Happy New Year 2026 ❤️
नवीन वर्ष आले,किती पटकन दिवस सरतात! आपल्या दिनदर्शिकेत डोकावले तर,काही दिवस सणाचे,काही हक्काचे रविवार,काही महत्त्वाच्या घडामोडींचे,काही आनंद घेऊन येणारे,नव्या खरेदीचे,सहलीचे,नव्याने झालेल्या ओळखींचे,काही जुन्या आठवणींमध्ये हरवलेले,वाचनाचे,लेखनाचे,नवीन पदार्थ बनविण्याचे,खास हॉटेलात जाऊन आस्वाद घेण्याचे,नाट्यगृह,चित्रपटगृहात सापडलेले मनोरंजन,पाहुणे,जुन्या वाटेवर हरवलेले अन् नव्याने सापडलेले ऋणानुबंध ह्या सर्व दिवसांनी उजळून टाकलेले माझे तुमचे आपले 2025.. पण काही अगदी जवळीची माणसे गेल्याच्या दुःखद प्रसंगांनी देखील हळवे झालेले 2025.माझ्या आयुष्यात काही नाती मी जपली,त्यात जवळची माझी मीना काकी,ती दिवाळीत मला,आम्हा सर्वांना सोडून देवाघरी गेली.खूप वाईट वाटले,आजही तिचे अस्तित्व हवेसे होते,ती नाही हे मन मान्य करत नाही!तसेच वर्षाच्या शेवटी मला वडील भावाची माया ज्यांनी दिली, ते माझे मावस दीर ज्यांना आम्ही काका म्हणत असू.त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून काढता येणार नाही!2025 रुख रूख लावून गेले! काही गोड बातम्या पण...