"मुखवटे आणि चेहेरे"
"मुखवटे आणि चेहेरे " ह्या नावाची एक मालिका मराठी दूरदर्शन वर असायची . त्या मालिकेचे नाव विशेष वाटले होते , ते आज आठवले आणि मग विचार येत गेले ते लिहित गेले , आणि हे post तयार झाले . आपल्या आजूबाजूला अनेक चेहेरे फिरताना दिसतात , काही ओळखीचे असतात काही अनोळखी दिसतात , ह्या चेहेऱ्यांना नावे आहेत आणि नावे आणि जोडीला आडनावे ही ह्या चेहेऱ्यांची ओळख असते . ह्यातले किती चेहेरे खरेखुरे वागतात आणि किती मुखवटे पांघरून असतात हे सांगणे कठीण ! आज कालच्या जगात खऱ्याची किंमत किती केली जाते , खरया भावनांना किती समजून घेतले जाते , आणि हे चेहेरे असे का मुखवटे घालून फिरत असावेत हे सगळे प्रश्न समोर येतात . खरे मुखवटे नसतात तर स्वभावाला एका मुखवट्याचे स्वरूप येते , वागणे बदलते , खोटे हसू , खोटे समाधान दाखवले जाते , अश्यांची नाती सुद्धा मग एक बनावी अंगरखा पांघरून येतात . खरेतर ; " नावात काय आहे !", म्हणतात .. एखाद्याचे नाव आणि ती व्यक्ती ह्यात ...