मला खूपच आवडतं👌👌😊 किती सहजगत्या तू मनातले विचार शब्दांकित करतेस !वाsss........ शीला भट कामत
उत्तर द्याहटवाशीला तुझ्या बोलक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! लेखन मला तुझ्याशी कनेक्ट करते,जोडते.तू वाचून तुला काय वाटले हे सांगतेस तेही खूप आवडते 😊🙏🏻
हटवाKhup surekh lihila ahe .
उत्तर द्याहटवानमस्कार माझे पोस्ट वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. आपली प्रतिक्रिया निनावी आहे,कृपया आपले नाव कळेल का ?
हटवा