पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भूमिका

इमेज
काल रविवारी ३० तारखेला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे दुपारी एका आगळ्या वेगळ्या नाट्य प्रयोगाला गेले होते. हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित क्षितिज कुलकर्णी लिखित असून ह्यात प्रमुख भूमिकेत श्री सचिन खेडेकर आहेत.नाटकाचे नाव 'भूमिका'. विषय मांडायला सोपा नाही असा..पण लेखकाने लीलया,मांडला आहे.आणि ह्यातील कलाकारांनी साभिनय उत्तम पेलला आहे! ह्या नाटकातील विविध संवाद मनाला खोलवर जाणवतात.आपल्या शेजारपाजारी,ओळखीत,नात्यात आलेले अनुभव,प्रेक्षकांना कोणत्या ना कोणत्या भूमिकेत न्हेऊन उभकरतात.लेखकाला जे म्हणायचे होते ते,प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते. काही प्रसंग,संवाद थेट मनाला भिडतात! प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका चोख बजावली आहे.नेपथ्य आणि रंगभूषा छानच. नाटक कुठेही कंटाळवाणे वाटत नाही,उलट विचारप्रवर्तक आहे.नक्कीच पहाण्यासारखे ! ह्यातील समिधा गुरु,अतुल महाजन,सुयश झुंझुरके,जयश्री जगताप,आणि जाई खांडेकर ह्या कलाकारांनी सुद्धा उत्तम अभिनय केला आहे. येथे नाटकाचा विषय मी मुद्दाम देत नाहीये,कारण तो तसा परिचयाचा असला तरी नाटकातून लेखकाने सर्व प्रेक्षकांशी ह्या विषयावर जो संवाद साधला ...