पाऊस सख्या रे!
डोंगर माथ्यावर जसा,रेंगाळतो पाऊस तसा तुझा माझा होऊन, उरतो पाऊस आपल्या हास्यातून उधाणतो पाऊस अन अश्रूतून गहिवरतो पाऊस.... रे !आपल्या पावसाला उनाडूदे थोडे. त्याला ढगातच अडकू दे थोडे, त्याचे येणे अचानक होऊदे अन जाणे पण सावरूया थोडे.... माझ्यातला पाऊस,तुझ्याहून वेगळा हलकाफुलका कवितेतला आगळा तुझ्या माझ्यातल्या एकरूपतेतला हरखून जाणारा लाजरा पाऊस... तुझ्यातला पाऊस धीट,जशी चमकणारी वीज तुझ्यातला पाऊस गडगडत,अलगद विसावणारा अल्लड,बालिश पण संततधार थोडा हट्टी,पण चिंब आनंद देणारा .... 'तुझे असणे',असा फक्त माझा पाऊस... 'निरंतर बरसणे' नको विसरून जाऊस वाटले कधी जावे निघून तर,एकदाच हो, माझ्या 'आठवणीत राहील इतके कोसळणारा पाऊस'.... -श्रिया (मोनिका रेगे ) --