पोस्ट्स

चुरमुरा

इमेज
        आज  चुरमुर्‍यांचा  चिवडा बनवताना परत एकदा मला  एक परकरातली चिमुरडी दिसू लागली.तिच्या इवल्याश्या चिमटीत एक एक चुरमुरा पकडून वाटीत टाकून,मग परत सगळी वाटी उलटी  पाडून  सांडलेले चुरमुरे...एक एक चिमटीत धरून उचलून खाणारी.दोन लहान शेंड्या बांधलेली,आठवू लागली. छानसा परकर पोलका  तिचा, मळलेला साफ कारण,दिवसभर जमिनीवर खेळ,आणि स्वयंपाक,तो पण भातुकलीची बोळखी घेऊन  आणि प्रत्येक लहानग्या वाटणाऱ्या पातेल्यात,जे तिचे 'मोठे भांडे'..तिच्या शब्दात " मोत्थे पातेले" सगळ्यात काही न काही बनत असायचे.सतत शिजत असायचे.         चुरमुर्‍यांचा  भात,इवलूसे  पाणी घालून इतका छान मऊ शिजायचा तर  कधी एकदम गुरगुट ला होऊन  पानात यायचा.'वनन डाळीचे' अगदी गरम..गरम हं! .. हळुवार,भुरके न  मारता,आवाज न करता प्यावे लागायचे.डाळ अलगद जर वेचू लागले कोणी,तर दटावणी यायची "दाल खायची अश्ते..वेचायची नाही." आईने दिलेल्या पीठाचे चिकट पोळे,लहानग्या पोळपाटापेक्षा हातावर,बोटांवर आणि परकरावरच जास्त चिटकून बसत,पण कधी म्हणून कधी चिडचि...

'जत्रा'

    बरेच काही हरवल्याची खंत मनात घेऊन आणि नवीन काही करण्याची जिद्द मनात ठेवून , नव्या वर्षाचे स्वागत करत पुढे जाताना , जमा खर्चाचा आढावा डोळ्यासमोर आला . प्रत्येक वर्ष अनेक क्षणांचे गुपित घेऊन दारावर येते . वर्षातील बारा महिन्यातला शेवटचा महिना लागला कि काय पटकन वर्ष सरले ह्याची जाणीव होऊ लागते . काय केले , काय नाही ह्याची उलाघाल सुरु होते . पटापट वर्षाच्या शेवटी उरकायची महत्वाची कामांची जमवाजमव करून हे वर्ष संपते आहे असे स्वतःला बजावत हळूच राहिलेल्या कामांची बांधाबांध करायची .         आपले घर , नातेवाईक , शेजारी पाजारी , मित्रमंडळ , कामाच्या ठिकाणी जमवलेली माणसे   हि आपली चाकोरी . ह्याबाहेरचे जग म्हणजे अनोळखी माणसांनी भरलेली एक जागा . एका माझ्या सखीचे एक वाक्य आठवले , ती म्हणालेली ,' प्रत्येकाची एक विहीर असते , आपली अशी सुखदुःखाची', होय तशीच आपली विहीर आणि भोवतालचे जग . ह्या जगातल्या कडू गोड घडामोडी . ह्यांचा वर्षाचा अहवाल डोळ...

स्मृतींचा हिंदोळा

इमेज
दिवेलागणीची वेळ. एका शांत संध्याकाळची उतरती उन्हे. संध्याप्रकाशाचे कवडसे सांभाळत झाडाची पाने एक एक कवडसा अलगद हलवून लाकडी गजाआड सांडत राहिलेली. लहानपणी आजी बसायची त्या व्हरांड्यात लाकडी गज समोर बाजूला होते आणि आतल्या बाजूला दोन आरामखुर्च्या - त्यातली एक लहान, एक मोठी - समोरासमोर गजांना लागून ठेवलेल्या असत. उरलेल्या जागेत आणखी दोन खुर्च्या असत. त्या जरा भक्कम पण लाकडीच होत्या. हिरव्या रंगाचे जाड कापड आणि आत स्प्रिंग आणि भुसा भरलेला अशा. ह्या दोन खुर्च्यांवर बसले की त्या स्प्रिंगमुळे वाजायच्या आणि आमचा आपला एक खेळ व्हायचा. एका खुर्चीवर आजीची मनीमाऊ, तिचे नाव पेशवीण, अगदी बिनधोक बसलेली असायची. तिला एक हक्काची मऊ उशी आजीने बसायला दिली होती. अगदी शांत निद्रेत गहन विचार करत असल्यागत दिसायच्या पेशवीण बाई! आज त्या व्हरांड्यात उभे राहून समोर पाहताना सगळे आठवत आहे. दुपारी आरामखुर्चीत बसून आजीचे स्त्री आणि किर्लोस्कर ह्या मासिकांचे वाचन चालायचे. तिच्या वाचनात शक्यतो खंड पडायचा नाही. बाहेर रस्त्यावर काही ठराविक आवाज येत. बैलगाडीच्या चाकांचा, रस्त्यावरून जाण्याऱ्या गाईंच्या हंबरण्याचा, लां...

'मन्या द वंडर बॉय'

इमेज
               'मन्या द वंडर बॉय',नावात सगळे आले आहे का?  पहायलाच  हवं...म्हणून चित्रपट पाहू लागले आणि सर्व वयोगटातील व्यक्तींनी पहावा असा हा  मराठी  चित्रपट,शेवटपर्यंत मला  माझ्या  जागेवरून उठू देईना! एका गावात लहानगा मन्या (रीशीराज पवार ), त्याचे  आई वडील आणि बहिणीसोबत, रहात   असतो. मन्या आठवीत,शाळेत जाण्यास उत्सुक पण घरात बिछान्याला खिळलेले वडील त्यामुळे घरातली कामे देखील हिरहिरीने करत असतो.घरात गाई आणि दुधदुभते.बहिण आणि तो आईला मदत करून मग शाळेत जात असतात. दुग्धालयात  दुध पोहोचवून शाळेत जाईस्तोवर नेहमी होणारा उशीर,आणि त्यामुळे शाळेत होणारे हसे,अपमान पचवणारा बोलक्या डोळ्यांचा मन्या.मन्याचा मित्र 'ओम्या'नेहमी मन्याला सांभाळून घेणारा,वेळी अबोला धरणारा पण मदत करणारा,आणि 'जाई' जिच्या आयुष्यात खूप लहान वयात आई वडिलांचे छत्र हिरावले जाते आणि काकांच्या घरी आधाराला राहिलेली अशी हि मन्याची मैत्रीण.मन्याला शाळेत उशीर होऊ नये म्हणून बाबा,आणि बहिण मिळून त्याच्यासाठी एक पाठीवर लावायची पिशवी शिवतात,हात रिकामे ...