आठवणीत राहिलेली पहाट!













एक अशीच आठवणीत राहिलेली पहाट,नुकताच कोंबडा आरवलेला , बंबाच्या चुड्त्याच्चा धूर साठलेला आसमंतात,अंगण झाडणारी पलीकडच्या घरातली आजीबाई, आणि दूरवरच्या शिवालायातले आरतीचे स्वर.. पहाटेच्या वेळेचे एक वेगळेच संवेदन असते..

रस्त्यावरून गाड्यांची ,,लोकांची जोरदार वर्दळ सुरु झाल्यामुळे रस्ता पण आळसावलेला वाटतो.दवाचे बिंदू समोरच्या प्राजक्ताच्या सड्यावर चमकत असतात,अळवाच्या पानांवर तर स्पष्ट दिसतात.उगवतीचा सुर्यनारायण डोळ्यात त्याचे रंग अलगदपणे उतरवतो. पक्ष्यांच्या किलबिलाटाने जवळपासची झाडे अजूनच हिरवी भासू लागतात.... सगळे कसे जिवंत होऊ लागते!



गरम चहाचा घोट घेताना घरासमोरच्या रस्त्यावरून नेहमीचे गाडीवाले,भाजीवाले आणि नंतर शाळकरी मुलांच्या जाण्यायेण्याकडे पहात, एक सकाळ परत सुरु होते......निवांतता हळू हळू गडबडीचे स्वरूप घेते.आता ती सकाळच्या स्वयंपाकाची गडबड, सर्वांना सर्व काही मिळाले योग्य वेळी ,ते पाहावे लागते. त्यातही एक नेहमीचा सूर असतो ,सगळी नेहमीची ठरलेली कामे.घड्याळाच्या काट्यावर धावणारे जग किती पटकन ती पहाट विसरते,आणि कामाला लागते नाहीका!



आमच्या लहानपणी आई,आजी एकत्र कुटुंब पद्धतीत असल्याने खूप वेगळे वातावरण होते.अर्थात गावात होतो त्यामुळे धावपळ कमीच जरा.थोड्या बहुत प्रमाणात सर्वांच्याच घरात पहाट पटकन सरत असावी.



तरी हे सांगते आहे ते थोडेसे गावाकडचे वातावरण...शहरात तर पाहायला नको..सुटीत काकांकडे मुंबईला गेले कि मग ते शहरातले धावपळीचे जीवन जवळून पाहायला मिळायचे. नोकरदार वर्गाची धावपळ,घरात सकाळी एक वेगळेच वातावरण असायचे.असा वाटायचे कि ह्या मंडळींना पायाला चाके आहेत...सगळे त्या घड्याळाला बांधलेले,कुठे पहाटेचे ते गार वारे आणि शांतता, पटापट आवरून लोकल गाठायची गडबड,त्यात डबेवाले....त्यांची घाई.येताजाताना एकमेकांना दिल्या जाणारया सूचना, फ्रीज वर पण अश्या सूचना चिटकवल्या जात असत,लहानपणी मजा वाटायची...आम्हीं लहान मंडळी घरात उरत असू. मग काय सगळी सकाळ आमची... दंगा करायला घर सेवेला...उन्हाळ्याची सुटी छान जायची....तसे आमच्यावर लक्ष ठेवायला आणि घरात मदतीला कोणीतरी होते पण,तरीही.... मला सुटीतली सकाळ आवडायची विशेष! शाळा सुरु असताना लवकर उठायचा कंटाळा यायचा,ठरवायचे मी सुटीत मस्त झोपायचं सकाळी ,आरामात ;उठायचे पण कसले काय! सुटी लागली कि मग झोप जायची पळून आणि दिवस हातात असायचा.खेळणे हा आम्हां मुलींचा सुटीतला मुख्य कार्यक्रम, मराठी नाटके कधीतरी TV,कधी मित्रपरिवाराबरोबर सहली,उन्हाळ्यात आंबे आणि कैऱ्या , सुटीतला अभ्यास इतका काही केलेला आठवत नाही.



दिवाळीत तर पहाट वेगळीच वाटायची....दिवाळीत सगळे गावाकडे एकत्र येत असू, ते घर ,ते अंगण ती पहाट, आकाशकंदील,दिवे...सर्वांच्या एकत्र येण्याने ते घर भरून जायचे, असा वाटायचे कि एकत्र दिवाळी साजरी करणे म्हणजे खरी दिवाळी .फटाके ,नवीन कपडे आणि मुख्य म्हणजे फराळ....वा !!सगळ्यानी एकत्र बसून केलेला फराळ.अंगणात काढलेली सुंदर रांगोळी... एकत्र मिळून उडवलेले फटाके, सर्वांचे चेहेरे त्या दिव्यांमध्ये आनंदाने,उत्साहाने उजळलेले आठवतात!परत जाताना, "दिवाळी कधी येणार परत?" 'असे लहान भावंडे विचारायची....गम्मत वाटायची खूप.



गणपतीत बाप्पाच्या आगमनाची तयारी करता करता कधी पहाट व्हायची कळायचेच नाही... आदल्या दिवशी जमलेले सर्वजण,गप्पा,हास्यविनोद...बाप्पांचे आगमन आणि मग नैवेद्य आरत्या....मोदक...आणि एकत्र बसून केलेले प्रसादाचे सुग्रास अन्नग्रहण! बाप्पांचे आगमन व्हायचे तो दिवस त्याची पहाट विशेष लक्षात रहायची लहानपणी....आणि बाप्पांना निरोप द्यायचा त्या दिवसाची संध्याकाळ.... आमचा बालचमू अगदी शांत होत असे ..बप्पाशी झालेली मैत्री आठवायची,आणि मग खरच बाप्पा जातानाचा पुढच्या वर्षी लवकर या च्या आरोळ्या लक्षात राहायच्या!



आता परदेशात आले आहे,इकडचे विश्व, इकडच्या सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या जाणवल्या.इकडची पहाट हि.... उन्हाळा आणि हिवाळा ह्या दोन्ही मुख्य ऋतू मधल्या अडकली आहे असे वाटते.. दिवस मोठे आणि रात्र लहान उन्हाळ्याची खासियत! दिवसाची सुरवातच मुळात आळसावलेली,पण निसर्ग आपले दोन्ही हात पसरून बोलावत असतो, हवा एकदम झकास, आणि सगळीकडे हिरवळ, अश्या वेळी पहाट इतक्या लवकर येते असे वाटते .... धावपळ रोजची असूनही रोज वेगळी वाटते , उत्साह ओसुंडू वाहत असतो, आवडते मला उन्हाळ्यातली . सकाळ....शांत पण तितकीच उत्साहित करणारी.. त्याउलट हिवाळा, इकडे तर कडक थंडी आणि सगळीकडे पाढर्याशुभ्र हिमाचे साम्राज्य पसरलेले असते... आणि मग रात्रीची झोप जास्त मिळणार घड्याळाचे गणित बदलते .... दिवस लहान, काळोख पटकन पडतो, हिवाळ्यात आलेली पहाट ,पहाट वाटलीच नाही कधी मला इथे कारण, सुर्यनारायण उगवताना कधी कधी इतके ढग दाटीवाटीने असतात कि जाणवतच नाही कि कधी अलगदपणे दिवस वर आला धुक्यातून ..थंडीच्या जोरामुळे बिचारया उन्हाचे काहीच चालत नाही,नावाला प्रखर सूर्यप्रकाश,वाटते इतके उन पडले आहे ,पण कडाक्याची थंडी असते मग अश्या वेळी बाहेर...



आता इतक्या वर्षांनी इकडच्या ह्या हवामानाची सवय झाली आहे मला ,आणि आवडू हे लागली आहे इथली हवा, पण तरीही .... स्मृती ऐकत नाहीत आणि परत परत आपल्या देशात घेऊन जातात, त्यातला एक भाग म्हणजे आठवणारी तिथली सकाळ...जे आजही मला इकडच्या हिवाळ्यातल्या एका सकाळी स्मरते आणि स्मरताना बराच काही देऊन जाते.......
लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

  1. प्रिय मोनिका...
    पहाटेच्या बाबतीत म्हणशील तर माझा अनुभव पण काहीसा असाच आहे. मला गावांतली सकाळ अनुभवायला तर मिळाली नाही पण भारतांत गांव-गांव फिरून जेंव्हा इथे आलो परदेशात तेंव्हा मात्र फरक खूपच जाणवला. फक्त एकच ठरवलेले आहे जिथे दाणा-पाणी आहे तिथे सगळे चांगलेच बघणे.. जसे तू करतेयस... मोरया...

    तुझीच
    संध्या

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय छान वर्णन केलं आहेस पाहाटेचं. मला पण एखाद्या डिसेंबर महिन्यातली शनिवार ची सकाळ आठवली- मस्त एखाद्या गडावर केलेला ट्रेक आणि गरम गरम उकळीचा चाहा :-).

    उत्तर द्याहटवा
  3. कौस्तुभ छान वाटले तुझी टिप्पणी वाचून .... आणखीन, काही सूचना असल्या तर नक्की सुचव....... धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ