" नेमेची येतो बघ ' पाववाला ' ! "
"नेमेची येतो बघ 'पाववाला'!" ह्या वाक्यातला बदल, तुमच्या लक्षात आलाच असेल! पण हे अगदी खरे आहे हं! एक वेळ 'पावसाळा' मागे पुढे सुरु होईल पण 'पाववाला' मात्र अगदी नियमित येणारी व्यक्ती आहे. शहरातून ठराविक भागात बेकरीतले काही पदार्थ सायकलवरून विकणारा हा 'पाववाला' आणि त्याची ती ठराविक हाळी ऐकली कि सवयीने सकाळी सकाळी लोक पैसे तयार ठेवतात. मऊ आणि कडक पाव, खारी आणि बटर शिवाय आणखीनही बरेच गोड पदार्थ देखील हे आणून देऊ शकतात. नियमितपणा चुकलेला नाही ह्याला. पावसाळ्यात मुसळधार पावसात देखील हजेरी लावणारच.सायकल कोपऱ्यावर लावून अगदी गुढघाभर साठलेल्या पाण्यातून चालत येणारा पाववाला पण पहिला आहे मी.ठरलेली घरे, ठरलेले पैसे ह्यासाठी इतकी धडपड! कधी एक शब्द जास्त बोललेला आठ...