"सुट्टी"
"सुट्टी"शब्दाची जादूच अशी आहे कि सगळी मंडळी ती पडली कि एकदम खुश!सुट्टीचा आनंद काही वेगळाच.सक्तीची सुट्टी वेगळी पण घेतलेली सुट्टी,मग ती शाळेला सुट्टी असो,ऑफिसला किंवा घरकामाला, ह्या शब्दात एक मौज आहे.लहानपणी शाळेत जाणे,शाळेतला अभ्यास,शाळेतला खेळ आणि इतर शालेय उपक्रम,स्पर्धा ह्या व्यतिरिक्त आम्हां मुलांचे एक वेगळे विश्व नक्कीच होते.ह्या विश्वात जो वेळ मिळायचा तो नेहमीच कमी वाटायचा,"अजून थोडा वेळ आलेच ग आई","थोडे वाचते अजून","अजून खेळूदे न",हि अशी वाक्य आठवतात. शाळा संपून लागलेली सुट्टी 'मे महिन्याची',दुसरी दिवाळी आणि मग गणपतीची सुट्टी ह्या सुट्टीतले कार्यक्रम सणासुदिशी निगडीत असत.घरात पाहुणे मंडळी एक वेगळेच उत्साहाचे सणाचे वातावरण.आम्हीं मुले ह्या वातावरणाचा एक भाग बनून जात असू.मग घरात मोठ्यांना कामात मदत करताना पण सुट्टी असल्याने एक आनंद मिळायचा.गणपतीत मोदक बनवायला आणि आपण बनवलेले मोदक खायला एक वेगळीच गम्मत वाटायची गणपतीची आरास,आरत्या,प्रसादाचे जेवण,असा हा मिळून साजरा केलेला गणेशोत्सव,काकांकडे सगळे जमत असू सुट...