! वर्ष २०११ चे स्वागत असो !
परत एकदा येणारे नवे वर्ष हसून स्वागत करणारे,हात पसरून जवळ बोलावणारे आणि जुन्या वर्षाचा सर्वांना विसर पडलेला,तो क्षण,तो दिवस,जवळ,जवळ येणारा,त्या दिवसाची संध्याकाळ हवी हवीशी वाटणारी ३१ डिसेंबरची संध्याकाळ,नाताळचे दिवे आणि मग नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत, दर वर्षी ठरलेला हा सोहळा! किती सारे जुन्या वर्षाने आपल्याला दिले.काय आपल्याकडून घेतले?काही अवघड प्रसंग,अचानक झालेले लाभ,आनंदाचे अनेक क्षण,तसेच काहींना भेटलेले आघाताचे दुर्दैवी क्षण,काही तरी हरवल्याची जाण, कुठेतरी काही नसल्याची जाणवत राहणारी खोच, धनलाभ, वास्तु सुख,नवीन नोकरी, एक न दोन अनेक आनंदाच्या बातम्या! हे मागील वर्ष जाताना पूर्णपणे कधीच जात नसते, आपल्याला देऊन जाते फक्त येणारे नवीन वर्ष! पुन्हा एकदा चालून आलेली नवी संधी,परत एकदा एक नवी सुरवात,नवे संकल्प, जुन्या अनुभवांनी दिल...