पोस्ट्स

'केवडा'

इमेज
खरेतर चित्रपट दोन तासात मनोरंजन करतात, तरी बऱ्याचदा कमी पडतात . नेहमीच दोन तासात दिग्दर्शकाने आपल्यापर्यंत पोहोचवायच कथानक कधी कधी अपूर्ण वाटते. काही गाणी आवडतात म्हणून चित्रपट चालतो,कधी अभिनय आणि कधी कथा..सगळे एका ठिकाणी नेहमी सापडेल च असे सांगता येत नाही. तरी पूर्ण चित्रपटाचा वेळ, आणि इतक्या साऱ्या वेळात नक्कीच अपेक्षा वाढलेल्या असतात, मोठ्या पडद्यावर काही चमत्कार सापडेल,असे वाटत असते. लहान पडद्यावर, पाहून खूप आवडलेली लहानशी मराठी टेलेफिल्म, शॉर्ट फिल्म.. ह्यात अवघ्या 25 मिनिटात पाहणाऱ्यांना नक्की आवडेल अशी वाटली म्हणून इकडे देते आहे. मनात जे काही येते ही पाहून ते प्रत्येकाने आपापले ठरवायचंय! मला केवड्याचा सुगंध आजीला नक्कीच येत असेल त्या कुपीतून असे वाटले!तिच्या आयुष्यातल्या स्मृतींचा एकत्रित असा! हल्ली अश्या शॉर्ट फिल्म शोधत असते..दिग्दर्शक खूप कमाल करतात,आणि एव्हढ्याश्या वेळात जो मेसेज पाहणाऱ्यांच्या मनात पोहोचवायचा तो, उत्तम अभिनय, मोजके संवाद आणि कथानक ह्यातून पोहोचलेला असतो ! ' केवडा' नक्की बघा आणि काय वाटले ते नक्की सांगा. ...

चिन्मयचा 'किल्ला'

इमेज
                   त्याच्या लहानग्या विश्वात एक खूप मोठे वादळ आलेले असते.त्याचे बाबा जातात.आईची बदलीची नोकरी.पुणे सोडून,पुण्यातील मामा,मामेभाऊ खूप जवळचा,सोडून कोकणातील समुद्राकाठी वसलेल्या एका गावात तो आलेला असतो.जागा नवीन,कोकणचा खारा वारा,कौलारू लहानगे घर,घराच्या आजूबाजूला नारळीची झाडे,वाडीतले ओहोळ आणि कोकणी पोरे काही उनाड मस्तीखोर.शब्दातली गम्मत त्यातल्या एकाच्या तोंडी 'यक्कु'शब्द घर करून बसलेला.  त्याला वेगळे  वाटते हे सगळे पाहून……….  ​         आपण इकडे का आलो आहोत अशी विचारणा आईकडे होते.त्यात मुसळधार कोसळणारा पाऊस.चिंब भिजवणारा.ढगांचा गडगडाट आणि खवळलेला सागर,किनाऱ्यावर आदळणाऱ्या उसळलेल्या लाटा.आभाळ पावसाळी ढगांनी माजलेले आणि काळोख दाटलेलं आसमंत.दूरपर्यंत राखाडी रंगाचे वाटणारे क्षितीज,​त्याच्या मनाची घालमेल.पावसामुळे जाणारी वीज आणि कंदिलाच्या प्रकाशात मावळती,पावसाळलेली संध्याकाळ. नवीन शाळा नवीन जग बदललेले ओलेचिंब,एकटे भासणारे....

दीपोत्सव...

इमेज
                                                           दीपोत्सव! आपली सर्वांची अशी दिवाळी !  घराघरात उत्साहाचे सणासुदीचे वातावरण,गोडाधोडाचा जिन्नस,हसरे समाधानी चेहेरे,नवे कपडे,घराला नवा रंग,दारात रांगोळीचा थाट, सर्वत्र उदबत्यांचा घमघमाट. पाहुण्यांची वर्दळ आणि आपुलकीची लाट,सगळीकडे उसळणारे हास्य.  पणत्यांची भिंतीवर सुंदर रांग,हलक्या तेवणाऱ्या ज्योती,त्या पेटत्या ठेवणाऱ्या इकडे तिकडे धावत आपापले सुंदर कपडे सावरत फिरणाऱ्या ललना. फटाक्यांचे दुरून येणारे आवाज, हवेत भरून राहिलेले,किती तरी वेळ दिवाळीची जणू साद घालणारे.  उंच इमारतींवर केलेली रोषणाई,प्रत्येक बाल्कनी आपापली दिवाळीची गोष्ट रंगवून सांगते आहे जणू! शहरेच्या शहरे अश्या लक्ष दिव्यांनी झगमगत,मिठाईची दुकाने खास सजवलेली.  रस्ते गजबजलेले,नवे पाहुणे आलेले. दिवाळीच्या रूपाने सगळ्या वेदना,कष्ट विसरून लहान थोर,गरीब श्रीमंत सगळे एकाच आनंदात न्हाहून न...

गुलमोहर

इमेज
बाल्कनीत बसून,निवांत कॉफीचा घोट घेत,समोरच्या गुलमोहराकडे पाहत तिचा वेळ जात होता.आज रस्ता,तिच्याच सारखा निवांत होता.गुलमोहराचा बहर ह्या वर्षी पण नेहमीसारखाच! गच्च सोनेरी तांबूस बहरलेला तो,तिच्याकडे पाहत होता जणू! त्यांची ओळख ४ वर्षांची,पण तरीही दर वर्षी,तो तिला तितकाच बहारदार दिसतो.आधीच्या जागेत असाच गुलमोहर होता पण मागील दारी,तिला आठवले. आज रस्त्यात ठरलेली मंडळी walk घेताना दिसत होती.कंटक आजी आजोबा नेहमीसारखेच बाकावर बसून गप्पा मारत.कोपऱ्यावरची टपरी आज मात्र बंद दिसत होती.शाळेची वेळ टळून गेल्याने पोरांची गर्दी नव्हती पण काही महाविद्यालयातील मंडळी आपली उगाचच इकडे तिकडे भरकटलेली. कुकरची शिटी झाली,ती पण ठरलेल्या वेळीच होते.सगळे काही घड्याळावर धावते,आणि तिलाही खेचते सोबत.आज तिने कधी नाही ती गर्द गुलाबी साडी नेसलेली.तो सकाळी ऑफिसला जाताना पाहून गेला होता.तिचे नटणे त्याला आवडायचे तसे,पण काहीसे सवयीचे.तिला मात्र रोज काही नवे घडावे अशी उर्मी. तसे तिच्या आयुष्यात घर संसार,काही जिवलग मैत्रिणी,आणि नातेवाईक.तिची चित्रकला कुठेतरी अडगळीत गेल्यासारखी.शाळेत स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळालेली,नुसती...

'TIME प्लीज'....

इमेज
            "Time please"……"अहं मी लेखाच्या सुरवातीलाच विश्रांती घेत नाहीये काही! लेख लिहून नक्कीच पूर्ण करणार आहे." खरेतर एखादी कथा आणि चित्रपटात,ती कथा जेंव्हा जिवंत होऊन समोर येते तेव्हाचे तिचे दृश्य स्वरूप,त्यातील  व्यक्तिरेखा,संवाद,प्रसंगांची मांडणी,संगीत,सगळे सगळे किती किती महत्वाचे असते न तो चित्रपट आवडायला. आजकालच्या धावत्या जगात,रोजच्या दैनंदिन आयुष्यातून विरंगुळा म्हणून काहीतरी वेगळे पाहण्यासाठी, चित्रपट गृहात प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी नाही.काहीतरी हलके फुलके,स्ट्रेस विसरायला लावणारे,साधीच कथा, उगाच कंटाळवाणी न वाटणारी,आनंद देणारी आणि काहीतरी संदेश देणारी असेल,तर मग काय विचारता!      अमृता आणि ऋषिकेश एकमेकांना भेटतात.ऋषिकेश एकदाचा तिशीला येउन लग्नाला तयार होतो,आणि घरातल्या मावशीला कोण आनंद होतो ! नवीन संसार,नवे घर,एकमेकांना समजून घेण्याचे दिवस.'Arranged marriage'.अमृताचा स्वभाव मोकळा ढाकळा, धमाल गमत्या,आयुष्याला येईल तसे घेणारी अमृता.तर ऋषी त्याउलट,आईवडिलांशिवाय मोठा झालेला ऋषी,नात्यांना ज...

'वाढदिवस'

इमेज
        एक दिवस,एका आई बाबांच्या घरी एक लहानगी येते,आणि मग त्यांच्या आयुष्याला खरा अर्थ येऊ लागतो.हा दिवस,त्यांच्या लेकीचा जन्मदिन त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि अमुल्य! मग त्या लहानगीचे कोडकौतुक आणि तिच्या बालमनावर संस्कार करत करत तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देत,हे आई बाबा आपले आयुष्य त्या बाळाच्या आयुष्याभोवती गुंफत जातात.  ती हळू हळू मोठी होते आणि मग सगळ्या भोवतालच्या जगाची आणि तिची ओळख होते. तिच्या इवलुश्या जगाला आईबाबा अनेक नवे शब्द देतात.शब्दांना अर्थ येतो आणि तिच्या धावपळीला सगळे 'खेळ' म्हणू लागतात.         बोबड गीते,रंगीत चित्रांची पुस्तके,गोष्टींची पुस्तके,भातुकलीचे खेळ,चिऊ,काऊ,कुतू आणि माऊ तिच्या लहानग्या विश्वाचे नेहमीचे सोबती बनतात.आजीची माया, आजोबांची शिस्त आणि लहानगे सवंगडी तिला साथ देऊ लागतात. आई बाबांना त्यांचे पिल्लू नेहमी 'गुड गर्ल' असावे असे वाटते. मग येते शाळा.अभ्यासाचे धडे आणि दप्तर पुस्तक पाढे !लहानगी आता हळूच शाळेच्या जगात पाऊल टाकते.भांबावलेले तिचे डोळे आणि इवलुशे हात आईच्या हाताला घट्ट आवळून धरणा...

गंधस्मृती

इमेज
     ह्या घरात रहायला   आल्यापासून उंच इमारतीतून दिसणारे जग, एकदम जमिनीच्या पातळीवर आल्यासारखे भासू  लागले आहे . दार उघडून पटकन बाहेर उडी मारली कि घरासमोरचा लहानगा रस्ता, दुतर्फा उंच झाडे असलेला . सदाहरित असे हे वृक्ष आणि सतत सावली आणि थंडावा जपून ठेवणारे . आता निसर्ग ‘ एका दारापलिकडे’   असेच काहीसे वाटू लागले आणि त्यात वसंताने तर सगळे काही बहरवून टाकले आहे ह्या वर्षी. बघावे तिथे   रंगबिरंगी फुले आणि फुलपाखरे .        अशीच कोपऱ्यावर नेहमीचा   फेरफटका मारायला बाहेर पडलेले . माझे घर डोंगरावर असल्याने चढ उताराच्या रस्त्यांचे साम्राज्य सगळीकडे . नवा रस्ता दिसला आणि त्यावर पाऊल टाकले . बंगलीवजा घरांचे वेगवेगळ्या रंगाच्या छपरांचे , दरवाज्यांचे , सुंदर बागीच्यांचे निरीक्षण चालले असताना अचानक एक अतिशय मंद सुगंध आला . कुठून येत आहे ते कळेना . मोहक आणि स्वतःकडे खेचून घेणारा असा हा दरवळ मला बरीच वर्ष मागे घेऊन गेला . गंधांचे एक आ...