हे बंध रेशमाचे....

हे बंध रेशमाचे....
मैत्री एक नाते... प्रत्येकाला एक तरी मित्र वा मैत्रीण असते, असावी ... अशी सखी,जी तुमच्या सर्व गुणदोषांसकट तुम्हाला समजून घेते. तुमच्या मनातले पण तिला कळते,अगदी कधी कधी न मागता पण अनेक गोष्टी ती देते.....
अस कोणीतरी इतका मनापासून आपल्यासाठी काही करत असते . आपण पण प्रयत्न करत असतो तिला आपल्याला काय वाटते ते दिसावे,कळावे ह्याचा,रोजच्या व्यवहारात, वेळ काढून अगदी ठरवून कधी एखादा फोन येतो तिचा किती आनंद होतो मनाला! असं वाटते कि खरच पलीकडे त्या फोन वर माझी सखी आहे जिला जाणून घ्यायचे आहे कि मी कशी आहे आणि मलाही कि ती कशी आहे.....
किती सारया गोष्टी अगदी लहान लहान,आणि प्रश्न जे खूप मोठे वाटतात तिच्याशी वाटून घेताना सोपे वाटायला लागतात. तिचे हसणे, खेळकर बोलणे आणि मुख्य म्हणजे मला समजून घेणे....मैत्रीण ह्या नात्याला पुरेपूर न्याय ; 'ती माझी सखी'.
रक्ताची नाती माणसाला असतातच,पण काही नाती अशी असतात जी खूप काही देऊन जातात,शिकवून जातात,आधार वाटतात..... एकमेकांना भेटणे नेहमी जमतेच असा नाही,पण दूरध्वनीचे माध्यम मात्र खूप उपयुक्त ठरते.अश्या वेळी वाटते मग, कि बोलता येते आहे आणि ते पण पटकन एक नंबर फिरवला कि; जर निरोप ठेवावा लागला तर निरोप ठेवते पण तरीही खात्री असते कि ती call return करणार....

लहानपणापासून मला खूप सारया मैत्रिणी होत्या. काही जणी थेट कॉलेज पर्यंत सोबत होत्या.... पुढे मी भारताबाहेर आल्याने संपर्क फार कमी जणींशी राहू शकला. त्यात एक मैत्रीण खूप जवळची अशी; लहानपणी आजोळी असताना एकत्र शाळेत,एकाच वर्गात होतो,मध्ये तिच्याशी पत्रमैत्री होती कारण मी महाराष्ट्रात आणि ती मध्यप्रदेशात...पण त्या पत्रांमधून खूप काही मिळत गेले मला, तिच्या पत्राची वाट पाहायचे,लागलीच माझे उत्तरही जायचे तिला.गप्पाच व्हायच्या फक्त पत्रांतून.
किती माझी तिला आठवण येते,,, आणि आमचे तेंव्हाचे विश्व,काय काय चालले आहे , रोजच्या घडामोडी सगळे सगळे; किती मोठी पत्रे,आई म्हणायची, "काय निबंध लिहिणे चालले आहे का तुझे ?" पण खरच कंटाळा कसा यायचाच नाही.तिचे ते सुवाच्य हस्ताक्षर,वाढदिवसाला मला तिने स्वतःहून एक सुंदर कार्ड बनवून पाठवले, ते आजही जवळ आहे....तिच्या एका मैत्रिणीबद्दल लिहायची ती,नवीन खूप चांगली मैत्रीण,तेंव्हा मला जाणवले कि मी काय मिस करते आहे..... पण जरी आम्हीं एकत्र नसलो तरीही ती माझ्या विश्वाचा एक भाग होती. तेंव्हा, आणि आजही आहे .आज आम्हीं दोघी आपापल्या घरात, रोजच्या गडबडीत, पण तरीही आठवणी जपतो आहोत, आणि नेहमीच जपत राहू,तश्याच एकत्र नेहमीच....

अशीच दुसरी मैत्रीण पण, कॉलेज मधली. हक्काने आणि हट्टाने गोष्टी मागणारी, स्वतःचे खरे करणारी पण तरीही मला मात्र नेहमीच समजून घेणारी, तिच्या स्वभावात एक विशेष होते, आमच्यात साम्य थोडे आणि फरक जास्त पण तरीही मला तिने नेहमीच सांभाळून घेतले... दोघींचा स्वभाव मनमोकळा हे साम्य, फरक तर खूप सारे होते .आणि एकमेकीन बद्दलचा जिव्हाळा....
आमची ओळख झाली तो पहिला दिवस आठवतो. ती रत्नागिरीहून कॉलेज मध्ये आलेली, मराठीत कोकणी चा प्रभाव होता, त्यामुळे बरोबरच्या मैत्रिणी थोड्या वेगळ्या पाहत होत्या तिच्याकडे कारण नेहमीची बोली भाषा वेगळी वाटत होती तिची,तिला माझ्याबद्दल आमचे प्राध्यापक श्री जोगळेकर जे तिच्या वडिलांचे चांगले मित्र ह्यांनी सांगितले होते ,, हिच्याशी बोल असा मलाही त्यांनी सांगितले कारण, ती नवीन आहे इकडे, मला हि कल्पना होती, त्यात तिचा भांबावलेला चेहरा, आणि मला शोधणारी नजर,माझ्या बाजूलाच बसली आणि पटकन छान मैत्री केली माझ्याशी, असा वाटलेच नाही कि एकमेकांना पहिल्यांदा भेटत होतो .
अर्थात नंतर रोज भेट व्हायची....दिवस एकदम छान जायचे. तिच्याशी हळू हळू ओळख वाढत गेली आणि मग त्यांच्या घरातलाच एक मेम्बर झाले मी....
तिच्या घरी दुपारी सुटीत जायचे,अभ्यास परीक्षेच्या काळात एकत्र करत असू . कितीसारया, गोष्टी नकळत एकमेकांना सांगत गेलो,आणि अर्थात मग समोर येणारे प्रश्न, ते पण सोडवत गेलो.....आमचे नाते मैत्रीच्या नात्याहूनही पुढे जणू एकमेकींच्या बहिणी आहोत इतके हक्काचे होऊ लागले. नंतर मात्र तिच्या बाबांची बदली झाल्यामुळे परत आमची मैत्री पत्रमैत्री झाली. दूरध्वनीचे माध्यम होतेच, आता तर ती भारतात आणि मी इकडे परदेशात तरीही हे जे नाते निर्माण झाले ते इतका घट्ट आहे कि दूरध्वनी चे माध्यम आहे मदतीला...

मी विचार करते कि किती सारी माणसे आपल्या आयुष्यात येतात, त्यातली फार थोडी तुम्हाला अगदी खरेखुरे ओळखतात वा तसा प्रयत्न करतात. माझ्या आतापर्यंतच्या मित्रपरिवारात वेगवेगळ्या स्वभावाची,भिन्न भाषेची मंडळी आहेत....प्रत्येकाच्या आवडी निवडी,सवयी वेगवेगळ्या,काहींचे देश वेगळे,पण एक गोष्ट त्यांची सर्वांची सारखीच आहे ती म्हणजे ते सगळे ह्या रेशिम्बंधांनी बांधले गेले आहेत, ह्या मैत्रीच्या नात्यात. खुपदा वाटते जवळ येणे आणि लांब जाणे हे नात्याचा एक भाग आहे पण जर हे बंध घट्ट असतील तर,आणि खरे असतील तर अशी नाती नेहमीच टिकतात! कधीच तुटत नाहीत.... सगळेच तुमच्याशी चांगली मैत्री करतीलच असे नाही,पण मनासारखे सगळेच कसे असेल!
जग कितीही पुढे गेले तरीही माणसाला मैत्री हि लागतेच.मैत्रीचे नाते खूप महत्वाचे आहे, कधीतरी एखादी मैत्रीण तुम्हाला लक्षात राहते खूप काही शिकवून जाते.... आपल्या चुका दाखवून देते,प्रसंगी कान पण पिळते... अश्या नात्याला पण जपले पाहिजे कारण आपल्याला आपल्या चुका दाखवून देणारी एक व्यक्ती आहे वेळी तुमचा गुरु पण होते ती व्यक्ती.....समान आवडी निवडी असलेली मित्रमंडळी असतातच पण अश्याही व्यक्ती आहेत ज्यांना खूप काही वेगळे येते माझ्याहून,नवीन गोष्टी कळतात,त्यांच्या छंदांना त्यांनी कसे जोपासले आहे,काही त्यातले तर स्वतःच्या कलेचा सुंदर उपयोग करून, समाजापर्यंत पण त्यांनी त्या कलेचे योग्य प्रदर्शन केले आहे.
एक प्रचलित इंग्रजी वाक्य आठवले, "तुमचे वय' हे तुमच्या अतिशय चांगल्या मित्रवर्गाच्या संख्येवरून ओळखावे, आणि खरच आहे !!!!.... ह्या रेशीम गाठी काही जणांसाठी खूप महत्वाच्या असतात, माझ्यासाठीही खूप महत्वाच्या आहेत...एक इंग्रजी वाक्य आवडून गेले होते,,,,, Friends Are the Most Important Ingredients In The Recipe Of Life !!
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
प्रिय मोनिका...
उत्तर द्याहटवाअगदी खरंय गं... अशाच माझ्या पण काही मैत्रिणी होत्या पण तू भाग्यवान आहेस की दोघींनी पण टिकवून ठेवले. माझा मैत्री टिकविण्याचा प्रयत्न एकतर्फी राहील्याचे मला खूप दुःख आहे. पण ह्या इंटरनेटच्या जगात तुझ्यासारखी सखी आहे त्यामुळे आयुष्यात पुन्हा तेच सुख परत आले आहे, जीव सुखावला आहे. अशीच मैत्री असू दे...
तुझीच मैत्रिण
संध्या
अशीच मैत्री असू दे...
उत्तर द्याहटवादिपक आपल्या टिपण्णी बद्दल धन्यवाद !!
उत्तर द्याहटवा