भूमिका

काल रविवारी ३० तारखेला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे दुपारी एका आगळ्या वेगळ्या नाट्य प्रयोगाला गेले होते. हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित क्षितिज कुलकर्णी लिखित असून ह्यात प्रमुख भूमिकेत श्री सचिन खेडेकर आहेत.नाटकाचे नाव 'भूमिका'. विषय मांडायला सोपा नाही असा..पण लेखकाने लीलया,मांडला आहे.आणि ह्यातील कलाकारांनी साभिनय उत्तम पेलला आहे! ह्या नाटकातील विविध संवाद मनाला खोलवर जाणवतात.आपल्या शेजारपाजारी,ओळखीत,नात्यात आलेले अनुभव,प्रेक्षकांना कोणत्या ना कोणत्या भूमिकेत न्हेऊन उभकरतात.लेखकाला जे म्हणायचे होते ते,प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते. काही प्रसंग,संवाद थेट मनाला भिडतात! प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका चोख बजावली आहे.नेपथ्य आणि रंगभूषा छानच. नाटक कुठेही कंटाळवाणे वाटत नाही,उलट विचारप्रवर्तक आहे.नक्कीच पहाण्यासारखे ! ह्यातील समिधा गुरु,अतुल महाजन,सुयश झुंझुरके,जयश्री जगताप,आणि जाई खांडेकर ह्या कलाकारांनी सुद्धा उत्तम अभिनय केला आहे. येथे नाटकाचा विषय मी मुद्दाम देत नाहीये,कारण तो तसा परिचयाचा असला तरी नाटकातून लेखकाने सर्व प्रेक्षकांशी ह्या विषयावर जो संवाद साधला आहे,तो प्रत्येकाने नाट्यगृहात जाऊन अनुभवायचा आहे! हे नाटक जरूर पाहा. नाटक संपल्यावर काही छायाचित्र घेतली.
कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे, ह्यात कोण आनंद असतो! सचिन खेडेकर ह्यांनी प्रमुख भूमिकेत कमाल केली आहे! त्यांना हे समोरासमोर सांगताना मला खूप आनंद वाटला! ह्या सर्व कलाकारांचे खरच खूप कौतुक वाटले आणि ह्यांना पुढील प्रयोगांसाठी शुभेच्छा दिल्या. नाट्यरसिक प्रेक्षक टाळ्यांनी संवादांना दाद देत होते.मला नाटक बघणे जास्त भावते,हे ह्याच साठी,अभिनयाला खरी दाद मिळत असते. 
भारतात असताना,पाहिलेल्या ह्या नाट्य प्रयोगांच्या आठवणी मी छायाचित्रात गुंफून माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.अनेक सुंदर स्मृतींना आठवणीना माझ्यासोबत कायम जपून ठेवेन! 
- मोना

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

एक लोभस संध्याकाळ

पहिला हिमवर्षाव ..