कविता
तू कविता वाचतोस तेंव्हा,ती,रंगते! तिच्या शब्दाशब्दात अडकलेल्या भावना जागृत होतात.... तू कवितेला समजून घेतोस. लिहिताना कागदावर तिचे रूप;आणि तुझ्या शब्दात जेंव्हा तिला गुंफतोस तेंव्हाची ती,किती बदलते.. ऐकत रहावीशी वाटते! ती थंडीची वाचतोस तेंव्हा,लपेटली जाते उबदार शालीसारखी भोवती.. पावसात काळा ढग बनून बरसत राहते,तुझ्या आवाजातील जादू,आणि कवितेचे शब्द,त्यांचे अर्थ.. हलके हलके वाटू लागते..जणू सगळे ताण एका क्षणात विरघळून जावेत तसे काहीसे! तुझी कविता जेंव्हा उंबऱ्यावर रेंगाळते,तेंव्हा तिचे भांबावणे,भर दुपारी सावली शोधत हिंडते तेंव्हा, तिची होणारी तगमग...थंड वाऱ्याची झुळूक आणि तुझ्या कवितेच्या पानाचे मिटणे.. हिरवळ पसरलेली वाटते मनात! मग पुन्हा एक fresh day !! तुझ्या आणि तुझ्या कवितेचा ! -श्रिया Thank you Tumblr for beautiful picture.🙏 फोटो साभार आंतरजालावरून...